Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Wednesday, July 3, 2024

केंद्र प्रमुख मा. श्रीदेवी स्वामी यांच्या सेवा निवृत्ती निमित्ताने निरोप सत्कार सोहळा संपन्न

*केंद्र प्रमुख मा. श्रीदेवी स्वामी यांच्या सेवा निवृत्ती निमित्ताने निरोप सत्कार सोहळा संपन्न*


*उदगीर - तोंडचिर व नागलगाव केंद्राचे केंद्र प्रमुख मा. श्रीदेवी स्वामी यांचा सपतिक सत्कार सोहळा आज दिनांक 29/6/2024 रोजी शिवनंदा मंगल कार्यालय सभागृहात सेवानिवृत्त समारंभ आयोजित करण्यात आला. नियतवयोमानानुसार सेवा निवृत्त  होणारे तोंडचिर व नागलगाव केंद्राचे केंद्र प्रमुख आदरणीय व्यक्तिमत्व मा. श्रीदेवी स्वामी दिनांक 30/6/2024 रोजी सेवा निवृत्त होत असल्याने तोंडचिर व नागलगाव केंद्राच्या वतीने आज दिनांक 28/6/2024 रोजी सेवापुर्ती सत्कार सोहळा संपन्न झाला.  स्वामी मॅडम साहेबांचा गेल्या दोन महिन्यांतील कार्यकाल नक्कीच स्वप्नवत होता यात कुणालाही शंका नाही. सकारात्मक वृत्ती असलेल्या त्यांचा दृष्टिकोन,त्यांच्या अंगी असलेला एक उपक्रमशील केंद्रप्रमुख ,समोरच्या व्यक्तीला जिंकण्याची असलेली मृदू व अविट भाषा,निःस्वार्थ सेवावृत्ती,शैक्षणिक क्षेत्रात 37 वर्ष शिक्षक या पदावर उल्लेखनीय कार्य केलेले आहेत, उत्कृष्ट कामगिरी केली आहे. स्वामी मॅडम शैक्षणिक कार्यातून सर्वांच्याच हृदयात स्थान मिळवले होते.अशा या आदर्श व्यक्तिमत्वाचा सेवा निवृत्ती निमित्ताने सत्कार  सोहळा तोंडचिर व नागलगाव  केंद्रातील व उदगीर तालुक्यातील शिक्षक बंधू भगिनी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्रास्ताविकात मा. श्रीदेवी स्वामी मॅडम यांच्या एकूणच सेवा काळातील जीवनावर सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे  प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी शेख शफी साहेब , विस्तार अधिकारी मा नितीन लोहकरे, वसंतराव सुर्यवंशी, शिवशंकर पाटील , केंद्रप्रमुख विजयकुमार चौव्हाण, रमेश जाधव तसेच आजी व माजी केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक आदी जण उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी केंद्र अंतर्गत सर्व मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचा भारतीय संस्कृती प्रमाणे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, प्रमुख अतिथी यांचा सत्कार  करण्यात आला.मा.श्रीदेवी स्वामी मॅडम साहेबांच्या कामकाज, शैक्षणिक क्षेत्रात चांगली कामगिरी बजावली या बाबतीत मनोगतातून अनेक शिक्षकांनी कर्तव्यदक्ष केंद्रप्रमुख होते असे मनोगतपत भाषणातून व्यक केले. या निरोप सत्कार सोहळ्यासाठी तोंडचिर, नागलगाव  केंद्रातील व उदगीर तालुक्यातील सर्व शिक्षक, शिक्षिका,  प्रतिष्ठित नागरिक आदी जण उपस्थित होते. हा कार्यक्रम सोहळा यशस्वीसाठी तोंडचिर व नागलगाव केंद्रातील सर्व शिक्षकांनी निरोप सत्कार समारंभासाठी  परीश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  उपक्रमशील शिक्षक श्याम राठोड व आभार पर मनोगत सत्कार मुर्ती मा. केंद्र प्रमुख श्रीदेवी स्वामी यांनी मानले*































No comments:

Post a Comment