Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Wednesday, July 3, 2024

मुख्याध्यापक चंद्रकांत कोरे यांचा सेवा निवृत्ती निमित्ताने निरोप सत्कार सोहळा संपन्न

*मुख्याध्यापक चंद्रकांत कोरे यांचा सेवा निवृत्ती निमित्ताने निरोप सत्कार सोहळा संपन्न*

बोळेगाव (बु) - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु ता.शि.अनंतपाळ जिल्हा लातूर येथील मुख्याध्यापक चंद्रकांत कोरे यांचा आज दिनांक 27/6/2024 रोजी बोळेगाव बु. येथील मारोती मंदिर सभागृहात सेवानिवृत्त समारंभ आयोजित करण्यात आला. नियतवयोमानानुसार सेवा निवृत्त  होणारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय व्यक्तिमत्व मा. चंद्रकांत कोरे दिनांक 30/6/2024 रोजी सेवा निवृत्त होत असल्याने बोळेगाव बु.व शिरूर अनंतपाळ केंद्राच्या  वतीने आज दिनांक 27/6/2024 रोजी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत कोरे साहेबांचा बोळेगाव बु. व एकुण 37 वर्षातील कार्यकाल नक्कीच स्वप्नवत होता यात कुणालाही शंका नाही. सकारात्मक वृत्ती, समोरच्या
 व्यक्तीला जिंकण्याची विशेष गुण अशा अनेक गुणांनी सर्वांच्याच हृदयात स्थान मिळवले होते.अशा या आदर्श व्यक्तिमत्वाचा सेवा निवृत्ती निमित्ताने सत्कार  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.मारोती मंदिर सभागृहात शिक्षक बांधवांकडून  संपन्न झाला. प्रथम प्रास्ताविकात शाळेतील पदवीधर शिक्षक  सुदर्शन पाटील यांनी मुख्याध्यापक चंद्रकांत कोरे यांच्या एकूणच सेवा काळातील जीवनावर सविस्तर माहिती दिली.
 कार्यक्रमाचे अध्यक्ष अडव्होकेट संभाजी पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण खटके, प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी चव्हाण  बि. टी, गटशिक्षणाधिकारी  अनिल जी पागे, विस्तार अधिकारी शिवशंकर पाटील, केंद्रप्रमुख बिडवे बी. एन हिप्परगे पी. जी,बालूरे दामाजी मुख्याध्यापक  तसेच मुख्याध्यापक सिंदाळकर यु. आर. जाधव बी. एम, उस्तुरगे पी. जी. चंद्रकांत कोरे यांच्या सुविज्ञ पत्नी मिरा कोरे, सरांच्या मातोश्री  आदी जण उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी केंद्र अंतर्गत सर्व मुख्याध्यापक व शिक्षक तसेच पालक उपस्थित होते. या कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माजी अध्यक्ष व्यंकटराव खटके, पोलिस पाटील व्यंकटराव गौंड, श्री ज्ञानेश्वर तेलंग, सेवा निवृत्त शिक्षक तथा शिक्षण प्रेमी एम. एम. पाटील, गावातील प्रतिष्ठित नागरिक, शाळेतील शिक्षक, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.तसेच यांचाही भारतीय संस्कृती प्रमाणे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे निमित्ताने सत्कार  करण्यात आला. या निरोप सत्कार सोहळ्यासाठी  शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, गावातील प्रतिष्ठित नागरिक  उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वीसाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी निरोप सत्कार समारंभासाठी  परीश्रम घेतले.  या निरोप समारंभात  जिल्हा परिषद  प्राथमिक शाळा बोळेगाव बु. येथील शिक्षक  सुदर्शन पाटील,सुभाष नरवडे, सुर्यनारायण सुरवशे, विजयकुमार सिंदाळकर,  मजलसा पुठ्ठेवाड,  आशा मुळे आदी जण उपस्थित होते. तसेच साहेबांच्या कामकाज, शैक्षणिक क्षेत्रात चांगली कामगिरी बजावली या बाबतीत मनोगतातून सर्वांनी कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक होते असेअडव्होकेट संभाजी पाटील, गटविकास अधिकारी चव्हाण साहेब, गटशिक्षणाधिकारी अनिल पागे तुकाराम पाटील, गोविंद हंद्राळे, आदींनी व्यक केले. या निरोप सत्कार सोहळ्यासाठी  शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, गावातील प्रतिष्ठित नागरिक  उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक सुभाष नरवडे व आभार शाळेतील शिक्षक  सुर्यनारायण सुरवशे यांनी मानले.















No comments:

Post a Comment