*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा*
तिवटग्याळ - दिनांक 28/2/2025 रोजी तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत परीपाठानंतर मोठ्या उत्साहात डॉ. सी.व्ही. रमन यांची जयंती राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात आला . प्रथम शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी उपस्थित सर्वांना सांगितले की आज 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो .भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. विज्ञानाच्या फायद्यांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्यासाठी 'राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद' आणि 'विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या' अंतर्गत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो.रामन इफेक्टचा शोध लागल्याने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. या शोधाची घोषणा भारतीय शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकटरामन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी केली होती. या शोधाबद्दल त्यांना १९३० मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.अशी सविस्तर माहिती दिली. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षीका मुक्ता नंदगावे , शा. पो. आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले, गीताताई कच्छवे व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment