मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रशिक्षणार्थी श्रीम. नंदगावे मुक्ताबाई यांचे सहामहिने पुर्ण निमित्ताने निरोप सत्कार संपन्न*
तिवटग्याळ - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता.उदगीर जि लातूर येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून सहा महिने पुर्ण निमित्ताने आज दिनांक 5 मार्च 2025 रोजी शाळेच्या द्वितीय वेळी श्रीम. नंदगावे मुक्ताबाई यांना कार्यमुक्त करुन निरोप सत्कार सोहळा आयोजित करुन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार व मदतनीस भागाबाई यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी शाळेतील विद्यार्थी, शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार व मदतनीस भागाबाई आदी जणांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनाही व शाळेतील शिक्षकांनी मॅडम ला पुढील शैक्षणिक कार्यास हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
No comments:
Post a Comment