Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, April 13, 2024

तिवटग्याळ येथे एक दिवस मतदान जनजागृती साठी अंतर्गत रॅली आयोजित

*तिवटग्याळ येथे एक दिवस मतदान जनजागृती साठी अंतर्गत  रॅली आयोजित*

तिवटग्याळ - आज दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी तिवटग्याळ येथे मा. जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर - घुगे यांच्या अभिनव उपक्रम एक दिवस मतदान जनजागृती साठी या उपक्रमांत मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅली मध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी, बचत गट महिला जयदेवी पाटील, गीताताई कच्छवे, अश्विनी कांबळे, सिमंता कांबळे, शितल बिरादार, गणपत कांबळे,पद्माकर पाटील, अंकुश कांबळे, शाळेचे मुख्याध्यापक तथा BLO ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर,  अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, मदतनीस भागाबाई बिरादार आदी जण उपस्थित होते. या रॅलीत विविध मतदान जनजागृती करण्यासाठी घोषणा देत मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो,"उद्या चांगल्यासाठी मतदान करा, तुमचे मत, तुमचा आवाज,मतदान ही तुमची महासत्ता आहे,तुमचे भविष्य घडवा, 7 मे 2024 मतदान करा,मतदान करा जसे तुमचे भविष्य त्यावर अवलंबून आहे, कारण ते तसे करते, तुमचे मत, तुमची निवड, तुमचे भविष्य, लोकशाही तुमच्यापासून सुरू होते, मतदान तुमच्या स्वातंत्र्याची अंतिम अभिव्यक्ती, तुमचे मत महत्त्वाचे आहे, सहभागी व्हा. मत द्या,तुमच्या हातात आमच्या राष्ट्राचे भविष्य आहे,मतपेटीत युवा शक्ती,तुमची स्वप्ने त्यावर अवलंबून असल्याप्रमाणे मतदान करा, विश्व तुमचे आहे; त्याला आकार देण्यासाठी मत द्या, तुमचे मत, तुमची जबाबदारी, तरुण मतदारांनो, तुमचे भाग्य घडवा, तुमचे मत, तुमचे उज्ज्वल भविष्य, मतदानाची संधी गमावू नका, चला मतदानाचा टक्का ऐतिहासिक बनवूया."
“बाहेर पडा आणि मतदान करा अशा विविध घोषणा देत मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली. BLO तथा मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मतदानाचे महत्त्व तसेच सविस्तर माहिती दिली. तसेच आपल्या लातूर जिल्हाच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून मा. वर्षा ठाकूर- घुगे मॅडम लाभल्या आहेत. मॅडम नी महिलांना विशेष 100 टक्के महिलांनी मतदान करावे असे आवाहन केले आहेत. त्यांच्या विशेष उपक्रमातून आज संपूर्ण जिल्ह्य़ात एक दिवस मतदान जनजागृती करण्यासाठी म्हणून आजचा दिवस राबविण्यात येत आहे असे सांगितले. मतदानाची टक्केवारी वाढवावी, अपंग व 85 + वयोवृद्ध मतदारांनी मतदान करावे असे BLO ज्ञानेश्वर बडगे यांनी सांगितले. यावेळीरॅली मध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी, माजी सरपंच उज्ज्वला ताई नरहरे, बचत गट प्रमुख महिला जयदेवी पाटील, गीताताई कच्छवे, अश्विनी कांबळे, सिमंता कांबळे, शितल बिरादार, गणपत कांबळे,पद्माकर पाटील, अंकुश कांबळे, शाळेचे मुख्याध्यापक तथा BLO ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर,  अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, मदतनीस भागाबाई बिरादार आदी जण उपस्थित होते.गावातील नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते



































No comments:

Post a Comment