मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नोंदणी फार्म
Download here to click
👇
इतर सविस्तर माहिती साठी
👇
"मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना"🙏
सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांना सुचित करण्यात येते की आज महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना "घोषित केलेली आहे यामध्ये रुपये १५००/ महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ही योजना याच महिन्यात चालू होणार आहे सदर योजना महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत राबवल्या जाणार आहे याच्या अटी व शर्ती खालील प्रमाणे आहे १) 21 ते 60 वर्ष वयोगटातील विवाहित ,परितकत्या,विधवा ,महिला २) त्या महाराष्ट्रातील रहिवासी असल्याबाबतचे अधिवास सर्टिफिकेट
३) उत्पन्नाचे रू२.५० लाखापेक्षा जास्त नसावे म्हणजे कुटुंब प्रमुखाचे उत्पन्न अडीच लाखापर्यंत असावे
४)बँकेमध्ये सदर महिलेचे नावे खाते असावी
५)रेशन कार्ड मध्ये सदर महिलेचे नाव अंतर्भूत असावी
सदर योजना अंतर्गत सोमवारी सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना "नारी शक्ती दुत ॲप "प्ले स्टोअर वरून आपल्याला देण्यात आलेल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घ्यावयाचा आहे
महत्वाचे __सर्वात पहिले अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना आपली नोंदणी या योजनेअंतर्गत पुढील आठवड्यात सोमवार ते बुधवार पर्यंत १००%करून घेण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची नोंदणी सदर "नारी शक्ती दुत ॲप" मध्ये करून घेण्याची जबाबदारी अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे नोंदणी करत असताना
1)उत्पन्नाचा दाखला सण 2025 पर्यंत वैद्य असणारा असावा
२) जन्माचा दाखला असावा /टि.सी झेरॉक्स असावी /डोमेसाईल प्रमाणात
३)रेशन कार्ड ची झेरॉक्स असावी
४) आधार
५) लाभार्थी नावाने बंक पासबुक झेरॉक्स
सर्व माहिती ॲप मध्ये अंगणवाडी सेविका यांना भरावयाची आहे सोबत आधार कार्ड असणे आवश्यक आहे या व्यतिरिक्त अंगणवाडी सेविकेला गावातील आशा वर्कर, सर्व बचत गटाच्या महिला यांना सुद्धा या योजनेबाबत योजनेबाबत माहिती देऊन "नारी शक्ती दुत"ॲप त्यांना प्ले स्टोर वरून डाऊनलोड करून या योजने करता अर्ज करायला सांगावे
तसेच गावातील इतर पात्र असणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना सुद्धा आवश्यक कागदपत्र तयार करून गावातील सेतू केंद्रातून किंवा ग्रामसेवकांच्या माध्यमातून सदर योजने करता अर्ज किंवा माहिती भरणे बाबत जनजागृती अंगणवाडी केंद्रामध्ये माता सभा घेऊन उद्या पासून करावी तसेच१ ते 31 आॅगस्ट २४ या कालावधी गावातील कोणतीही 21 ते 65 वयोगटातील पात्र असणारी महिला "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत" वंचित राहणार नाही याची दक्षता सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी घ्यावी गावातील जेवढे ग्रुप असतील त्या सर्व ग्रुपमध्ये या योजनेबाबत माहिती टाकावी काही आवश्यकता असल्यास त्यांना बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच संबंधित बीटच्या पर्यवेक्षिका यांचा मोबाईल नंबर देण्यात यावा धन्यवाद
No comments:
Post a Comment