Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, July 6, 2024

शिक्षण क्षेत्रातील अवलीया मा.शिवशंकर पाटील शिक्षण विस्तार अधिकारी सेवानिवृत

*शिक्षण क्षेत्रातील अवलीया मा.शिवशंकर पाटील शिक्षण विस्तार अधिकारी  सेवानिवृत*

*सेवापुर्ती निमित्ताने सत्कार सोहळा संपन्न*


उदगीर - अवलकोंडा बीट चे शिक्षण विस्तार अधिकारी मा. शिवशंकर पाटील यांचा सपत्नीक सौ. उमाताई पाटील( रामशेट्टे) आज दिनांक 6/7/2024 रोजी सेवानिवृत्त सेवानिवृत्ती समारंभ ऋणनिर्देश सोहळा रघूकूल मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला. नियतवयोमानानुसार सेवा निवृत्त  होणारे अवलकोंडा बिट चे आदरणीय व्यक्तिमत्व मा. शिवशंकर जी पाटील दिनांक 30/6/2024 रोजी सेवा निवृत्त झाल्याने उदगीर तालुक्यातील सर्व केंद्र  केंद्राच्या वतीने व पाटील परिवाराच्या वतीने ऋणनिर्देश सोहळा आज दिनांक 6/7/2024 रोजी  सोहळा संपन्न झाला.  साहेबांचा एकुण 40 वर्ष 1 महिना कार्यकाल नक्कीच स्वप्नवत होता यात कुणालाही शंका नाही. सकारात्मक वृत्ती असलेला त्यांचा दृष्टिकोन,त्यांच्या अंगी असलेला एक उपक्रमशील शिक्षक, पदवीधर, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी अशा विविध पदावरील सेवा काल सर्वांनाच आठवणीत नक्कीच राहील. समोरच्या व्यक्तीला जिंकण्याची असलेली मृदू व अविट भाषा,निःस्वार्थ सेवावृत्ती,शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्यानंतर सामाजिक क्षेत्रात, स्वामी विवेकानंद फाऊंडेशन अशा विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अनेक सद्गअशा सर्वांच्याच हृदयात स्थान मिळवले होते.अशा या आदर्श व्यक्तिमत्वाचा सेवा निवृत्ती निमित्ताने सत्कार  उदगीर तालुक्यातील सर्व केंद्रातील व पाटील परीवाराच्या वतीने शिक्षक बंधू भगिनी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्रास्ताविकात शंभूउमरगा केंद्राचे केंद्र प्रमुख तथा उपक्रमशील शिक्षक रमेश जाधव यांनी शिवशंकर पाटील यांच्या एकूणच सेवा काळातील जीवनावर सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे अंबरखाने ब्लड बॅंक चे अध्यक्ष मा. रमेश अंबरखाने, प्रमुख पाहुणे वैद्यकीय अधिकारी वडगावे साहेब, बसवराज पाटील नागराळकर,गटशिक्षणाधिकारी शेख शफी, विस्तार अधिकारी मा नितीन लोहकरे, माजी शिक्षण विस्तार अधिकारी वसंतराव सुर्यवंशी, केंद्रप्रमुख रमेश जाधव , मधूकर मरलापल्ले, बालाजी धमनसूरे, राघोबा घंटेवाड, पाटील सरांच्या सुविज्ञ पत्नी उमाताई पाटील (रामशेट्टे) आदी जण उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी केंद्र अंतर्गत सर्व मुख्याध्यापक व शिक्षक तसेच पालक उपस्थित होते. तसेच  भारतीय संस्कृती प्रमाणे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे यांचा यथोचित निमित्ताने सत्कार  करण्यात आला.शिवशंकर पाटील साहेबांच्या कामकाज, शैक्षणिक क्षेत्रात चांगली कामगिरी बजावली या बाबतीत मनोगतातून  उपक्रमशील शिक्षक संभाजी शिंदे व मारमवार सविता यांनी कर्तव्यदक्ष शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक होते असे मनोगतपत भाषणातून व्यक केले. या ऋणनिर्देश सोहळा सत्कार सोहळ्यासाठी उदगीर तालुक्यातील सर्व केंद्रातील सर्व शिक्षक, शिक्षिका, ज्या गावामध्ये नोकरी केली त्या गावातील तळेगाव, डीगोळ, शेल्हाळ प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीसाठी स्वामी विवेकानंद फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ सचिन स्वामी, पाटील परीवारातील सर्व सदस्य व सर्व केंद्रांतर्गत शिक्षकांनी निरोप सत्कार समारंभासाठी  परीश्रम घेतले.   या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन BRC चे साधन व्यक्ती मा. डॉ ज्ञानोबा मुंढे व आभार पाटील सरांच्या सुविज्ञ पत्नी सौ. उमाताई पाटील (रामशेट्टे) यांनी मानले


















No comments:

Post a Comment