Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Friday, January 25, 2019

रावणगावात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा. उदगीर वार्ता..........रावणगाव ता.उदगीर येथे भाग क्रमांक 311 चे केंद्र स्तरीय मतदान अधिकारी श्री ज्ञानेश्वर बडगे, गावाचे प्रथम नागरिक मा.सरपंच प्रल्हादराव सुर्यवंशी, मष्णाजी गायकवाड व गावातील नागरिक यांच्या उपस्थितीत दिनांक 25/1/2019 रोजी राष्ट्रीय मतदार दिवस या निमित्ताने शाळेतील विद्यार्थी व नागरीक यांना घेऊन गावात विविध घोषवाक्य म्हणण प्रभातफेरी काढण्यात आली.मतदार राजा जागा हो, लोकशाही चा धागा हो.मतदान हमारा अधिकार है‌.जो विकास के काम करेंगे। वोट उन्हों को नाम करेंगे। वोट डालने जाना है। अपना फर्ज निभाना है। लोकतंत्र का भाग्य विधाता। होता जागरूक मतदाता। लोकतंत्र का यह आधार। वोट न कोई हो बेकार। छोडो अपने सारे काम। पहले चलो करें मतदान। वोट करें वफादारी से ‌। चयन करें समझदारी से। बुढा हो या जवान। सभी करें मतदान.या घोषणा दिल्या.तसेच रॅली नंतर उपस्थित सर्व मतदारांना मतदारांची सामुदायिक प्रतिज्ञा घेण्यात आली. मतदारांसाठी प्रतिज्ञा आम्ही भारताचे नागरिक ‌लोकशाहीवर निष्ठा ठेवून या द्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपराचे जतन करू आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखु व प्रत्येक निवडणुकीत निर्भय पणे तसेच धर्म,वंश,जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभणास बळी न पडता मतदान करू. या नंतर उपस्थित सर्वांचे केंद्र स्तरीय अधिकारी श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी आभार मानले. या वेळी शाळेतील विद्यार्थी व नागरीक उपस्थित होते.

रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आदर्श मातांचा सत्कार. उदगीर वार्ता........ रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक 24/1/2019 रोजी महीला मेळावा आयोजित करण्यात आला.या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सदस्यां सौ.सुनिता गोंदेगावे,व प्रमुख पाहुणे सौ.तस्लीमबी पटेल, शोभा कोयले, श्रीमती सुरेखा जाधव, आदी जण उपस्थित होते.प्रथम क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी प्रास्ताविकात महीला मेळावा, आदर्श मातांचा सत्कार व हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे असे सांगितले. मूख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी प्रास्ताविकात शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती सांगितली. तसेच या महीला मेळाव्यातील विषयावर सविस्तर माहिती दिली. मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी महीला मेळाव्यात उपस्थित सर्व महिलांना बालसंगोपन, शिक्षणाची गरज व आवश्यकता, स्त्रि पुरुष समानता. महिला सक्षमीकरण, नैतिक मूल्ये, संस्कार, आई म्हणून पालकांची जबाबदारी, कौंटुबिक नातेसंबंध व जिव्हाळा,कालची व आजची स्त्रि, कुटुंब पद्धती या विषयावर सविस्तर माहिती दिली. तसेच पंचायत समिती सदस्या सौ सुनिता गोंदेगावे यांनी उपस्थित सर्व महिलांना आपल्या मुलांना चांगले शिक्षण देणे गरजेचे आहे असे सांगितले, महीला सक्षमीकरण करणे आवश्यक आहे असे सांगितले तसेच मूलांना चांगले संस्कार द्यावे असे सांगितले. तसेच मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी वर्गातील हुशार मुलगा व मुलगी यांच्या आई चा आदर्श मातां म्हणुन सत्कार करण्यात येणार आहे असे सांगितले व खालील मातांचा सत्कार करण्यात आला या मध्ये सौ. अश्विनी गायकवाड,सौ.आसमा पटेल,सौ.अयोथ्या गायकवाड,सौ.सुनंदा गायकवाड.सौ.तस्मीमबी पटेल.सौ. अर्चना गायकवाड,सौ.चांदबी सय्यद,सौ.नसरीन सय्यद,सौ‌.नजमा शेख.सौ.आयेशा सय्यद, श्रीमती कविता कांबळे,सौ.शाहीन शेख,सौ.यासीन सय्यद,सौ.जहीराबी शेख,सौ.जैतुनबी सय्यद,सौ.रेश्मा शेख,सौ.रहिमा सय्यद,सौ.नसरीन सय्यद,सौ.मालन मनियार,सौ.वजीरबी सय्यद,सौ.वहीदाबी शेख,सौ.तैसिन सय्यद,सौ.शमा मुरशेद,सौ.सोनाली सुर्यवंशी आदी मातांचा आदर्श मातां म्हणुन सत्कार करण्यात आला. सत्कारा नंतर उपस्थित सर्व महिलांना मकर संक्रांती विषयावर सविस्तर माहिती दिली व तिळगुळ व वाण वहि व पेन देऊन मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. या महीला मेळाव्याचे सुत्रसंचलन शिक्षीका सुनिता पोलावार व आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले.

Saturday, January 19, 2019

मराठवाड्यातील सर्वाधिक उंचीचा तिरंगा ध्वज ध्वजारोहण व लोकार्पण सोहळा संपन्न

मराठवाड्यातील सर्वाधिक उंचीचा तिरंगा ध्वज ध्वजारोहण व लोकार्पण सोहळ्यात शेल्हाळ व बेलसकरगा शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांची उपस्थिती.




लातुर वार्ता---------दिनांक 18/1/2019 रोजी सकाळी ठिक 9.30 वाजता महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री मा.ना.विनोद जी तावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण व लोकार्पण सोहळा संपन्न झाला. मराठवाड्यातील सर्वाधिक उंचीचा तिरंगा ध्वज आज लातूर येथे फडकला. दीडशे फूट उंच असलेल्या तिरंगाचे ध्वजारोहण आणि लोकार्पण सोहळा आज शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते लातूरच्या क्रीडा संकुलावर करण्यात आला. लातूरच्या क्रीडा संकुल मैदानावर देशभक्तीचे प्रतीक असणाऱ्या राष्ट्रीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते पार पडला. मराठवाड्यातील सर्वात उंच असलेल्या १५० फूट उंचीच्या तिरंगा ध्वजवंदनच्या या कार्यक्रमासाठी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आमदार सुधाकर भालेराव, आमदार विनायक पाटील, आमदार विक्रम काळे, माजी खा. रूपाताई पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, सीईओ विपीन इटनकर, जि. प. अध्यक्ष मिलिंद लातुरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे, स्थायी समिती सभापती शैलेश गोजमगुंडे यांच्यासह कार्यक्रमासाठी अकरा हजार एकशे अकरा विद्यार्थी व असंख्य नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्हिडिओ गेम छोडो मैदानसे नाता जोडो असा संदेश विद्यार्थ्यांना दिला. लातूर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात चांगले आणि सुसज्ज क्रीडा संकुल उभे करणार असल्याचंहि सांगितलं. लातुरात मराठवाड्यातील सर्वात उंच तिरंगा ध्वज राष्ट्रभक्तीचे प्रतीक असल्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटले. 

याप्रसंगी ११ राष्ट्रभक्तीपर गीतांचं गायन देखील करण्यात आले. मनमोहक दृश्याने सर्वांचीच मने जिंकली. मोठ्या थाटात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

या सोहळ्यासाठी उदगीर तालुक्यातील शेल्हाऴ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व बेलसकरगा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व श्रीमती मंगल केंद्रे, आशा काळे,ज्ञानेश्वर बडगे, चंद्रकांत कांबळे आदी शिक्षकांनी सोहळ्यास उपस्थिती नोंदवली.

रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा. उदगीर वार्ता---------रावणगा्व नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीतील विद्यार्थी सय्यद अमन रियाजोदीन यांचा वाढदिवस शाळेच्या परीपाठा नंतर शाल, पुष्पहार व पुस्तक भेट देऊन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शिक्षीका सुनिता पोलावार व कलावती मेहत्रे यांच्या हस्ते व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत खूप मोठ्या उत्साहाने वाढदिवस साजरा करण्यात आला.सर्व विद्यार्थ्यांनी Happy birthday to you many many happy returns of the day. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. या वेळी शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Saturday, January 12, 2019

रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहाने भाषा संगम उपक्रम साजरा. उदगीर प्रतिनिधी......... दिनांक 12/1/2019 रोजी रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहाने भाषा संगम हा उपक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. प्रथम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अकबर पटेल. मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे.शिक्षीका सुनिता पोलावार,कलावती मेहत्रे, सुरेखा जाधव यांनी स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी केली. तद्नंतर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती दिली. शिक्षीका सुनिता पोलावार यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती दिली.शाळेतील विद्यार्थी गायकवाड सुविधा ,गायकवाड यशवंत . पटेल समीर. गायकवाड आदर्श.कांबळेआशा,गायकवाड प्रांजली. सय्यद तैरीम. गायकवाड रोहित.शेख इस्राईल. यांनी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित भाषणे केली व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित गीत सादरीकरण केले, या गीतांनी शालेय वातावरण खुप दणदणून गेले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सांगितले की आज आपल्या शाळेत भाषा संगम हा उपक्रम राबवयाचा आहे असे सांगितले. सर्व विद्यार्थी हिंदू, मुस्लिम,ख्रिश्चन, या विविध धर्माचे पोषाख घालून संवाद साधला. नमस्कार,तूझे नाव काय आहे, कोणत्या इयत्ता मध्ये आहे,तुझे गाव कोणते आहे. अशा विविध वाक्याने सर्व विद्यार्थ्यांनी संवाद साधला.हा उपक्रम राबविताना सर्व विद्यार्थी आनंदी व उत्साहीत झाले. विद्यार्थी खूप रममान झाले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व आभारप्रदर्शन शाळेचे शिक्षीका सुनिता पोलावार ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले.

Monday, January 7, 2019

रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रसारित करण्यात आलेली शैक्षणिक बातमी

रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा. उदगीर वार्ता---------रावणगा्व नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीतील विद्यार्थी सय्यद जिशान खमर यांचा दहावा वाढदिवस शाळेच्या परीपाठा नंतर शाल, पुष्पहार व पुस्तक भेट देऊन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांच्या हस्ते व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत खूप मोठ्या उत्साहाने वाढदिवस साजरा करण्यात आला.सर्व विद्यार्थ्यांनी Happy birthday to you many many happy returns of the day. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. या वेळी शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहाने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी उदगीर प्रतिनिधी......... दिनांक 3/1/2019 रोजी रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहाने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रथम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अकबर पटेल. मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे. यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी केली. तद्नंतर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती दिली.शाळेतील विद्यार्थी इयत्ता पहिली तील गायकवाड सुविधा व गायकवाड यशवंत . पटेल समीर.यांनी खुप सुंदर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भाषणे केली.तसेच गायकवाड आदर्श.कांबळे आशा.गायकवाड प्रांजली. सय्यद तैरीम. गायकवाड रोहित.शेख इस्राईल. यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सविस्तर भाषणे दिली.तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित खूप सुंदर गीत साऊ पेटी मशाल, धन्य सावित्री माता,गोड गुणांची गोड मनाची माता सावित्रीबाई फुले,वसा सावित्री चा आम्ही जागवू हे गीत सादरीकरण केले, या गीतांनी शालेय वातावरण खुप दणदणून गेले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले.