Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Wednesday, July 3, 2024

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वसंतराव नाईक यांची जयंती साजरी

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वसंतराव नाईक यांची जयंती साजरी*


तिवटग्याळ - आज दिनांक 1/7/2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर  येथे 1 जुलै 2024 रोजी वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त  त्यांच्या प्रतिमेला शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील अंजली लोहारकर, डोंगरशेळकी तांडा येथील कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी सुरज लंगोटे, आदित्य कानवटे,अशोक कोरे, आदित्य माने, कृष्णवर्धन कुलकर्णी, पालक व इतर शिक्षकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.तदनंतर शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर महाराष्ट्रराचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक  यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती सांगितली. तसेच डोंगरशेळकी तांडा येथील कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी सुरज लंगोटे, आदित्य कानवटे,अशोक कोरे, आदित्य माने, कृष्णवर्धन कुलकर्णी यांनी कृषी दिनाच्या निमित्ताने शाळेत व शाळेच्या परीसरात एक विद्यार्थी एक झाड या उपक्रमातून प्रत्येकी एक झाडाचे वृक्षारोपण केले जाणार आहे असे सांगून वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व आभार शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर यांनी मानले. या वेळी  शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर,डोंगरशेळकी तांडा येथील कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी सुरज लंगोटे, आदित्य कानवटे,अशोक कोरे, आदित्य माने, कृष्णवर्धन कुलकर्णी व शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते*

















































































No comments:

Post a Comment