*मला आवडलेला व्यायाम विषयावर लेख, खूपच सुंदर व महत्त्वपूर्ण*
-------------------------------------
*_व्यायामाला कोणताच पर्याय नाहीं._*
~~~~~~~~~~~~
*_अत्यंत महत्वपुर्ण लेख_*
*_आरोग्याच्या बाबतीत समाजात अनेक 'लाटा' उसळत असतात व कालांतराने त्या ओसरतात... त्याला आता सोशल मीडियाची जोड मिळाल्याने लाटा जरा जोरकस वाटतात._*
*_पूर्वी गव्हांकूराची प्रचंड लाट होती. प्रत्येक बाल्कनी - टेरेस - अंगणात गव्हांकुर पिकू लागले. कॅन्सर, डायबेटीस, बी.पी. गायब होणार आणि एकदम तंदुरुस्त होणार...!_*
*_कैक टन गव्हांकुर संपले. मानसिक समाधानापलीकडे विशेष काही घडले नाही व लाट ओसरली !_*
*_अल्कली WATER... ह्याची लाट तर जणू अमृतच मिळाले अशी होती. म्हणाल तो रोग समूळ नष्ट होणार. २० हजार - ३० हजार मशीनची किंमत.. मशीन्स धूळ खात पडली... लाट ओसरली !!_*
*_सकाळी उठल्या उठल्या मध-लिंबू-पाणी, वजन घटणार, बांधा सुडौल होणार, हजारो लिटर मध संपले. हजार मिलीग्रामपण वजन नाही घटले. लाट ओसरली !!!_*
*_मग आली नोनी फळाची लाट. नोनीने नानी आठवली पण तीही लाट नानी व नाना पार्क मधून वैकुंठाला घेऊन गेली._*
*_अलोव्हेरा ज्यूस... सकाळ संध्याकाळ प्या.. डायबेटीस, बी.पी. एकदम नॉर्मल होणार.. हजारो बाटल्या खपल्या... विशेष काही बदलले नाही... लाट ओसरली !_*
*_मग रामदेव बाबांची बिस्किटे आली ५०००करोड चा व्यवसाय झाला. परिस्थिती आहे तीच._*
*_मग माधवबागवाले आले. तेल मसाज पंचकर्म करा हृदयाचे ब्लॉक घालवा. राहता ब्लॉक विकायला लागला पण हृदयाचा ब्लॉक गेला नाही. (आता माधव बाग जाहिरात करतात की डायबिटीस पूर्ण घालवतो.)_*
*_मग आली दिवेकर लाट, मग आली दीक्षित लहर_.*
*_आता तर जग दोन भागात विभागले आहे. दार उल दिवेकर आणि दार उल दीक्षित_.*
*_ही लाट आता उसळ्या घेतेय... ओसरेल लवकरच !!!!!_*
*_लक्षात घ्या मंडळी, कुठच्याही गोष्टीबद्दल माझा पूर्वग्रह नाही वा आकसही नाही पण काळानुसार बिघडलेल्या जीवनशैलीचे दुष्परिणाम आपण भोगतोय_.*
*_डोकं वापरा आणि Just एक पिढी मागे जाऊन आजी आजोबा कसे जगत होते हे आठवा._*
*_आणखी थोडं डोकं लावा. आयुर्वेद म्हणजे जगण्याचा वेद म्हणजे नियम शास्त्र. रोजचे शाकाहारी जेवण पालेभाजी, वेलवर्गीय भाजी, फळभाजी, मोडआलेली कडधान्य, सँलड, साजुक तूप, बदलते गोडेतेल, गहूँ, ज्वारी, बाजरी, व मिश्रपिठाची भाकरी पोळी व सोबत थोडा व्यायाम..._*
*_पहा काय फरक पडतो. लोकांना शिस्त नकोय... जीभ चटावलीय.. पैसा बोलतोय... "स्वयंपाक नकोय..." आता तर घरपोच... पंधरा मिनीटात..._*
*_.....आली लाट मारा उड्या._*
*_हसत खेळत जगा, पण सर्वात महत्त्वाचे व्यायाम करणे आवश्यक आहे बस्स!!!_*
*_सकाळी लवकर उठणं, रात्री लवकर झोपणं, दुपारी थोडीशी विश्रांती घेणं आवश्यक आहे. आपल्या प्रकृतीनुसार व्यायाम करणं सातत्याने आवश्यक आहे._*
*_आपल्या कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाइलमध्ये व्हायरस शिरू नये म्हणून आपण जितकी काळजी घेतो, तेवढी काळजी आपण त्यापेक्षाही महत्त्वाच्या असणाऱ्या आपल्या शरीराची घेत नाही. तर सुरुवात करायला काय हरकत आहे?_*
*_दिर्घायुष्य लाभावं, आरोग्याच्या कोणत्याही तक्रारी निर्माण होऊ नयेत, या करीता आपला आहार, आपलं राहणीमान योग्य असणं महत्वाचं आहे_.*
*_आपल्या प्रकृतीनुसार आहार घेण्याचा प्रयत्न करा. प्रकृतीविरुद्ध आहार घेतल्यास शरिरात विकार निर्माण होतात._*
*_या व्यायामात नियमितता व सातत्य असावं. दर दोन-तीन महिन्यांनी व्यायाम प्रकारात बदल जरूर करा._*
*_आणि हो,_*
*_या सर्वांसोबत मानसिक शांतताही राखा. ताणतणाविरहित जीवन जगा. ध्यान, धारणा, योगासनं, प्राणायाम करा. ज्यामुळे तुम्ही नक्कीच स्ट्रेस फ्री (stress free) राहू शकाल...._*
*_आजपासून सर्वांनी व्यायाम सुरू करून त्यात सातत्य ठेवावे व सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे हीच सदिच्छा व हार्दिक शुभेच्छा.._*
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺

No comments:
Post a Comment