" शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रम . १)आदर्श परीपाठ २)मराठी भाषेत परीपाठ 3)इंग्रजी भाषेत परीपाठ ४)दिनांकानुसार पाढा ५)बोधकथा ६)चित्रकला स्पर्धा ७)वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ८)सांस्कृतिक कार्यक्रम ९)गीतगायन स्पर्धा १०)भाषण स्पर्धा ११)क्रीडा स्पर्धा १२)वाढदिवस साजरे करणे। १३)भित्तिपत्रक तयार करणे १४)निसर्गसहल १२)स्वच्छता सप्ताह साजरा करणे १३)विद्यार्थी दत्तक घेणे १४)विविध जयंत्या व पुण्यतिथी १५)बचत बँक १६)हस्ताक्षर सुधार १७)हजेरी घेताना इंग्रजी शब्द १८)वाचन कट्टा १९)बाजार २०)परसबाग २१)उपस्थिती ध्वज २२)इंग्रजी संभाषण २३)शब्द बँक २४)स्वच्छ मुलगा-मुलगी २५)दत्तक कुंडी प्रकल्प २६)तंबाखू मुक्त शाळा २७)दत्तक मित्र २८)वर्तमानपत्र वाचन २९)विविध क्रीडा स्पर्धा ३०)चित्रकला स्पर्धा, ३१)निबंध लेखन ३२)वक्तृत्व स्पर्धा आयोजन ३३)हस्ताक्षर स्पर्धा ३४)दप्तराविना शाळा ३५)शब्द बाग Garden of words ३६)हस्ताक्षर सुधार प्रकल्प ३७)राजा काय म्हणतात ३८)प्रश्न आमचे ,उत्तर आमचे ३९)वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ४०)शिक्षकाचे व विद्यार्थ्यांचे सत्कार ४१)कला, कार्यानुभव कोपरे ४२)बाल आनंद मेळावे ४३)विविध विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन ४४)प्रवेशोत्सव ४५)100% पटनोंदणी ४६)लघु उद्योगाला भेटी ४७)हरित शाळा ४८)पक्ष्यांना खाऊ ४९)ज्ञानरचनावादी साहित्य ५०)डिजीटल शाळा ५१)आनंदायी शाळा, Happy school स्कूल"

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

मा. मुख्याध्यापक श्री ईस्माईल गुलाबसाब मुजेवार यांचा सेवा निवृत्त निमित्त निरोप सत्कार सोहळा

*मा. मुख्याध्यापक श्री इस्माईल मुजेवार यांचा सेवा निवृत्ती निमित्ताने निरोप सत्कार सोहळा संपन्न*

   
   *🏵नुकतेच नियतवयोमानानुसार सेवा निवृत्त झालेले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय व्यक्तिमत्व श्री ईस्माईल गुलाबसाब मुजेवार  दिनांक 30/6/2020 रोजी सेवा निवृत्त झाल्यामुळे बोळेगाव बु.शाळेच्या  वतीने आज दिनांक 3/7/2020 रोजी शाळेचे मुख्याध्यापक साहेबांचा गेल्या सहा वर्षातील कार्यकाल नक्कीच स्वप्नवत होता यात कुणालाही शंका नाही..*

 *🏵सकारात्मक वृत्ती असलेला त्यांचा दृष्टिकोन,त्यांच्या अंगी असलेला एक उपक्रमशील मुख्याध्यापक,समोरच्या व्यक्तीला जिंकण्याची असलेली मृदू व अविट भाषा,निस्वार्थ सेवावृत्ती,अशा  अनेक सद्गअशा सर्वांच्याच हृदयात स्थान मिळवले होते...*

  *🏵अशा या आदर्श व्यक्तिमत्वाचा सेवा निवृत्ती निमित्ताने सत्कार  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु. सभागृहात शिक्षक बांधवांकडून  संपन्न झाला..*

 *🏵या कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व्यंकटराव खटके, पोलिस पाटील व्यंकटराव गौंड, गावातील प्रतिष्ठित नागरिक, शाळेतील शिक्षक, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.तसेच यांचाही भारतीय संस्कृती प्रमाणे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे निमित्ताने सत्कार  करण्यात आला..*

*🏵 या निरोप समारंभात  जिल्हा परिषद  प्राथमिक शाळा बोळेगाव बु घे प्रभारी मुख्याध्यापक श्री चंद्रकांत कोरे, सुदर्शन पाटील,, श्री ज्ञानेश्वर बडगे, श्रीमती  मजलसा पुठ्ठेवाड, यांनी साहेबांच्या कामकाज, शैक्षणिक क्षेत्रात चांगली कामगिरी बजावली या बाबतीत मनोगतातून सर्वांनी कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक होते असे व्यक केले.*

  *🏵 या निरोप सत्कार सोहळ्यासाठी  शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, गावातील प्रतिष्ठित नागरिक  उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वीसाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी निरोप सत्कार समारंभासाठी  परीस्रम घेतले..*
























*🏵 या निरोप समारंभाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक श्री सुभाष नरवडे व आभार श्री सुदर्शन पाटील यांनी मानले*

No comments:

Post a Comment