Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Thursday, December 31, 2020

*विशेष इंग्रजी तास: इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी डीडी सह्याद्रीवरील इंग्रजी विषयासाठी कार्यक्रम*

*विशेष इंग्रजी तास: इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी डीडी सह्याद्रीवरील इंग्रजी विषयासाठी कार्यक्रम*


नुतन प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्रीमान बोईनवाड साहेबांनी बोळेगाव बु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील "बाला उपक्रम" विषयावर आढावा घेण्यात आला.*

*नुतन प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्रीमान बोईनवाड साहेबांनी बोळेगाव बु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील "बाला उपक्रम" विषयावर आढावा घेण्यात आला.*


   




*बोळेगाव बु - आज दिनांक 31/12/2020 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु. ता. शि. अनंतपाळ जिल्हा लातूर येथे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री अभिनव गोयल साहेब यांच्या संकल्पनेतून  बाला उपक्रम राबविण्यासाठी  शि.अनंतपाळ तालुक्याचे नुतन प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्रीमान बोईनवाड साहेब, कांबळगा व हिसामाबाद केंद्राचा केंद्र प्रमुख पदाच्या पदभार स्वीकारणारे  श्रीमान  विठ्ठल वाघमारे साहेब, आदी जण बाला उपक्रमासाठी आढावा घेण्यासाठी शाळेत भेट दिली. तदनंतर शाळेत छोटेखानी सत्कार करण्यात आला. सत्कार सोहळा नंतर नुतन प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्रीमान बोईनवाड साहेबांनी बाला उपक्रमासाठी आढावा घेतला. व तसेच काही राहिलेल्या शाळेतील वर्गखोल्या व संरक्षण भिंत, अम्पीथियटर, लपंडाव भिंत, उंची मोजण्यासाठी मोजमापे, ई- लर्निग, डिजिटल वर्ग, शाळा, रंग रंगोटी, बाला उपक्रमातील व इतर आवश्यक व कल्पकतेने उपक्रम राबविण्यात यावे असे सविस्तर माहिती सांगितली व मार्गदर्शन केले.  या वेळी केंद्र प्रमुख श्री विठ्ठल वाघमारे उपस्थित होते.शाळेचे मुख्याध्यापक श्री माधवराव पारशेट्टे यांनी शाळेतील सर्व शिक्षकांच्या वतीने बोळेगाव बु. जिल्हा परिषद शाळा तालुक्यात व जिल्ह्यात बाला उपक्रम निश्चितच टाॅप मध्ये राहिल असे सांगितलेले व उपस्थित सर्वांचे आभारमानले. यावेळी  शाळेचे मुख्याध्यापक श्री माधवराव पारशेट्टे, शाळेतील शिक्षक श्री चंद्रकांत कोरे, ज्ञानोबा कंजे, श्रीमती आशा मुळे  आदी जण उपस्थित होते.*

⭕ *नववर्षात 2021 मध्ये किती मिळणार सुट्ट्या..?*

⭕⭕ *नववर्षात किती मिळणार सुट्ट्या..?*



👉🏻 *संपूर्ण यादी...* 

💫 *१जानेवारी,शुक्रवार-नववर्ष* 

▪️त्यानंतर २, ३ जानेवारीला शनिवार, रविवार आल्याने लॉन्ग विकेंड एन्जॉय करता येईल.

▪️९ जानेवारी, दुसरा शनिवार

▪️१४ जानेवारी, गुरुवार- मकर संक्रांत

▪️२३ जानेवारी, चौथा शनिवार

▪️२६ जानेवारी, मंगळवार- प्रजासत्ताक दिन

=======================
https://www.facebook.com/106479051303040/posts/110970550853890/
=======================

💫 *२०२१ फेब्रुवारी*

▪️१३ फेब्रुवारी, दुसरा शनिवार

▪️१६ फेब्रुवारी, मंगळवार - बसंत पंचमी

▪️२७ फेब्रुवारी, चौथा शनिवार

💫 *मार्च २०२१*

▪️११ मार्च, गुरुवार- महाशिवरात्री

▪️१३ मार्च, दूसरा शनिवार

▪️२७ मार्च, चौथा शनिवार

▪️२९ मार्च, सोमवार- धुलिवंदन

💫 *एप्रिल २०२१*

▪️२ एप्रिल, शुक्रवार - गुड फ्रायडे

▪️८ एप्रिल, गुरुवार - बुद्ध पौर्णिमा

▪️१० एप्रिल, दुसरा शनिवार

▪️१४ एप्रिल, गुरुवार - आंबेडकर जयंती

▪️२१ एप्रिल, बुधवार - राम नवमी

▪️२४ एप्रिल - चौथा शनिवार

▪️२५ एप्रिल, रविवार - महावीर जयंती

💫 *मे २०२१*

▪️१ मे, शनिवार - कामगार दिन

▪️८ मे, दुसरा शनिवार

▪️१२ मे, बुधवार-ईद-उल-फितर

▪️२२ मे, चौथा शनिवार

💫 *जून २०२१*

▪️१२ जून, दूसरा शनिवार

▪️२६ जून, चौथा शनिवार

💫 *जुलै २०२१*

▪️१० जुलै, दुसरा शनिवार

▪️२० जुलै, मंगळवार - बकरीद / ईद अल-अदा

▪️२४ जुलै, चौथा शनिवार

💫 *ऑगस्ट २०२१*

▪️१० ऑगस्ट, मंगळवार - मुहर्रम

▪️१४ ऑगस्ट, दुसरा शनिवार

▪️१५ ऑगस्ट, रविवार - स्वातंत्र्य दिन

▪️२२ ऑगस्ट, रविवार - रक्षाबंधन

▪️२८ ऑगस्ट, चौथा शनिवार

▪️३० ऑगस्ट, सोमवार - कृष्णा जन्माष्टमी

💫 *सप्टेंबर २०२१*

▪️१० सप्टेंबर, शुक्रवार - गणेश चतुर्थी

▪️११ सप्टेंबर, शनिवार - दुसरा शनिवार

▪️२५ सप्टेंबर, शनिवार - चौथा शनिवार

💫 *ऑक्टोबर २०२१*

▪️२ ऑक्टोबर, शनिवार - गांधी जयंती

▪️९ ऑक्टोबर, दुसरा शनिवार

▪️१५ ऑक्टोबर, शुक्रवार - दसरा (विजयादशमी)

▪️१८ ऑक्टोबर, सोमवार - ईद-ए-मिलाद

▪️२३ ऑक्टोबर, चौथा शनिवार

💫 *नोव्हेंबर २०२१*

▪️४ नोव्हेंबर, गुरुवार - दिपावली

▪️६ नोव्हेंबर, शनिवार - भाऊबीज

▪️१३ नोव्हेंबर, दुसरा शनिवार

▪️१९ नोव्हेंबर, शुक्रवार - गुरु नानक जयंती

▪️२७ नोव्हेंबर, चौथा शनिवार

💫 *डिसेंबर २०२१*

▪️११ डिसेंबर, दुसरा शनिवार

▪️२५ डिसेंबर, शनिवार (चौथा) - ख्रिसमस.
=======================
*श्री ज्ञानेश्वर भाऊराव बडगे उदगीर*
========================

इयत्ता पहिली ते दहावी सर्व विषय संपूर्ण पाठाचे स्वाध्याय लिंक

[*1ली संपूर्ण अभ्यास*

https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1

: *2 री संपूर्ण अभ्यास*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1

*3 री संपूर्ण अभ्यास*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1

*4थी संपूर्ण अभ्यास*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1

 *5 वी संपूर्ण अभ्यास*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1

*6वी संपूर्ण अभ्यास*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1

 *7 वी संपूर्ण अभ्यास*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1

*8वी संपूर्ण अभ्यास*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1

*9वी संपूर्ण अभ्यास*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1

*10 वी संपूर्ण अभ्यास*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1


Wednesday, December 30, 2020

मतदार यादीत नाव शोधणे लिंक



● *मतदान यादीतील आपले नाव शोधा..*●
           येत्या ग्रामपंचायत निवडणुका 2021  च्या धर्तीवर नव्याने तयार करण्यात आलेल्या कोणत्याही मतदान यादीतील ◆भाग क्र
◆आपले नाव 
◆मतदान यादीतील अनु क्र
◆मतदान कार्ड क्रमांक
  घर बसल्याजागी कसे शोधता येईल?

      यासाठी दिलेल्या 👇🏻लिंकवर क्लिक करा आणि शोधा.

*लिंक:- bit.ly/3kMVylF*

☝🏻वरील  माहिती कशी शोधता येईल ? याचा मार्गदर्शक व्हिडियो जरूर पहा.

https://youtu.be/bUe3yJ88hN4

सन 2021 जिल्ह्याधिकारी लातूर घोषित सुट्टी

सन 2021 जिल्ह्याधिकारी लातूर घोषित सुट्टी






Tuesday, December 29, 2020

मतदान केंद्राध्यक्ष व अधिकारी यांनी मतदानाच्या दिवशी करावयाची कामे

*मित्रांनो अतिशय महत्वाचा मैसेज* 
        ==============
👉🏻 *@ मतदान केंद्राध्यक्ष:-(PRO)*

*💫पूर्ण केंद्राचा जबाबदार अधिकारी असतो.*
*💫कंट्रोल युनिट व बँलट युनिट तपासुण ताब्यात घेणे.*
*💫आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदान केंद्र उभारणे.*
*💫सर्व फॉर्म्स काळजी पूर्वक भरणे. सर्व घोषणा पत्रावर मतदान प्रतिनिधिची सही सकाळीच करून घेणे. (सुरवातीचे/संपल्याचे)*

*💫माॅकपोल करणे, टोटल जीरो करणे, वेळेवर मतदान सुरु करणे व समाप्त करणे.*

*💫सकाळी सील करतांना पेपर सीलवर सही करने. सोबत मतदान प्रतिनिधिची सही घेणे.*

*💫मतदान संपल्यावर कंट्रोल यूनिट close करुण, address tag लाऊन दिनांक व सही करुन सील करणे.*
............................................

👉🏻 *@ मतदान अधिकारी:- १ (PO1)*
*💫नाव व अनुक्रमांक मोठ्याने पुकारणे.*
*💫ओळख पटवीणे.*
*💫मतदान यादी चिन्हांकित करणे. पुरूष व महिला मतदाराला पेनाने तिरपी रेषा मारणे, तसेच महिला मतदाराच्या अणुक्रमांकास गोल करणे.*
...........................................
👉🏻 *@ मतदान अधिकारी:- २ (PO2)*

*💫 मतदार नोंद वहीत नोंदणी करुण सही/अंगठा घेणे. रकाना 3 मध्ये ओळख पुराव्याची नोंद करणे. जसे EP/VS/bank passbook no./pan no./ID.*

*💫डाव्या हाताच्या तर्जनीवर    नखाजवळ पक्की शाई लावणे.*  

*💫मतदार चिठ्ठी तयार करणे.*
.........................................
👉🏻 *@ मतदान अधिकारी:-३ (  मतदान सा.केंद्राध्याक्ष:APRO)*

*💫पक्की शाई तपासणे.*
*💫मतदार चिठ्ठी जमा करणे.*
*💫कंट्रोल यूनिट वर बॅलेट देणे.*

*👉🏻 शिपाई :-मदतनिस म्हणून शाई लावणेसाठी मतदान अधिकारी 2 जवळ बसवणे.*
...............................................
*👉🏻@  हातात द्यावायाचे महत्वाचे फॉर्म्स:-*
-------------------------
*1) 17C- नोंद झालेल्या मतांचा हिशोब.*
*2) 17A:- २४ मुद्द्यांचा अहवाल.*
*3)  केंद्राध्यक्ष दैनंदिनी.*
*4) निरिक्षकांचा अतिरिक्त १६ मुद्यांचा अहवाल.*
*5) PSO 5 फॉर्म ( voter turn out report for polling station)*
*6) व्हिजिट शीट ( भेट अहवाल)*

*👉🏻@संविधानिक पाकिटे: (sealed):-(हिरव्या रंगाचे)*
------------------------
*1) मतदार यादीची चिन्हांकित      प्रत.*
*2) मतदार नोंद वही.*
*3) व्होटर स्लिप.*
*4) वापरलेल्या दुबार       मतपत्रिका व नमूना 17 बी.*
*5) न वापरलेल्या मत पत्रिका.*

*👉🏻 @ असंविधानिक पाकिटे:- (पिवळया रंगाचे)*
-------------------------
*1) शिल्लक मतदार यादीची प्रत.*
*2) मतदान प्रतिनिधि नेमणूक पत्र.*
*3) आक्षेपित मतांची नमूना 14 मधील यादी असलेला मोहोरबंद लिफाफा.*
*4) अंध व अपंग मतदाराची नमूना १४अ मधील यादी व मतदाराच्या  सोबत्याचे प्रतिज्ञा पत्र.*
*5) मतदारा कडून वयाबद्दल प्रतीज्ञापत्र व यादी असलेला लिफाफा.*
*6) पावती पुस्तक / आक्षेपित मताबाबत रोकड़ असलेला लिफाफा.*
*7) न वापरलेल्या कागदी मोहरा, स्पेशल टँग, स्ट्रिप सील.*
*8)  न वापरलेल्या मतदार स्लीप.*
..............................................
*@ इतर साहित्याचे पाकिटे: ( खाकी रंगाचे)*
------------------------
*इतर साहित्य पाकीट पाहून टाकणे व चिकटवणे.*

  ✨  *टीप:- अड़चणी आल्यास क्षेत्रीय अधिकारीस संपर्क करावा........*
 
👉🏻 *प्राॅक्सी मतदान  :-सेना दलातील व्यक्तीच्या  कुटुम्बातील व्यक्तीला दोनदा मतदानाच अधिकार आहे. निवडणुक आयोग असी यादी पुरवितो. अस्या व्यक्तीला डाव्या हाताच्या मधल्या बोटावर शाई लावणे.*

*👉🏻प्रदत्त मते:-एखादी व्यक्ती मतदान करून गेली असेल व  पुन्हा त्याच नावावर नवीन मतदार मतदानासाठी आला व तो खरा असेल तर त्याचे मतदान मतपत्रीके द्वारे करावे. मतपत्रिकेवर प्रदत्त मतपत्रिका असे लिहावे.हिशोब ठेवावा.सील करावे.*
🌈🌀🌈🌀🌈🌀🌈🌀🌈

प्रकल्प बिल्ला विषय भाषा, गणित, इंग्रजी,कला, कार्यानुभव व शारीरिक शिक्षण



Sunday, December 27, 2020

➖➖➖➖➖➖➖ 💥 शैक्षणिक दिनदर्शिका डिसेंबर 20 ते एप्रिल 21


➖➖➖➖➖➖➖➖➖
💥 *शैक्षणिक दिनदर्शिका डिसेंबर 20 ते एप्रिल 21*

*http://www.shaleyshikshan.in/2020/12/2020-2021educational-calendar.html*

*मराठी माध्यम - इ.१ली ते इ.१०वी*
*उर्दू माध्यम - इ.१ली ते इ.१०वी*

🎯 *शैक्षणिक दिनदर्शिका सर्व इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन SCERT मार्फत करण्यात आले आहे.*

Friday, December 18, 2020

विज्ञान प्रयोग विद्यार्थ्यांसाठी दालन विज्ञान : करून पहा साधे सोपे प्रयोग.

विद्यार्थ्यासाठी दालन विज्ञान :  करून पहा साधे सोपे प्रयोग.



करून पहा साधे सोपे प्रयोग - 

1. रूपयाभर पाणी
साहित्य – एक रूपयाचे नाणे, पेलाभर पाणी, ड्रॉपरकृती – एक रूपयाचे नाणे सपाट पृष्ठभागावर ठेवा. शाई भरण्याच्या स्वच्छ ड्रॉपरमध्ये पाणी भरा. त्यातून एक थेंब पाणी नाण्याच्या मध्यावर टाका. त्याच्यावर आणखी थेंब पाणी टाका. नाण्यावरून न सांडता किती थेंब पाणी नाण्यावर साचेल याचा अंदाज करा. बहुधा तुमच्या अंदाजापेक्षा किती तरी अधिक पाणी नाण्यावर सामावेल.पाण्याच्या थेंबामध्ये परस्परांना जोडून घेण्याचा जोर असतो, तो गुरुत्त्वाकर्षणापेक्षा कमी झाला की पाणी ओसंडून वाहते. 

2. एकापेक्षा दोन हलके?

साहित्य – दोन सारख्या आकाराच्या उभट डब्या – झाकणासह, वाळू, एक व्यक्तीकृती – पूर्वतयारी - दोन डब्या घ्या. एका डबीत जास्तीत जास्त वाळू भरा. झाकण लावा. आता प्रयोगाला सुरूवात करा. एका व्यक्तीला तळहात पुढे करून उभे करा. त्या तळहातावर भरलेली डबी ठेवा. हातावर पडलेला भार अनुभवायला सांगा. दुसरी डबी पहिल्या डबीवर ठेवा. समोरच्या व्यक्तिला दोन्ही डब्या एकमेकींवर ठेवल्यावर भार कमी जाणवतो.दुसरी डबी ठेवली जात असताना तळहाताचे स्नायू दुप्पट भार सहन करण्याची तयारी करतात पण भार फार वाढत नाही त्यामुळे तो कमी झाल्यासारखा वाटतो.

3. वस्तूला दूध पाजा.

साहित्य – विविध प्रकारच्या वस्तू, दूध, चमचा, लाकडी फळी, फडके.कृती – एक लाकडी फळी घ्या. फळीवर स्वच्छ फडके नीट पसरा. फडक्यावर एक वस्तू स्थर राहील अशी ठेवा. एका चमच्यात चमचाभर दूध घ्या. चमच्याची कड वस्तूच्या पृष्ठभागाला टेकवा. चमचा किंचित तिरपा करा. चमच्यातले दूध हळुहळू कमी होताना दिसेल. दुधाचा पातळ थर वस्तूवरून सरकताना दिसला नाही तरी फडके दूधाने ओले झालेले दिसेल.दूधाच्या पृष्ठभागावरून थोडेसे दूध वस्तूच्या पृष्ठभागावर आले की त्यातल्या पाण्याच्या कणांच्या ओढीने चमच्यातील दूध ओढले जाते.

4. कोणता डोळा लाडका?

साहित्य – ३० मीटर पलिकडची वस्तू, तुम्ही स्वत:कृती – एका मोकळ्या जागेसमोर उभे रहा. ३० मीटर पलिकडची एक वस्तू निवडा. दोन्ही डोळे उघडे ठेवून त्या वस्तूकडे बोट दाखवा. स्थिर रहा. आधी डावा डोळा बंद करून बघा. तो उघडा. मग उजवा डोळा बंद करून बघा. कोणत्या डोळ्याने बघताना बोट आणि वस्तू एका रेषेत दिसते? तो तुमचा लाडका डोळा.प्रत्येक व्यक्तिची एक बाजू दुसरीपेक्षा सक्षम असते. काही डावखोरे असतात काही उजखोरे. तसेच डोळ्याच्या बाबतीत होते.

5. चष्मेवाल्यांना जग कसे दिसते?

साहित्य – बहिर्गोल भिग, चष्मा.कृती – दार खिडक्यांच्या विरूद्ध बाजूला असलेल्या भिंतीवरची अंधारी जागा निवडा. एक बहिर्गोल भिंग त्या जागेसमोर उभे धरा. ते पुढे मागे करत भिंतीवर समोरच्या दार खिडकीची स्पष्ट प्रतिमा मिळवा. ती उलटी दिसेल. आता भिंगाच्या पुढे चष्म्यातले एक भिंग धरा. प्रतिमा धूसर होईल. दोन्ही भिंगात तेवढेच अंतर राखत दोन्ही भिंगे पुढेमागे करत भिंतीवर स्पष्ट प्रतिमा मिळवा. आता फक्त चष्मा काढून घ्या. भिंतीवर पडलेली धूसर प्रतिमा दिसते तसे जग त्या चष्मेवाल्याला दिसते.डोळ्याच्या भिंगाने प्रतिमा धूसर दिसते म्हणून चष्म्याचा आधार घ्यावा लागतो.

6. गव्हांकुराची वाढ.

साहित्य – चौकोनी ट्रे, माती, पाणी, रांगोळी, गहू, गव्हाची चाळणी.कृती – साधी माती गव्हाच्या चाळणीने चाळून घ्या. ट्रे मध्ये तिचा थर एक-दिड सेंटीमीटर व्हायला पाहीजे. मातीवर पाणी शिंपडा. रांगोळीने दर २ सेंटीमीटर अंतरावर अधिकची खूण करा. त्यांनी बनवलेल्या कोपर्‍यातल्या चौरसात दोन गहू पेरा. पुढे दर ४ तासांनी एकेका चौरसात दोन गहू पेरा, थोडे पाणीही शिंपडा. शेवटच्या चौरसात पेरलेल्या गव्हाला मोड आल्यावर प्रत्येक गव्हांकुराची उंची मोजा.ती वेळेनुसार वाढली आहे का?
7. साखरेतून उजेड .

साहित्य – जाड साखर, फरशी, बत्ताकृती – हा प्रयोग पूर्ण अंधारात करायला हवा. एक गुळगुळीत फरशी घ्या. ओटा किंवा दगडी पोळपाट चालेल. त्याच्यावर थोडी साखर पसरा. हातात बत्ता घ्या. पूर्ण अंधार करा. बत्त्याने दाबत साखर चुरडा. चुरडताना निळसर उजेड पडलेला दिसेल.साखरेचे स्फटिक बनत असताना त्यात कुठे कुठे आयन अडकून पडलेले असतात. साखर चुरडताना ते हवेशी संपर्कात येतात. त्यांची रासायनिक क्रिया होते त्यावेळी उजेड रुपात ऊर्जा बाहेर पडते.
8. दुरून पेटणारी मेणबत्ती

साहित्य – मेणबत्ती, काड्यापेटी.कृती – एक मेणबत्ती घ्या. स्टॅंडवर किंवा बशीत किंवा पक्क्या आधारावर ठेवा. काड्यापेटीने मेणबत्ती पेटवा. तिची ज्योत चांगली स्थिर होऊ द्या. मेणबत्ती एकाच फुंकरीत पटकन् विझवा. मेणबत्तीच्या विझलेल्या ज्येतीतून एक धुराची रेषा वर गेलेली दिसेल. ती रेषा अखंड असतानाच एक काडी पेटवून धुराच्या रेषेच्या टोकाला लावा. एक बारीक ज्योत मेणबत्तीच्या वातीपर्यंत जाताना दिसेल. मेणबत्ती पुन्हा प्रज्वलीत होईल. धुराची रेषा अखंड नसेल तर तसे होणार नाही.मेणाचा धूर किंवा कोणतीही गोष्ट पेटण्यासाठी तिचे तापमान पेट घेण्यालायक असायला लागते शिवाय एक ज्योत किंवा ठिणगी तरी लागते. 
9. कागदी पट्टीचा झुकता पूल

साहित्य – कागद, कात्री, पट्टी, डिंक, पुठ्ठाकृती – कागदाची १५ सेंटीमाटर लांब आणि २ सेंटीमीटर रुंद आकाराची पट्टी कापून घ्या. दोन्ही टोकांपासून एक सेंटीमीटर अंतरावर पट्टी दुमडून घ्या. दुमडलेल्या भागांना एका बाजूने डिंक लावून ती टोके पुठ्ठ्यावर चिकटवा. त्याच्यातील अंतर ७ ते ८ सेंटीमीटर राहील असे पहा. कागदाच्या या कमानीखालून लांब फुंकर मारा. कमान वर न जाता खाली जाते.फुंकरीमुळे कमानीखाली हवेचा दाब कमी होतो व ती ढकलली जाते.
10. पांढरा बगळा होई काळा
साहित्य – ५ सेंटीमीटर लांबीचा कागदी चौरस, पेन्सिल, ब्रश, काळा रंग इ.कृती -  ५ सेंटीमीटर लांबीचा एक कागदी चौरस घ्या. त्याच्यावर पेन्सिलीने बगळ्याची रेखाकृती काढा. डोळा काळा रंगवा. बगळा सोडून बाकी पूर्ण कागद काळ्या रंगाने रंगवा. बगळ्याच्या डोळ्याकडे एक मिनिट एकटक पहा. मग तुमची नजर एखाद्या सपाट एकरंगी भिंतीवर न्या. तुम्हाला बगळ्याची रेखाकृती काळी दिसेल.आपल्या डोळ्याच्या पटलावर झालेल्या पांढर्‍या रंगाच्या प्रभावामुळे नंतर तो भाग कमी प्रकाश पाहतो म्हणून तो भाग काळा झाल्यासारखा वाटतो.
11. रंग वाचता येतात की शब्द?

साहित्य – कोरा कागद, पेन्सिल, रंगीत खडू किंवा ब्रश - रंगकृती – एक कोरा कागद घ्या. त्यावर पेन्सिलिने मोठ्या पुसट अक्षरात तुम्हाला माहिती असलेल्या रंगांची नावे लिहा. ती नावे कोणताही दुसरा रंग वापरून ठळक करा. उदा. लाल हा शब्द काळ्या रंगाने रंगवा. सर्व अक्षरे वेगळ्या रंगांनी रंगवून झाल्यावर. शब्द न वाचता रंग मोठ्याने वाचून दाखवायला इतरांना सांगा.आपला मेंदू वाचनाची क्रिया रंगाऐवजी शब्दांशी जोडतो असे आढळते.

लाल पिवळा निळा हिरवा तपकिरी नारिंगी जांभळा
12. मोहरीच्या दाण्यांचा नाच

साहित्य – मोहरी, प्लॅस्टिकची पिशवी, पिना भरलेला स्टेपलर.कृती – एक प्लॅस्टिकची पिशवी घ्या. मोहरीच्या दाण्यांनी पिशवी अर्धी भरा. पिशवीचे तोंड दोन घड्या घालून बंद करा. त्यावर स्टेपलरने आवश्यक तितक्या पिना मारा. पिशवीचे एक टोक एका हाताच्या चिमटीने उचला. त्याच्या विरूद्ध असलेले पिशवीचे टोक दुसर्‍या हाताच्या चिमटीने पकडा. पिशवी डोळ्यांसमोर धरून हळुहळू गोलाकार फिरवा. पिशवीतले मोहरीचे दाणे नाचताना दिसतील.पिशवी फिरवताना होणार्‍या छोट्याश्या घर्षणानेही स्थिर विद्यूत तयार होते.

13. टिव्हीला ट्रांझिस्टर लावला तर..

.साहित्य – टिव्ही संच, ट्रांझिस्टरटिव्ही चालू करा. एलईडी, एलसीडी टिव्ही चालणार नाही लांबट असलेलाच हवा. एक ट्रान्झिस्टर घ्या. मोडका, बंद असलेलाही चालेल. त्यात सेल नसले तरी चालेल. तो हळुहळू चालू टिव्ही संच्याच्या पडद्याजवळ न्या. काही ठिकाणी पडद्यावरचे रंग, आकार बदललेले दिसतील.टिव्ही संचातील किरण म्हणजे जोरात फेकले गेलेले इलेक्ट्रॉन असतात. त्यांचा मार्ग चुंबकीय क्षेत्रामध्ये बदलतो.

14. भेटीची आस बोटांना

साहित्य – आपले हातदोन्ही हातांची बोटे एकमेकांत गुंफा. पकड घट्ट ठेवा. दोन्ही हाताच्या अंगठ्या शेजारची बोटे सरळ करून ताणा. त्यांची टोके एकमेकांना जोडा. नंतर त्यांच्यात सुमारे एक सेंटीमीटर अंतर ठेवून निरीक्षण करा. बोटे एकमेकांकडे आपोआप ओढली जातील. ती वेगळी ठेवण्यासाठी मुद्दाम प्रयत्न करावे लागतात.वक्र झाल्यावर बोटातले स्नायू नैसर्गिकपणे पकड मजबूत करू बघतात.

15. रंगीत स्क्रीनवरचे कोश

साहित्य – पाणी, रंगीत पडदा असलेले उपकरण – टिव्ही, मोबाईल, टॅब, संगणक इ.रंगीत पडदा असलेले एक उपकरण घ्या. ते चालू करा. एका हाताच्या चिमटीत पाणी घ्या. रंगीत स्क्रीनजवळ चिमूट नेऊन किंचित सैल करा. तोंडाने पाण्यावर जोरात फुंकर मारा. पाण्याचे काही शिंतोडे स्क्रीनवर पडतील. त्यातून स्क्रीनवरचे कोश पहा. मान थोडी हलवून त्यांचे रंग तपासा.कोश लाल, हिरवा, निळा या तीन रंगांचेच असतात.

16. कावळा काळा तरी दिसे पांढरा

साहित्य – ५ सेंटीमीटर लांबीचा कागदी चौरस, पेन्सिल, ब्रश, काळा रंग इ.कृती -  ५ सेंटीमीटर लांबीचा एक कागदी चौरस घ्या. त्याच्यावर पेन्सिलीने कावळ्याची रेखाकृती काढा. डोळा सोडून बाकी पूर्ण कावळा काळ्या रंगाने रंगवा. त्याच्या डोळ्याकडे एक मिनिट एकटक पहा. मग तुमची नजर एखाद्या सपाट एकरंगी भिंतीवर न्या. तुम्हाला कावळ्याची रेखाकृती पांढरी दिसेल.आपल्या डोळ्याच्या पटलावर झालेल्या काळ्या रंगाच्या प्रभावामुळे नंतर तो भाग अधिक प्रकाश पाहू शकतो म्हणून तो भाग पांढरा झाल्यासारखा वाटतो. 

17. भात निळा करणे.

साहित्य - शिजवलेला भात, लिंबू, आयेडाइज्ड मीठ, ताटली, डाव, छोटा चमचा, सुरी.कृती - सुरीने कापून लिंबाच्या फोडी करून एका ताटलीत कडेला ठेवा. ताटलीत एक डावभर शिजवलेला गरम भात घ्या. त्याच्यावर छोटा चमचाभर आयोडाइज्ड मीठ टाका. त्याच्यावर लिंबाच्या रसाचे तीन थेंब टाका. थोडा वेळ गडद निळी रंगछटा दिसेल.मीठातील आयोडीनची भातातील पिठूळ पदार्थाशी रासायनिक क्रिया होऊन निळ्या रंगाचे अस्थिर संयुग तयार होते.

18. बदलत्या रंगाचे कुंकू

साहित्य – लाल कुंकू पूड. चमचा, रुमाल, ज्योत. कागद.कृती - एका चमच्याच्या अर्ध्या दांडीला रुमाल गुंडाळा. त्या चमचात अर्धा चमचा भरेल इतकी लाल कुंकवाची पूड घ्या. चमचातील कुंकू ज्योतीवर घरून तापवा. ते काळे पडेल. हे काळे पडलेले कुंकू कागदावर ओता. थोड्या वेळात ते पुन्हा लाल होईल.उष्णतेमुळे कुंकवातील जल निघून जाते म्हणून ते काळे पडते गार होताना हवेतील बाष्प शोषून ते जलभरण करते त्यामुळे पुन्हा लाल होते.

19. हळदीचे कुंकू, कुंकवाची हळद

साहित्य – हळद पूड, पाणी, खायचा चुना, लिंबाची फोड.कृती - हळदीची चिमूटभर पूड हातावर ठेवा. त्यावर थोडे पाणी घाला. हातावर हात चोळून हळदीची पिवळा रंग हातभर पसरू द्या. कणीभर खायच्या चुना हळद लावलेल्या हातावर ठेवा. पुन्हा हातावर हात ठेवून चोळा. हात कुंकवासारखे लाल होतील. आता त्यावर दोन थेंब लिंबू रस टाका. पुन्हा हातावर हात ठेवून चोळा. हात पुन्हा पिवळे होतील.हळदीचा रंग आम्लारी पदार्थामुळे लाल होतो तर आम्लामुळे पिवळा.

20. साखरेचा खाद्य रंग

साहीत्य - साखर, एक डाव, छोटी कढई, चिमटा, चूल, गॅस किंवा स्टोव, लांब दांडाची चमचा, कृती - छोटा चमचा, डबी लागेल. चूल पेटवा तिच्यावर छोटी कढई ठेवा. ती तापू द्या. तिच्यात साखरेचे २-३ दाणे घाला. साखरेचे दाणे थोडे वितळल्यासारखे दिसले की तिच्यात डावभर साखर घाला. कढई चिमट्याने पकडून छोट्या चमच्याने साखर हलवा. साखर वितळत जाईल तसतसा खमंग वासाचा एक तांबूस करपट रंग येतो. त्याला कॅरॅमल म्हणतात. कढई चुलीवरून उतरवून गार झाल्यावर कॅरॅमल नंतर वापरण्यासाठी डबीत भरून ठेवा.साखरेचे कण अर्धवट जळल्यामुळे, अर्धवट वितळल्यामुळे, त्यांच्या मिश्रणामुळे हा रंग तयार होतो.

21. कर्ब वायू ओतणे

साहित्य – पाणी, खाण्याचा सोडा, लिंबू. साधने – मेणबत्ती, काड्यापेटी, खोलगट तसराळे, बाटली.कृती – एका बाऊलमध्ये किंवा खोलगट तसराळ्याच्या आत एक छोटी मेणबत्ती पेटवून ठेवा. एका बाटलीत थोडे पाणी घेऊन त्यात थोडा खाण्याचा सोडा विरघळवा. त्याच्याच थोडा लिंबाचा रस घाला. फसफसण्याची क्रिया सुरू होईल. ती थोडी कमी झाल्यावर पेटलेल्या मेणबत्तीच्या पात्रात बाटलीतील वायू ओता. बरोबर ओतलात तर मेणबत्ती विझेल.कर्बवायू हवेपेक्षा जड असतो म्हणून ओतला जातो.

*माहितीस्त्रोत : मराठी विज्ञान परिषद, पुणे*
*श्री ज्ञानेश्वर भाऊराव बडगे उदगीर*
https://www.facebook.com/106479051303040/posts/110970550853890/
➖➖➖➖➖➖➖➖➖







गोष्टींचा शनिवार नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि ऐका.

*गोष्टींचा शनिवार*
*पुस्तकाची लिंक:* https://bit.ly/3gra4it
     
    
*मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका! फोनवर  तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये  मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत? तर मग 

 080-6826-4443 

या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि ऐका.*


संदर्भ http://www.maharashtra.gov.in मध्ये दिलेला कोणताही GR डाऊनलोड करता येईल

संदर्भ 
http://www.maharashtra.gov.in
मध्ये दिलेला कोणताही GR डाऊनलोड करता येईल


   


Thursday, December 17, 2020

दैनंदिन भेट

*दैनंदिन भेट*

*आज दिनांक 17/ 12


 /2020 रोजी जिल्हा 


 परिषद प्राथमिक शाळा 


 बोळेगाव बु ता.शि.अनं तपाळ जिल्हा लातूर येथे कोविड कॅप्टन गटास भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व अभ्यासाविषयी आढावा घेण्यात आला. तसेच 50 वर्षं वरील व्यक्तींची समुपदेशन मार्गदर्शन केले व आरोग्याविषयी चर्चा केली व आढावा घेण्यात आला*

Tuesday, December 15, 2020

दैनंदिन भेट

*दैनंदिन भेट*

*आज दिनांक 15/ 12


 /2020 रोजी जिल्हा 


 परिषद प्राथमिक शाळा 


 बोळेगाव बु ता.शि.अनं 


 तपाळ जिल्हा लातूर येथे कोविड कॅप्टन गटास भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व अभ्यासाविषयी आढावा घेण्यात आला. तसेच 50 वर्षं वरील व्यक्तींची समुपदेशन मार्गदर्शन केले व आरोग्याविषयी चर्चा केली व आढावा घेण्यात आला*

महाराष्ट्र राज्यातील जिल्हे निमिती*

*💥महाराष्ट्र राज्यातील जिल्हे निमिती*💥

↪१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर त्यात एकूण २६ जिल्हे होते. त्यानंतर अनेक कारणांनी जुन्या जिल्ह्यांचे भाग पडत अजून १० जिल्हे तयार करण्यात आले असे सगळे मिळून आजच्या वेळेला *महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत*.

*महाराष्ट्र राज्य २६ जिल्ह्यांसोबत स्थापन झाल्यानंतर पुढील १० जिल्हे नवीन तयार करण्यात आले* 

👉१. *सिंधुदुर्ग जिल्हा* : १ मे १९८१ रत्नागिरीमधून

👉२. *जालना जिल्हा* : १ मे १९८१ औरंगाबादमधून

👉३. *लातूर जिल्हा* : १६ ऑगस्ट १९८२ उस्मानाबादमधून

👉४. *गडचिरोली जिल्हा*: २६ ऑगस्ट १९८२ चंद्रपूरमधून

👉५. *मुंबई उपनगर* : १ ऑक्टोबर १९९० मुंबईमधून

👉६. *गोंदिया जिल्हा* : १ मे १९९९ भंडारामधून

👉७. *हिंगोली जिल्हा* : १ मे १९९९ परभणीमधून

👉८. *नंदुरबार जिल्हा* : १ जुलै १९९८ धुळेमधून

👉९. *वाशिम जिल्हा* : १ जुलै १९९८ अकोला मधून

👉१०. *पालघर जिल्हा* : १ ऑगस्ट २०१४ ठाणे मधून

*☮महाराष्ट्रातील एकूण ३६ जिल्हे*☮

*कोकण विभाग (७ जिल्हे)* 

👉मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

*पुणे विभाग (५ जिल्हे)*

👉पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर.

*नाशिक विभाग (५ जिल्हे)* 

👉नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव.

*औरंगाबाद विभाग (८ जिल्हे*) 

👉औरंगाबाद, नांदेड, परभणी, लातूर, उस्मानाबाद, जालना, हिंगोली, बीड.

*नागपूर विभाग (६ जिल्हे)* 

👉नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

*अमरावती विभाग (५ जिल्हे*) 

अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा.


Sunday, December 6, 2020

भारताचे पहिले मंत्रीमंडळ

भारताचे पहिले मंत्रीमंडळ


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी सविस्तर माहिती*

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी सविस्तर माहिती*
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

डॉ. आंबेडकरांची मुंबईतील महाप्रचंड अंत्ययात्रा (७ डिसेंबर १९५६) राजगृह (हिंदू कॉलनी), दादरवरून १.४० वाजता निघाली. दादर व्हिन्सेन्ट रोड (आताचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड), पोयबावडी, परळ, एलफिन्स्टन ब्रिज, सयानी रोड, गोखले रोड (उत्तर व दक्षिण), रानडे रोड वरून दादर चौपाटीवरील हिंदू स्मशानभूमीत (आता चैत्यभूमी) सायकांळी ६ वाजता पोहोचली. अंत्ययात्रेत देशभरातून १५ लाखांवर लोक दु:खित अंत:करणाने सामील झाले होते.

नागपूर व चंद्रपूर येथील धर्मांतराचे कार्यक्रम उरकून आणि आता धम्मचक्र पुन्हा एकदा गतिमान झालेले पाहून बाबासाहेब आंबेडकर दिल्लीला परतले. त्यानंतर काही आठवड्यात २० नोव्हेंबर १९५६ मध्ये ते नेपाळ मधील काठमांडूला ‘वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट’ च्या चौथ्या परिषदेस हजर राहले आणि आणि तेथिल प्रतिनिधींसमोर ‘बुद्ध की कार्ल मार्क्स’ या विषयावर भाषण केले. त्यात त्यांनी भगवान बुद्धाचा मार्ग मार्क्स पेक्षा कसा श्रेष्ठ आहे, ज्यात प्रेम, न्याय, बंधुत्व, विज्ञानवाद असून तो शोषण समाप्त करू शकतो असे सांगितले. 

आपल्या परतीच्या प्रवासात त्यांनी बनारस मध्ये दोन भाषणे दिली. दिल्ली मध्येही त्यांनी विविध बौद्ध समारंभात भाग घेतला, राज्यसभेच्या अधिवेशनात सहभागी झाले आणि आपल्या ‘भगवान बुद्ध आणि कार्ल मार्क्स’ या पुस्तकाचे शेवटचे प्रकरण लिहून पूर्ण केले. 

५ डिसेंबरच्या सायंकाळी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या प्रस्ताविक आणि परिचय या दोन प्रकरणांच्या प्रती आणून त्यांनी रात्री त्यांची तपासणी केली. दुसऱ्या दिवशी पहाटे १२.१५ वाजता ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्लीला निवास स्थानी त्यांचे महापरिनिर्वाण (निधन) झाले. तेव्हा त्यांचे वय ६४ वर्ष आणि ७ महिन्याचे होते. दिल्लीहून विशेष विमानाने त्यांचे पार्थिव मुंबईला आणण्यात आले. मुंबई हे ठिकाण अत्यंविधीसीठी निश्चित झाले त्यानंतर देशभरातील त्यांचे अनुयायी मिळेल त्या साधनाने मुंबईला येऊ लागले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध बनून केवळ सातच आठवडे झाले होते, तरीसुद्धा त्या अल्पशा काळात बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी सम्राट अशोका नंतर त्यांनी अन्य कोणाही भारतीयापेक्षा सर्वात अधिक कार्य केले होते.

डॉ. आंबेडकरांची अंत्ययात्रा राजगृह (हिंदू कॉलनी), दादरवरून १.४० वाजता निघाली. दादर व्हिन्सेन्ट रोड (आताचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड), पोयबावडी, परळ, एलफिन्स्टन ब्रिज, सयाी रोड, गोखले रोड (उत्तर व दक्षिण), रानडे रोडवरून दादर चौपाटीवरील हिंदू स्मशानभूमीत (आता चैत्यभूमी) सायकांळी ६ वाजता पोहोचली. 

अंत्ययात्रेत देशभरातून १५ लाखांवर लोक दु:खित अंत:करणाने सामील झाले होते. ७ डिसेंबर १९५६ रोजी सायंकाळी ७.५० वाजता त्यांच्यावर मुंबई मध्ये बौद्ध पद्धतींनी अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबई हे त्यांच्या जीवनकार्यातील अधिकांश काळ मुख्यालय होते आणि तेथेच त्यांचे अजूनही सर्वात जास्त अनुयायी होते. 

चार मैल लांबीच्या यात्रेत लाखो लोक सहभागी झाले होते आणि तिला दादर मधील ‘राजगृह’ या डॉ. आंबेडकरांच्या निवास्थानापासून स्थानिक स्मशानभूमी पर्यंत पोहोचण्यास चार तास लागले. मुंबई शहराने पाहिलेली ती सर्वात मोठी अत्यंयात्रा होती. 

त्यानंतर दहन संस्कारास उपस्थित राहिलेल्यापैंकी एक लाख लोक त्यांच्या अस्थींबरोबर तैनातीने राजगृहा पर्यंत गेले. परंतु दहनभूमी सोडण्यापूर्वी त्यांनी बाबासाहेबांच्या इच्छेची पूर्ती करण्यासाठी म्हणून बौद्ध धम्माचा स्वीकार करण्याचा आग्रह धरला. त्यानुसार तत्क्षणी दीक्षा समारंभाचा कार्यक्रम होऊन तेथे उपस्थित असलेल्या बौद्ध भिक्खूंपैकी महापंडित डॉ. आनंद कौशल्यायन यांनी त्रिशरण व पंचशील देऊन त्याच ठिकाणी १० लाख लोकांना बौद्धधम्माची दीक्षा दिली.

*पत्रकारिता : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वृत्तपत्रे*

वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजोन्नती होईल, यावर बाबासाहेब आंबेडकरांचा ठाम विश्वास होता. ते एक निष्ठावान संपादक आणि सव्यसाची लेखक होते. ते चळवळीत वर्तमानपत्र खूप महत्त्वाचे मानीत. ते म्हणतात, “कोणतेही चळवळ यशस्वी होण्यासाठी तिला वर्तमानपत्राची आवश्यकता असते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसेल तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्ष्याप्रमाणे होते.” यामुळे त्यांनी आपल्या चळवळीत पाच वर्तमानपत्रे वापरली.

३१ जानेवारी १९२० रोजी, बाबासाहेबांनी अस्पृश्यांवरील अन्याला वाचा फोडण्यासाठी मूकनायक हे पहिले पाक्षिक सुरू केले. यासाठी त्यांना कोल्हापूर संस्थानाचे छ. शाहू महाराज यांनी आर्थिक मदत केली होती. १९२४ मध्ये त्यांनी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू केले. ३ एप्रिल मध्ये बहिष्कृत भारत पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. त्यांनी २९ जून १९२८ रोजी समता हे वृत्तपत्र सुरू केले. हे समाज समता संघाचे मुखपत्र होते. 

२४ फेब्रुवारी १९३० रोजी त्यांनी जनता तर ४ फेब्रुवारी १९५६ मध्ये प्रबुद्ध भारत हे वृत्तपत्र सुरू केले. १९४४ मध्ये बाबासाहेबांनी "आम्ही शासनकर्ती जमात बनणार" या शीर्षकाखाली जनता वृत्तपत्रात लेख लिहिला. या वृत्तपत्रांद्वारे आपल्या विचारांनी त्यांनी स्पृश्य आणि अस्पृश्यांना जागृत केले. त्यांची लेखनी झुंजार, क्रांतिकारी आणि प्रभावी होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सर्व वृत्तपत्रे मराठी भाषेमध्ये प्रकाशित झालेत कारण मराठीच त्यावेळेची सामान्य जनतेची भाषा होती. कारण बाबासाहेबांचे कार्यक्षेत्र (कर्मभूमी) महाराष्ट्र होते आणि मराठी तिथली लोकभाषा आहे. 

बाबासाहेब इंग्रजी भाषेचे ही प्रकांड विद्वान होते, परंतु त्यांनी आपली वृत्तपत्रे मराठी भाषेत यामुळे प्रकाशित केली की, त्यावेळी महाराष्ट्रातील बहुतांश दलित जनता जास्त शिकलेली नव्हती, ती केवळ मराठीत समझू शकत होती. मात्र त्याच वेळी स्वतःला दलितांचे हितचिंतक समजणारे महात्मा गांधी आपले एक वृत्तपत्र ‘हरीजन’ इंग्रजी भाषेत प्रकाशित करत होते. मात्र त्यावेळी दलित जनतेला साधारणपणे इंग्रजी माहिती नव्हती.

गंगाधर पानतावणे यांनी १९८७ साली भारतात पहिल्यांदा बाबासाहेबांच्या पत्रकारितेवर पी.एच.डी. साठी शोध प्रबंध लिहिला. त्यांनी त्यांच्या ग्रंथात म्हटले आहे की, "या मुकनायकाने बहिष्कृत भारतामधील लोकांना प्रबुद्ध भारताकडे नेले. बाबासाहेब महान पत्रकार होते."

*पुरस्कार आणि सन्मान, मानध पदव्या :*

५ जून १९५२ रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठाची मानध एल.एल.डी. ही डॉक्टरेट पदवी स्वीकारल्या नंतर त्यांच्या सोबत वॅलन्स स्टीव्हन्स. ५ जून १९५२ रोजी बाबासाहेब आंबेडकरांना संविधान निर्मिती, सामाजिक कार्याबद्दल आणि मानवी हक्कांचा पहारेकरी या भूमिकेबद्दल कोलंबिया विद्यापीठाने एलएलडी (डॉक्टर ऑफ लिटरेचर) ही सन्माननीय डॉक्टरेट पदवी बहाल केली. 

‘भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, मंत्रिमंडळाचे सदस्य आणि राज्यसभेचे सदस्य, भारतीय नागरिकांपैकी एक प्रमुख नागरिक, एक महान सुधारक आणि मानवी हक्काचा आधारस्तंभ असणारा एक पराक्रमी पुरुष’ असं कोलंबिया विद्यापीठाने त्यांना दिलेल्या मानपत्रात संबोधण्यात आले आहे.

*डी.लिट. :*

हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाने १२ जानेवारी १९५३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दिलेली डी.लिट्. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) ही मानद पदवी प्रदान केला.

*बोधिसत्व :*

भारतीय बौद्ध विशेषतः नवयानी अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘महान बोधिसत्व’ व मैत्रेय म्हणतात. १९५५ मध्ये, काठमांडू, नेपाळ येथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदेत सहभागी बौद्ध भिक्खूंनी त्यांना ‘बोधिसत्व’ ही उपाधी प्रदान केली. त्यानंतर दलाई लामा एकदा डॉ. आंबेडकरांना भेटले असता लामांनी सुद्धा त्यांना 'बोधिसत्व' संबोधले होते. बाबासाहेब हे बोधीसत्व होते परंतु त्यांनी कधीही स्वतःला बोधीसत्व म्हटले नाही.

*भारतरत्न :*

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दिलेला ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारताचे राष्ट्रपती रामस्वामी वेंकटरमण यांचे हस्ते स्वीकारताना डॉ. सविता तथा माईसाहेब आंबेडकर. १४ एप्रिल १९९० हा त्यांचा शताब्धी जयंती दिन होता. हा पुरस्कार सोहळा राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल/अशोक हॉल मध्ये संपन्न झाला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य, मजूर व स्त्रियांच्या उद्धारासाठी केलेले कार्य, स्वतंत्र भारताची राज्यघटना निर्मितीचे केलेले राष्ट्रीय कार्य तसेच आयुष्यभर समता स्थापनेसाठी केलेला प्रखर संघर्ष यासाठी ‘भारतरत्न' हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार (मरणोत्तर) देण्याचे भारत सरकारने एप्रिल १९९० च्या पहिल्या आठवड्यात जाहिर केले. आणि १४ एप्रिल १९९० रोजी त्यांना मरणोत्तर भारतरत्‍न या पुरस्काराने गौरवले गेले. 

डॉ. आंबेडकरांना दिलेला ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारताचे राष्ट्रपती रामस्वामी वेंकटरमण यांचे हस्ते डॉ. सविता तथा माईसाहेब आंबेडकर यांनी स्वीकारला. १४ एप्रिल १९९० हा त्यांचा शताब्धी जयंती दिन होता. हा पुरस्कार सोहळा राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल/अशोक हॉल मध्ये संपन्न झाला होता.

*वारसा :*

बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक-राजकीय सुधारक म्हणूनच्या वारस्याचा आधुनिक भारतावर पडलेला प्रभाव अतिशय प्रभावशाली आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील त्यांच्या सामाजिक राजकीय विचारांचा राजकारणामध्ये आदर आहे. त्यांच्या पुढाकारामुळे जीवनाच्या विविध क्षेत्रात परिणाम झाला आहे आणि आज भारताची सामाजिक, आर्थिक आणि कायदेशीर प्रोत्साहनांद्वारे सामाजिक-आर्थिक धोरणे, शिक्षण आणि सकारात्मक कृती पाहता भारताचा दृष्टीकोन बदलला आहे. 

एक विद्वान म्हणून त्यांची प्रतिष्ठा असल्याने स्वातंत्र्य भारताचे प्रथम कायदा मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि संविधानाचा मसूदा तयार करण्यासाठी ते मसूदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी वैयक्तिक स्वातंत्र्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला आणि जातीरहित समाजावर टीका केली. हिंदू धर्म हा जातिव्यवस्थेचा पाया असल्याच्या त्यांच्या विधानांनी त्यांना सनातनी हिंदुंमध्ये विवादास्पद व अलोकप्रिय बनविले. बौद्ध धर्मातील त्यांच्या धर्मांतराने भारतात व परदेशात बौद्ध तत्त्वज्ञानाच्या रूचीमध्ये एक पुनरुज्जीवन घडून आले.

अनेक सार्वजनिक संस्था, विद्यापीठे, विमानतळे, महाविद्यालये, मैदाने, नगर, संघटना, पक्ष, स्टेडियम, दवाखाने, कारखाने, महामार्ग, रस्ते, इत्यादी त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या नावाने नामांकित आहेत, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, डॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर, आंबेडकर विद्यापीठ दिल्ली त्यांच्या सन्मानार्थ नामांकित केल्या गेलेल्या आहेत. भारतीय संसद भवनात आंबेडकरांचे मोठे अधिकृत तैलचित्र प्रदर्शित केले आहे.

१९२० च्या दशकात बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी म्हणून लंडन मध्ये ज्या घरात राहिले होते, ती वास्तू महाराष्ट्र सरकारने विकत घेऊन त्याला संग्रहालयाचे रूप देत त्यांचे रूपांतर आंतरराष्ट्रीय आंबेडकर स्मारक म्हणून केले गेले आहे.

आंबेडकरांना २०१२ मध्ये हिस्ट्री टीव्ही 18 आणि सीएनएन आयबीएन यांनी आयोजित केलेल्या सर्वेक्षणात "द ग्रेटेस्ट इंडियन" म्हणून सर्वाधिक मतदान दिले गेले होते. जवळजवळ २ कोटी मते टाकली गेली होती आणि याच्या शुभारंभानंतर त्यांना 'सर्वात महान भारतीय' किंवा 'सर्वात लोकप्रिय भारतीय' व्यक्ती घोषित केले गेले.

आंबेडकरांच्या राजकीय तत्त्वज्ञानाने मोठ्या संख्येने राजकीय पक्ष, प्रकाशने आणि कामगार संघटनांना जन्म दिला आहे, ज्या संपूर्ण भारतात विशेषतः महाराष्ट्रात सक्रिय आहेत. बौद्ध धर्माबद्दलच्या त्यांच्या प्रबंधामुळे भारताच्या लोकसंख्येतील मोठ्या वर्गांमध्ये बौद्ध तत्त्वज्ञानामधील रूची वाढली आहे. १९५६ मधील आंबेडकरांच्या नागपूर येथील धर्मांतर सोहळ्याचे अनुकरण करत, वर्तमान काळातील मानवाधिकार कार्यकर्त्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्मांतर सोहळे आयोजित केले जातात. भारतीय बौद्ध अनुयायी त्यांना बोधिसत्व व मैत्रेय असे संबोधतात.

*प्रेरणादायी आंबेडकर :*

बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांना देशातील सर्वसामान्य लोक तर विसरले नाहित, उलट त्यांच्या विचारांचा जगात सर्वत्र जोमाने प्रचार होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तत्त्वज्ञान ‘आंबेडकरवाद’ हा मानवी मूल्यांवर आधारित आहे. त्यांच्या विचारांमुळे देशातील शोषित पीडित जनता जागृत होत आहे. त्यांचे तत्त्वज्ञान हे कालबाह्य ठरले नाही. त्यांच्या तत्त्वज्ञानातून केवळ देशातीलच शोषित लोकांना प्रेरणा मिळाली नाही, तर इतर देशातील शोषित लोकांना प्रेरणा मिळत आहे. 

जपानमध्ये बुराकू नावाची एक शोषित जमात आहे. या जमातीच्या नेत्यांनी भारतात येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. आज ते नेते डॉ. आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचा बुराकू जमातीत प्रसार करीत आहे. बुराकू जमात ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपले प्रेरणास्थान मानते. युरोपाचे ह्रदय असलेल्या हंगेरी देशातील जिप्सी लोकांचे नेते जानोस ओरसोस यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव पडला. त्यांनी हा विचार हंगेरीतील जिप्सो लोकांमध्ये पेरून त्यांच्यात परिवर्तन घडवून आणले. 

१९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात, काही हंगेरियन रोमानी लोकांनी आपल्या स्वतःच्या परिस्थितीत आणि भारतातील दलित लोकांच्या परिस्थितीत समानता पाहिली. आणि ते आंबेडकरांपासून प्रेरित होऊन बौद्ध धर्मांत रूपांतरित होण्यास सुरुवात केली आहे. हंगेरीयन लोकांनी २००७ मध्ये सांजाकोजा शहरात डॉ. आंबेडकर हायस्कूल नावाची शाळा सुरू केली. बहुतेक आंबेडकरांचे नाव असलेली ही विदेशातील एकमेव शाळा असावी. या विद्यालयात बाबासाहेबांची पुस्तके असून त्यांचे विविध चित्रे व विचारही लावण्यात आलेले आहेत. येथे विद्यार्थ्यांना बाबासाहेबांचे पाठही शिकवले जातात. त्यामध्ये बाबासाहेबांचा शिक्षणासाठीचा संघर्ष, जातिविरोधी चळवळी व भारतीय संविधान निर्मिती अमूल्य योगदान या बाबी शिकवल्या जातात. हंगेरी देशाचे शिक्षणमंत्री पालकोवीक्स यांनीही या शाळेला भेट दिलेली आहे. त्या शाळेत १४ एप्रिल २०१६ रोजी बाबासाहेबांचा अर्धपुतळाही स्थापन करण्यात आला आहे, जो हंगेरीतील जय भीम नेटवर्कने या शाळेला भेट दिला होता.

कार्ल मार्क्सच्या जीवनकाळात त्यांच्या तत्त्वज्ञानावर आधारित क्रांती घडली नाही. परंतु १९१७ मध्ये रशियामध्ये मार्क्सच्या तत्त्वज्ञानाच्या आधारे क्रांती घडून आली. त्याचप्रमाणे डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या तत्त्वज्ञानामुळे देशातील शोषित समाज जागृत होत आहे.

बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात बौद्ध धम्माचे पुनरूज्जीवन केले. ही घटना भारतातील बौद्ध धम्माचे इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. इतर देशात आणि बौद्ध राष्ट्रात डॉ. आंबेडकरांचे ग्रंथ मोठ्या प्रमाणात वाचले जात आहेत. महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील प्रकाशित केलेल्या २४ खंडाच्या ग्रंथांना जगभरातून मागणी आहे. तैवान देशात डॉ. आंबेडकरांच्या इंग्रजी, मराठी आणि हिंदी ग्रंथाच्या लाखो प्रती प्रकाशित करून हे ग्रंथ मोफत वाटले जात आहेत.

*प्रत्येक भाषेत आंबेडकरवादी :*

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून देशाच्या प्रत्येक भाषेत आंबेडकरवादी निर्माण झाले आहेत. बाबासाहेबांवर दरवर्षी अनेक संशोधक आणि साहित्यिक नवनवीन ग्रंथ लिहित आहेत. विदेशातदेखील आंबेडकरी साहित्याची विशेष चर्चा असून, आंबेडकरी साहित्याचा अनुवाद इंग्रजीत मोठ्या प्रमाणात होत आहे. आज सवर्त्र डॉ. आंबेडकरांच्या ग्रंथांचा, प्रतिमांचा आणि आंबेडकरी साहित्यांचा प्रचंड खप होतो. दीक्षाभूमी आणि चैत्यभूमीवर दरवर्षी कोट्यवधी रूपयांची पुस्तके विकली जातात. ज्या समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले होते, त्या समाजात ज्ञानर्जनाची वृत्ती निर्माण झाली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर चरित्र लिहून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचे काम जवळपास १०० चरित्रकारांनी केले आहे. चरित्रकारांनी कथा, काव्य, कादंबरी, जातककथा, नाटक व चित्रमयकथा अशा अनेक रचनांमध्ये चरित्र लिहिल्याचे दिसून येते.

*भारतीय समाजावरील प्रभाव :*

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतीय समाज जीवनावर खूप प्रभाव पडलेला आहे. बाबासाहेब हे पददलितांचे उद्धारक होतेच शिवाय ते देशात शोषित, पिडित, गरीब, दबलेल्या, पिचलेल्या लोकांचेही उद्धारक होते.

*जातिव्यवस्थेचे उच्चाटन :*

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे भारतीय समाजात सुमारे ५००० वर्षापासून प्रचलित असलेल्या जातिव्यवस्थेस खिंडार पाडले; तिचे उच्चाटन होण्यास चालना मिळाली. विषमतेवर आधारलेल्या जातिव्यवस्थेच्या जागी समतेवर आधारलेली लोकशाही व्यवस्था प्रस्थापित होण्यास चालना मिळाली.

*अस्पृश्यांची उन्नती :*

त्यांच्या कार्यामुळे हजारों वर्षापासून उच्च जातीच्या गुलामगिरीत अडकून पडलेल्या अस्पृश्यांमध्ये एकता व जागृती निर्माण झाली. अस्पृश्यांना त्यांच्यावर होणार्‍या अन्यायाची जाणिव झाली. परिणामी त्याच्यांत आत्मविश्वास व आत्मविष्कार निर्माण झाला. आपणच आपल्या विकासासाठी लढा दिला पाहिजे, याची जाणिव झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी राज्यघटनेत ज्या विशेष तरतुदी केल्या, त्यामुळे अस्पृश्यांच्या हक्कांना घटनात्मक वैधता प्राप्त झाली. आज सरकार समाजकल्याणाच्या विविध योजना राबविते. त्याचे मोठे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यात जाते. याचा परिणाम म्हणून अस्पृश्यांमध्ये ऊर्ध्वगामी सामाजिक गतिशीलतेस चालना मिळाली.

*बौद्ध धर्माचा प्रसार :*

इ.स.पू. ३ ऱ्या शतकात सम्राट अशोकांच्या काळात भारताचा राज्यधर्म असलेल्या बौद्ध धर्माचा ११व्या शतकानंतर भारतात ऱ्हास घडून आला. बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ मध्ये आपल्या अनुयायांसह नवयान बौद्ध धर्म स्वीकारल्याने बौद्ध धर्माच्या प्रचारास चालना मिळाली. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात व इतरही अनेक राज्यांत लाखो लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि ६० वर्षापासून दरवर्षी अखंडपणे हजारों-लाखोंच्या संख्येने स्वीकारतही आहेत. इतरही अनेक उच्चशिक्षित लोक बौद्ध धर्माकडे आकर्षित झाले. त्यांनी बौद्ध तत्त्वज्ञान, साहित्य व पाली भाषा यांच्या अभ्यासाची सुरूवात केली. २००१ ते २०११ च्या जनगणनेवरून भारतातील अनुसूचित जातीमध्ये अत्यंत वेगाने वाढणारा धर्म म्हणजे बौद्ध धर्म होय. २०११ च्या जनगणनेनुसार, एकूण भारतीय बौद्धांत सुमारे १३% पूर्वीपासूनचे म्हणजेच पारंपारिक बौद्ध आहेत तर ८७% नवयानी बौद्ध किंवा नवबौद्ध आहेत. आणि देशातील जवळजवळ ९०% नवयानी बौद्ध हे महाराष्ट्र राज्यात आहेत.

*आमूलाग्र परिवर्तनास चालना :*

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे भारतीय समाजात आमूलाग्र परिवर्तन घडून आले आणि जातिव्यवस्थेत परिवर्तन होण्यास मोठ्या प्रमाणावर सुरूवात झाली. तसेच विवाह, धर्म, अर्थ, शिक्षण राज्य या सामाजिक संस्थांतही परिवर्तन सुरू झाले. नवबौद्धांनी हिंदूविवाह पद्धती नाकारली व बौद्ध विवाहपद्धती स्वीकारली. बाबासाहेबांच्या पुरोगामी विचारांमुळे दलितांनी बलुता पद्धतीचा त्याग केला. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलला. जे लोक शिक्षणापासून वंचित होते त्यांनी शिक्षण घेणे सुरू केल्याने शिक्षणाचे सार्वत्रीकरण घडून आले. आरक्षणाच्या धोरणामुळे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना राजकीय व प्रशासकीय सत्ता मिळाली. परिणामी समाजातील सर्व घटकांना राजकीय सहभाग मिळणे शक्य झाले.

*दलित चळवळीचा उदय :*

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नांमुळे दलित चळवळीचा उदय झाला. सुरूवातीस केवळ महार लोकच या चळवळीत सहभागी झाले होते. शिक्षणप्रसाराबरोबरच इतर मागास जातीही बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित झाल्या व त्यांनी त्यांच्या हक्कांसाठी चळवळी सुरू केल्या. दलित चळवळीला आज प्रामुख्याने ‘आंबेडकरवादी चळवळ’ म्हटले जाते.

*लोकप्रिय संस्कृती मध्ये :*

अनेक चित्रपट, नाटके, पुस्तके, गीते-भीमगीते आणि इतर साहित्य बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर व विचारांवर आधारित आहेत. २००० मध्ये जब्बार पटेल यांनी इंग्रजी भाषेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रपट दिग्दर्शित केला, ज्यात मामुट्टी हे मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट राष्ट्रीय फिल्म विकास महामंडळ आणि सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाने प्रायोजित केला होता. चित्रपटाला लांब आणि वादग्रस्त घटनांनंतर प्रकाशीत केले गेले होते.  श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेल्या भारताच्या संविधानाच्या निर्मितीवरील एक टीव्ही लघु-मालिका ‘संविधान’ मध्ये बाबासाहेब आंबेडकरांची प्रमुख भूमिका सचिन खेडेकर यांनी केली होती.अरविंद गौर यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि राजेशकुमार यांनी लिहिलेल्या आंबेडकर आणि गांधी नाटकात या दोन मान्यवर व्यक्तिमत्त्वांचा शोध घेतला.

*भीमयान : अस्पृश्यतेचे अनुभव :*

हे आंबेडकरांचे ग्राफिक चरित्र आहे, ज्याला परधन-गोंड कलाकार, दुर्गाबाई व्याम, सुभाष व्याम, आणि लेखक श्रीविज्ञान नटराजन आणि एस आनंद यांनी बनवले आहे. या पुस्तकात आंबेडकरांचे लहानपणापासून प्रौढत्वापर्यंतच्या अस्पृश्यतेच्या अनुभवांना दर्शवण्यात आले आहे. सीएनएनने त्यास शीर्ष ५ राजकीय कॉमिक पुस्तकांपैकी एक म्हटले आहे.

लखनौ मधील आंबेडकर स्मारक त्यांच्या स्मृतींना समर्पित आहे. येथील चैत्यामध्ये त्यांचे जीवनचरित्र दाखवणारी स्मारके आहेत.

गूगलने १४ डिसेंबर २०१५ रोजी मुख्यपृष्ठ डुडलच्या माध्यमातून आंबेडकरांचा १२४ वा वाढदिवस साजरा केला. हे डुडल भारत, अर्जेंटिना, चिली, आयर्लंड, पेरू, पोलंड, स्वीडन आणि युनायटेड किंग्डममध्ये चित्रित करण्यात आले होते.

*आंबेडकर प्रतीके :*

अनेक गोष्टीं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतीके बनलेल्या आहेत, त्यापैकी काही खालिलप्रमाणे :-

*भीम ध्वज :*

*भारतीय बौद्ध ध्वज - (भीम ध्वज)*

हा बाबासाहेबांचा अशोकचक्र चिन्हांकित निळा ध्वज भारतातील बौद्ध व दलित आंदोलनात आंबेडकरवाद्यांद्वारे नियमित वापण्यात येतो. या ध्वजाचा रंग निळा असून तो समतेचे व त्यागाचे प्रतिक मानला जातो. बाबासाहेब हे समतेचे पुरस्कर्ते होते. या ध्वजावर सम्राट अशोकांचे पांढऱ्या रंगात बौद्ध धम्मचक्राचा एक रूप असलेले अशोकचक्र असते. बहुतांश वेळा या ध्वजावर ‘जय भीम’ असे शब्द लिहिलेले असतात. हा ध्वज भारतीय बौद्धांचे प्रतिक सुद्धा मानला जातो, बौद्ध विहार किंवा बौद्ध मंदिरसमोर हा ध्वज पंचशील बौद्ध ध्वजांसह उभा केलेला असतो. दलित आणि बौद्धांच्या घराच्या छतावरही हा ध्वज लावला जातो. डॉ. आंबेडकर व बौद्ध धर्मासंबंधीच्या अनेक ठिकाणी हा ध्वज स्थित असतो. भारताबाहेर विदेशात हा ध्वज तेथील आंबेडकरवादी लोक वापरत असतात. आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन, शिवजयंती, मनुस्मृती दहन दिन आदी उत्सवाच्या वेळी या ध्वजाचा वापर होत असतो. भारतीय रिपब्लिकन पक्ष या राजकीय पक्षाच्या सर्व गटांत हा ध्वज पक्षचिन्ह आहे.

*नवयान*

नवयान बौद्ध धम्म हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महत्त्वाचे प्रतिक आहे. नवयानचे स्थापना डॉ. आंबेडकरांनी केली आहे. भारतातील कोट्यवधी शोषित, पिडित दलित जनतेच्या धार्मिक गुलामीच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी डॉ. आंबेडकरांना त्यांना या नवयान बौद्ध धम्माची दीक्षा दिली. नवयान हा शुद्ध स्वरूपाचा नवीन बौद्ध धम्म (नवबौद्ध धर्म) होता, ज्यात अंधश्रद्धा, जातियता यांना थारा नव्हती. हा नवा बौद्ध संप्रदाय महायान, थेरवाद व वज्रयान या बौद्ध संप्रदायांपेक्षा भिन्न स्वरूपाचा आहे.

*आंबेडकर जयंती*

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन (जयंती) हा भारतासह संपूर्ण जगात साजरा केला जातो. जगातील ६५ पेक्षा अधिक देश दरवर्षी आंबेडकर जयंती साजरी करतात. महाराष्ट्र सरकारने १४ एप्रिल २०१७ पासून आंबेडकर जयंती ही ज्ञान दिवस म्हणून महाराष्ट्र राज्यात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली जयंती सदाशिव रणपिसे यांनी १४ एप्रिल १९२८ रोजी पुण्यात साजरी केली. रणपिसे हे आंबेडकरांचे अनुयायी होते. त्यांनी बाबासाहेबांच्या जयंतीची प्रथा सुरू केली आणि भीम जयंतीचे औचित्य साधत बाबासाहेबांची प्रतिमा हत्तीच्या अंबारीत ठेवून रथातून, उंटावरून अनेक मिरवणुका काढल्या होत्या.

*चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका व नाटके*

* भीम गर्जना - मराठी चित्रपट (१९९०)
* बालक आंबेडकर – कन्नड चित्रपट, हिंदीमध्ये डब (१९९१)
* युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर - मराठी चित्रपट (१९९३)
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर – इंग्रजी भाषेतील चित्रपट, अनेक भारतीय भाषेत डब (२०००)
* डॉ. बी.आर. आंबेडकर – कन्नड चित्रपट (२००५)
* रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई) – मराठी चित्रपट, हिंदीमध्ये डब (२०१०)
* शूद्रा: द राइझिंग – हिंदी चित्रपट (२०१०), आंबेडकरांना समर्पित चित्रपट
* अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकावर आधारित हिंदी चित्रपट (२०१३)
* रमाबाई – कन्नड चित्रपट (२०१६)
* बोले इंडिया जय भीम – मराठी चित्रपट (हिंदी डब) (२०१६)
* बाळ भिमराव – मराठी चित्रपट (२०१८)

*दूरचित्रवाणी मालिका*

* डॉ. आंबेडकर — दुरदर्शन दूरचित्रवाणी वरील हिंदी मालिका

*नाटके*

* वादळ निळ्या क्रांतीचे (नाटक, लेखक - प्रा. रामनाथ चव्हाण)
* डॉ. आंबेडकर आणि गांधीजी - नाटक
प्रतिकार - नाटक
➖➖➖➖➖➖➖➖     
*श्री ज्ञानेश्वर भाऊराव बडगे उदगीर*
➖➖➖➖➖➖➖➖


Corrupted Pendrive व Memory card कसे दुरुस्त करावे या विषयी लिंक

Corrupted Pendrive व Memory card कसे दुरुस्त करावे या विषयी लिंक

 https://youtu.be/uXrUJ_tcJzE

            

Saturday, December 5, 2020

आज 6 डिसेंबर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन*

*आज 6 डिसेंबर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन*


   



*डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन*
        *आज दिनांक 6/12/2020 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु. ता.शि.अनंतपाळ जिल्हा लातूर येथे 6 डिसेंबर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला शाळेचे मुख्याध्यापक श्री माधवराव पारशेट्टे, चंद्रकांत कोरे व सुदर्शन पाटील व इतर शिक्षकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तदनंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री माधवराव पारशेट्टे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती दिली.  आभार प्रदर्शन शाळेतील शिक्षक श्री सुदर्शन पाटील यांनी मानले. या वेळी शाळेतील शिक्षक उपस्थित होते*

Thursday, December 3, 2020

Global Teacher Prize | जागतिक शिक्षक पुरस्काराबद्दल

Global Teacher Prize | जागतिक शिक्षक पुरस्काराबद्दल
➖➖➖➖➖➖➖➖➖

•  Global Teacher Prize | जागतिक शिक्षक पुरस्काराबद्दल
•  पात्रता निकष
•  पुरस्कार कसा दिला जातो?
•  अर्ज कुठे करावा ?
•  पात्र होण्यासाठी, काही नियम

https://cutt.ly/Global-Teacher-Prize-2021