*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची शैक्षणिक सहल विश्वशांती बुध्दविहार उदगीर, हिंदी चित्रपट "छावा"*
उदगीर-आज दिनांक 4 मार्च 2025 रोजी तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची शैक्षणिक सहल उदगीर येथील विश्वशांती बुध्दविहार उदगीर, हिंदी चित्रपट "छावा" पाहण्यासाठी शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली. प्रथम उदगीर येथील विश्वशांती बुध्दविहारास भेट दिली. संपूर्ण बुध्द विहार पाहण्यात आला. ध्यानचिंतन केंद्रात ध्यानचिंतन करण्यात आले तद्नंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी भारतीय तत्त्वज्ञ, ध्यानी, आध्यात्मिक शिक्षक व समाजसुधारक होते. 'गौतम बुद्ध', 'शाक्यमूनी बुद्ध', 'सिद्धार्थ गौतम', 'सम्यक सम्मासंबुद्ध' ही त्यांची अन्य नावे आहेत.शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन व त्यांची पत्नी महाराणी महामाया (मायादेवी) यांच्या पोटी इ.स.पू. ५६३ मध्ये लुंबिनी येथे बुद्धाचा जन्म झाला. या राजकुमाराचे नाव ‘सिद्धार्थ’ (पाली भाषेत सिदत्थ गोतम) असे ठेवण्यात आले. सिद्धार्थाच्या जन्मानंतर अवघ्या सातव्या दिवशीच त्यांची आई महामाया यांचे निधन झाले. आईचे छत्र हरवलेल्या सिद्धार्थाचा सांभाळ त्यांची मावशी व सावत्र आई महाप्रजापती गौतमी यांनी केला. त्यामुळे राजकुमार सिद्धार्थाला ‘गौतम’ या नावानेही ओळखले जाते. राजकुमार सिद्धार्थ गौतमास आवश्यक असे सर्व शिक्षण देण्यात आले. इ.स.पू. ५४७ मध्ये यशोधरा या सुंदर राजकुमारीशी सिद्धार्थ गौतमाचा विवाह झाला व पुढे त्यांना राहुल नावाचा एक पुत्र झाला.बुद्ध" हे नाव नाही तर ज्ञानाची उपाधी आहे, ‘बुद्ध’ 'आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी' आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी स्वप्रयत्नांनी मिळवली आहे. गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान हे पाली भाषेमध्ये मांडले गेले आहे. त्रिपिटकाच्या माध्यमातून या तत्त्वज्ञानाची माहिती मिळते. भारत हे बौद्ध धर्माची मूळ भूमी असले तरी भारताबाहेर ही मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार घडून आला. आजही अनेक देशांमध्ये बौद्ध धर्म हा खूप चांगल्या स्थितीमध्ये असलेला पाहायला मिळतो अशी सविस्तर माहिती दिली. विश्वशांती बुध्दविहार पाहणीनंतर उदगीर येथील कल्पना टॉकीज मध्ये ऐतिहासिक हिंदी चित्रपट "छावा" दाखविण्यात आला. ओळखतात. या शैक्षणिक सहलीसाठी शाळेतील सर्व विद्यार्थी,शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर, मुक्ता नंदगावे, शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले, शाळेचे पालक शंकर कांबळे, आनंद कांबळे, विशाल तवर, माधव कांबळे, रमेश वाघमारे आदी जन शैक्षणिक सहलीसाठी उपस्थित होते.शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक सहलीचा आनंद घेतला व शैक्षणिक सहल आयोजन बदल खुप आनंदायी , उत्साह,व लय भारी मजा आली व खुप काही माहिती मिळाली असे विद्यार्थ्यांनी व पालकांनी बोलून दाखवले. या शैक्षणिक सहलीसाठी उपस्थित राहून मदत व सहकार्य केल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले*
No comments:
Post a Comment