" शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रम . १)आदर्श परीपाठ २)मराठी भाषेत परीपाठ 3)इंग्रजी भाषेत परीपाठ ४)दिनांकानुसार पाढा ५)बोधकथा ६)चित्रकला स्पर्धा ७)वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ८)सांस्कृतिक कार्यक्रम ९)गीतगायन स्पर्धा १०)भाषण स्पर्धा ११)क्रीडा स्पर्धा १२)वाढदिवस साजरे करणे। १३)भित्तिपत्रक तयार करणे १४)निसर्गसहल १२)स्वच्छता सप्ताह साजरा करणे १३)विद्यार्थी दत्तक घेणे १४)विविध जयंत्या व पुण्यतिथी १५)बचत बँक १६)हस्ताक्षर सुधार १७)हजेरी घेताना इंग्रजी शब्द १८)वाचन कट्टा १९)बाजार २०)परसबाग २१)उपस्थिती ध्वज २२)इंग्रजी संभाषण २३)शब्द बँक २४)स्वच्छ मुलगा-मुलगी २५)दत्तक कुंडी प्रकल्प २६)तंबाखू मुक्त शाळा २७)दत्तक मित्र २८)वर्तमानपत्र वाचन २९)विविध क्रीडा स्पर्धा ३०)चित्रकला स्पर्धा, ३१)निबंध लेखन ३२)वक्तृत्व स्पर्धा आयोजन ३३)हस्ताक्षर स्पर्धा ३४)दप्तराविना शाळा ३५)शब्द बाग Garden of words ३६)हस्ताक्षर सुधार प्रकल्प ३७)राजा काय म्हणतात ३८)प्रश्न आमचे ,उत्तर आमचे ३९)वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ४०)शिक्षकाचे व विद्यार्थ्यांचे सत्कार ४१)कला, कार्यानुभव कोपरे ४२)बाल आनंद मेळावे ४३)विविध विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन ४४)प्रवेशोत्सव ४५)100% पटनोंदणी ४६)लघु उद्योगाला भेटी ४७)हरित शाळा ४८)पक्ष्यांना खाऊ ४९)ज्ञानरचनावादी साहित्य ५०)डिजीटल शाळा ५१)आनंदायी शाळा, Happy school स्कूल"

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

वाढदिवसाच्या निमित्ताने लिहलेला लेख


गुरुकुलातील पाठशाळेच्या संस्कारक्षम अध्यापनाचा पवित्र वारसा प्रामाणिकपणे चालविणारा सच्चा शिक्षक : ज्ञानेश्वर बडगे
----------------------------------------
" संता नाही कुळ याति!शिंपल्यापोटी जन्मे मोती! " या अनुभवजन्य स्वाभाविक संत वचनास स्वतःच्या कृती - युक्तीने सत्यता प्राप्त करून देणाऱ्या ज्ञानेश्वर बडगे सरांचा जन्म दारिद्रय व अज्ञानाच्या चिखलात खोलवर रुतून -- फसून बसलेल्या , उपेक्षा व अपमानामुळे होणाऱ्या मानसिक वेदनेचे असह्य चटके सहन करीत जीवन जगत आलेल्या, गती - शक्ती व प्रगतीचा उत्साह हरवून बसलेल्या , असंख्य अडचणी व चिंतेच्या वर्तुळात  - कोषल्यात कोषकिटकासम अडकलेल्या बहुजनातील सामान्य कुटुंबात उच्वर्णीयानी केवळ स्वार्थापोटी निर्माण केलेल्या हजारो जाती - पोटजातीतील संख्येनी अत्यल्प असलेल्या गोंधळी जातीत झाला. या जातीत जन्मलेले लोक लोकरंजनातून लोकांचे मनोबल वाढवून आयुष्यवृद्धी करणारा लोकरंजनाचा हा धंदा - व्यवसाय आपल्या व मुलाबाळांच्या पोटाला चटणी भाकर देणारी हक्काची वतनदारी समजून पिढ्यानपिढ्या करीत व मरत आले होते. बडगे सरांचे वडील उपजत तेजस्वी , चलाख बुध्दीचे होते.ते स्वतः पुराणप्रसिद्ध व इतिहासप्रसिद्ध वीरांच्या, राजांच्या कथा,त्यांच्यातील विशेष गुणांना , शुरत्वाला, पराक्रमाला, केलेल्या लोककल्याणकारी व देश समाज हिताच्या , कल्याणच्या कार्याना , त्यांनी प्राप्त केलेल्या कीर्तीला व मानसन्मानाला आपल्या गीतातून लयबद्धपणे डफ तुणतुन्याचा तालावर , आजारावर लोकमनाला रंजविण्याच्या , आकर्षित करण्याच्या वैशिष्ठ्यपूर्ण पद्धतीने सांगून ऐकणाऱ्यांच्या ठिकाणी असलेल्या कला , विरत्व , लोकांचे नेतृत्व करण्याचा गुण , माणुसकी, दया,क्षमा, शांती, नम्रता, बंधुत्व , मित्रत्व यासम नैतिक मूल्यांच्या , गुणांच्या स्वाभाविक बिजाना विकसित करण्याचे , वाढविण्याचे काम प्रामाणिकपणे करीत मातीच्या, मातेच्या, देशाच्या व समाजाच्या ऋणाशी असलेली बांधिलकीची जपणूक करण्याचा प्रयत्न करीत आले होते.आपला पारंपरिक व्यवसाय करून मुलाबाळासाठी , कुटुंबासाठी लागणारा खर्च भागविण्यासाठी गावोगावी व शहरा शहरातून फिरताना गरीब, कष्टकरी, अज्ञानी, दुःखी लोकांच्या आणि सुसंस्कृत शिक्षित, सुखीसमाधानी  लोकांच्या जीवनाचे जवळून निरीक्षण करण्याचा , पाहण्याचा योग आला.संधी आली.या निरिक्षणातून त्यांना उच्चवर्नियांच्या सुखी समाधानी जीवनाचे रहस्य कळले. ते रहस्य म्हणजे शिक्षण होय.हा समाज पिढ्यानपिढ्या शिक्षणाच्या ज्ञानाच्या संपर्कात राहत आला होता.शिक्षण, ज्ञान देण्याघेण्याची दारे त्यांच्यासाठी सदा मोकळी होती. स्वतःसाठी दारे मोकळी, खुली ठेवण्याचा व बहुजनांसाठी ब्राह्मनेत्तरासाठी दारे बंद करण्याचा उद्योग त्यांनीच केला होता.हे वास्तव रहस्य लक्षात आल्यानंतर बडगे सरांच्या वडिलांनी आपल्या मुलाबाळांना पारंपारिक व्यवसायाच्या दुष्ट चक्रात अडकवून, गुंतवून त्यांच्यासह पुढील पिढ्यांना अज्ञान, दारिद्रय, अंधश्रद्धा व न संपणाऱ्या दुःखाच्या, अपमानाच्या चिखलात रुतवून, फसवून न ठेवण्याचा तसेच त्यांना शिक्षण देवून त्यांना गती, शक्ती व प्रगतशील अशा उज्वल स्थानाकडे - जीवनाकडे नेण्याचा , त्या वाटेवर स्वाभिमानाने चालता वावरता येईल अशी ज्ञानरूपी शक्ती आणण्याचा , निर्माण करण्याचा , अदम्य उत्साह , हिमत वाढवण्याचा आपल्या मनाशी निर्धार केला.ज्ञानाचे दूध पाजण्यासाठी त्यांनी आपल्या मुलांना शाळेत टाकले.शाळेची दारे सर्वासाठी खुली झाली होती.त्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज राहिली नव्हती.
    नाना प्रकारचे झाडे, फुलझाडे ,राशी त्यांच्या बिजामध्ये असतात त्याचप्रमाणे निसर्गतः , स्वभावताचं कला,ज्ञानाची बीजे प्रत्येक मुलांमध्ये असतात.योग्य वातावरण निर्माण करून विचाररुपी - शिक्षणरुपी पाण्याचे सिंचन करून त्यास वाढविण्याची विकसित करण्याची आवश्यकता असते.हे काम शाळेमध्ये शिक्षकाकडून, आचार्यकडून होत असते.जीवनाच्या कल्याणाची बीजे विशिष्ठ जातीत, उच्चवर्णीयामध्येच असतात त्यासाठी त्यास जातीत, वंशात जन्मास यावे लागते.ही बाब हाती नसतानाही शिक्षण देणे - घेणे ही त्यांचीच मिरासदारी असते.इतर जातीचा तो हक्क नसतो.असा विषारी विचार त्याकाळी समाजामध्ये जाणीवपूर्वक पसरविला होता.निर्धार केल्याप्रमाणे भाऊरावांनी आपल्या मुलांना शाळेत टाकले.त्यांची मुले उपजतच हुशार होती. तल्लख बुद्धीची होती.त्यामध्ये ज्ञानेश्वर सर्वात हुशार होता.त्यांच्या गुरुजनानी त्यांच्या बौद्धिक शक्तीचे, हुशारीचे कौतुक करून त्याला जास्तीत जास्त शिकविण्याचा सल्ला , सूचना त्यांच्या वडीलाला दिला. भाऊरावाना त्यांच्या सूचनेबद्दल आनंद झाला.त्यांनी तर अगोदरच कोणत्याही परिस्थितीत येणाऱ्या अडीअडचणीला तोंड देत, उपासपोटी जीवन जगत मुलांना शिकविण्याचा निर्धार केला होता.त्यात गुरुजनांच्या आणि समाजासाठी अर्थात समाजाच्या कल्याणासाठी मातृ कळवळयाने तळमळण्याचा त्याग करणाऱ्या सुजाण,सुसंस्कृत लोकांच्या वडिलधाऱ्यांच्या सूचनेची भर पडली.त्यांचा मान ठेवून आदर करून त्यांनी ज्ञानेश्वरला शिक्षण दिले. ज्ञानेश्वरनी दहावी झाल्यावर अध्यापन पदविका प्राप्त केली आणि त्यांना जि. प. शिक्षक म्हणून नोकरी मिळाली.त्यांची पहिली नेमणूक परभणी जिल्ह्यात कसर या गावी जि. प.शाळेत झाली.त्यानंतर त्यांनी अंबानगर जि.लातूर,  संगम ता. देवणी ,रावणगाव ता.उदगीर, वायगाव ता.शिरूर अनंतपाळ येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून प्रामाणिकपणे सेवा केली. त्यांनी सुसंस्कृत विद्यार्थी, नागरीक घडविण्याचे निष्ठापूर्वक प्रयत्न केले.ज्या ज्या ठिकाणी त्यांनी नोकरी केली त्या त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या आईवडिलांशी, पालकांशी व गावातील लोकांशी प्रेमाने बोलत - वागत, त्यांच्यात मिळून - मिसळून राहत सेवा केली. आपल्याविषयी लोकमनात असलेल्या प्रेमभावनेला, विश्वासाला तडा जाईल असे काम केले नाही.समाजामध्ये विद्यार्थ्यांपुढे वावरताना सदाचार ,विचार व उच्चार करीत ते वावरले. अशा व्यक्ती समाजाला प्रिय असतात. अशाप्रकारचे सत्यनिष्ठ व सर्वांशी प्रेमाने बोलत जीवन जगणाऱ्या लोकांच्या रांगेत ज्ञानेश्वर बडगे सरांचा अग्रक्रम लागतो.हे त्यांच्या आचार विचार व उच्चारातून अर्थात आदर्श जीवनातून सिद्ध होते.
     सद्या ते उदगीर तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा तिवटग्याळ येथे विद्यार्थीप्रिय आदर्श शिक्षक व मुख्याध्यापक  म्हणून कार्यरत आहेत.शाळा तपासणीसाठी येणारे अधिकारी त्यांची शाळा तपासणीसाठी येत नाहीत तर त्यांच्या शाळेत गुणवत्ता विकास उपक्रमातून काही घेण्यासाठी येतात.या ठिकाणी आलेले अनुभव पाहिलेले स्तुत्य उपक्रम इतर शाळेत गेल्यानंतर तेथील विद्यार्थी व शिक्षकांना सांगतात.त्यांनी ज्या ज्या शाळेवर नोकरी केली ती शाळा म्हणजे बडगे सरांची शाळा असे रसायन निर्माण झाले.ज्या शाळेत त्यांनी सेवा केली त्या शाळांना त्यांनी मंदिरे बनविले.नववधुसारखे सजविले.आणि त्या मंदिरातील विद्यार्थ्यांना सदैव दैवत मानून अध्यापनाचे प्रामाणिक कार्य केले.
        भिंतीवर सुविचार, थोरांचे विचार, प्रेरणादायी म्हणी, संविधान, पसायदान, खरा तो एकचि धर्म, प्रार्थनारुपी संस्कारक्षम कविता, प्रतिज्ञा, राष्ट्रगीताचे शुद्ध व वळणदार अक्षरात लेखन करून भिंती बोलक्या केल्या.ऋषी मुनीनी, साधू संतांनी, साने गुरुजी, महात्मा गांधी व अन्य महान व्यक्तींनी सांगितलेल्या विचाराचे अर्थात दया, क्षमा, शांती, प्रेमभाव, सेवाभाव, बंधुत्व, मित्रत्व, पुत्रत्व, माणुसकी यासम मानवी मूल्यांचे संस्कार करून सुसंस्कारी विद्यार्थी, पिढ्या व नागरीक घडविण्याचे पवित्र कार्य केले. लहान मुलांना शिकविताना त्यांच्या भावना, बौद्धिक क्षमता लक्षात घेऊन त्यांच्यासम लहान होवून बालमानस शास्त्रानुसार कृती केली.त्यानुसार अध्यापन केले.उदाहरण घेवून सांगायचे झाल्यास __
" धरू नका ही बरे!
  फुलावर उडती फुलपाखरे !"
यासम कविता, पाठ शिकवताना मुलांना बागेत किंवा मोकळ्या रानफुले असलेल्या निसर्ग सुंदर स्थळी घेवून जावून त्यांच्यासम लहान होवून वाकून फुलझाडे, फुले, फुलपाखरे यांना हळूच स्पर्श करीत त्यांच्यासोबत आनंदाने बागडत, हसत, खेळत त्यांची मने प्रसन्न आनंदी होतील अशी कृती, कृतिशील अध्यापन ते करतात.हेच त्यांच्या संस्कारक्षम अध्यापनाचे खरे रहस्य व सार आहे.
      नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, गणित स्पर्धा परीक्षा यासम स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थी बसवून ते त्यासाठी पात्र ठरावेत म्हणून वेगळे तास घेवून प्रामाणिक प्रयत्न केले.त्यांच्या या स्तुत्य प्रयत्नातून अनेक विद्यार्थी नवोदय विद्यालय प्रवेशासाठी व शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहेत.त्यांचे भावी जीवन उज्वल झाले आहे.वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी घडविलेले, शिकविलेले विद्यार्थी नोकरीत असून त्या माध्यमातून राष्ट्र व समाजसेवा करीत आहेत. आदर्श नागरीक म्हणून समाजामध्ये वावरत आहेत.जनसेवा करीत आहेत.त्या त्या ठिकाणी कार्य करीत असताना त्यांचे विद्यार्थी त्यांच्या नावाचा अतिशय आदराने उल्लेख करतात.पण याबद्दल सराना कधीही गर्वाने स्पर्श केला नाही ना याबाबीचे त्यांनी श्रेय घेतले नाही.विद्यार्थ्यांना दैवत मानूनच त्यांनी त्यांची सेवा केली आहे.अशा स्पर्धा परीक्षेशिवाय विज्ञान प्रदर्शन, क्रीडा स्पर्धा, वक्तृत्व, नृत्य, गायन स्पर्धाचे आयोजन करून विद्यार्थ्याचे निसर्गदत्त सुप्त गुणांना, कलाना विकसित करण्याचे कार्य केले आहे.आज ते एक आदर्श विद्यार्थी व जनप्रिय मुख्याध्यापक म्हणून समर्पित भावनेने ,मातृ कळवळयाने कार्य करीत आहेत.त्यांच्या कार्याची नोंद घेवून त्यांना तालुका, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर शासकीय व संस्थांचे दिले जाणारे पुरस्कार त्यांना मिळाले.यातील विशेष असे की, त्यांच्यामुळे त्या त्या पुरस्काराची उंची , मोठेपण वाढले आहे.हे सत्य काहींचे मोठेपण पुरस्काराने वाढते . यास बडगे सर व त्यांच्यासम समर्पित सेवा देणारी लोकोपयोगी कार्य करणारी काही व्यक्ती अपवाद आहेत.त्यांना मिळालेल्या पुरस्काराचा थोडक्यात उल्लेख करणे उचित वाटते.ते असे, मुंबई एकता सेवाभावी संस्थेचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार, मुंबईचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार, नवरंग प्रतिष्ठानचा आदर्श शिक्षक पुरस्कार, डॉ.ना. य.डोळे  आदर्श शिक्षक पुरस्कार, पुणे येथील महाराष्ट्रभूषण पुरस्कार, नवी दिल्लीचा महात्मा फुले राष्ट्रीय फेलोशिफ पुरस्कार, ठाणे, मुंबई विद्याभूषण आदर्श शिक्षक पुरस्कार, सर्वांग सुंदर शाळा पुरस्कार रोख रक्कम १० हजार, गोवा येथील विश्वरत्न आंतरराष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रीय महात्मा फुले पुरस्कार, लातूर मानव विकास संस्थेचा राज्यस्तरीय  आदर्श शिक्षक पुरस्कार, पुणे येथील मां तुझे सलाम पुरस्कार, गाडगे बाबा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, राष्ट्रीय गोंधळी समाज रत्न पुरस्कार.त्यांना मिळालेल्या या पुरस्कारापुढे माझा माथा स्वाभाविकरित्या नम्र झाला असून जेथे दिव्यत्वाची प्रचिती तेथे कर माझे जुळती! या न्यायाने माझा माथा व हात नम्र झाले आहेत.त्यांनी मानवता धर्म, शिक्षक धर्म यास अनुसरून केलेले कार्य सेवा आणि विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी कल्याणासाठी केलेली धडपड लक्षात घेता बडगे सर म्हणजे गुरुकुलातील पाठशालेच्या अभंग, आदर्श व पवित्र अध्यापनाचा वारसा निष्ठेने चालविणारे , जपणारे एक सच्चे शिक्षक वा आचार्य होत.हे सत्य सरांच्या वाढदिवसानिमित्त हा वारसा चालविण्यासाठी , शिक्षक धर्म पाळण्यासाठी त्यांना उदंड भरपूर आयुरारोग्य लाभो यासाठी ईश्वर चरणी विनम्र प्रार्थना व सराना लाख लाख शुभेच्छा !

    प्रा. वा. ल. श्रीमंगले
     गजानन नगर, नायगाव
     जि.नांदेड

No comments:

Post a Comment