Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Tuesday, December 15, 2020

महाराष्ट्र राज्यातील जिल्हे निमिती*

*💥महाराष्ट्र राज्यातील जिल्हे निमिती*💥

↪१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर त्यात एकूण २६ जिल्हे होते. त्यानंतर अनेक कारणांनी जुन्या जिल्ह्यांचे भाग पडत अजून १० जिल्हे तयार करण्यात आले असे सगळे मिळून आजच्या वेळेला *महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत*.

*महाराष्ट्र राज्य २६ जिल्ह्यांसोबत स्थापन झाल्यानंतर पुढील १० जिल्हे नवीन तयार करण्यात आले* 

👉१. *सिंधुदुर्ग जिल्हा* : १ मे १९८१ रत्नागिरीमधून

👉२. *जालना जिल्हा* : १ मे १९८१ औरंगाबादमधून

👉३. *लातूर जिल्हा* : १६ ऑगस्ट १९८२ उस्मानाबादमधून

👉४. *गडचिरोली जिल्हा*: २६ ऑगस्ट १९८२ चंद्रपूरमधून

👉५. *मुंबई उपनगर* : १ ऑक्टोबर १९९० मुंबईमधून

👉६. *गोंदिया जिल्हा* : १ मे १९९९ भंडारामधून

👉७. *हिंगोली जिल्हा* : १ मे १९९९ परभणीमधून

👉८. *नंदुरबार जिल्हा* : १ जुलै १९९८ धुळेमधून

👉९. *वाशिम जिल्हा* : १ जुलै १९९८ अकोला मधून

👉१०. *पालघर जिल्हा* : १ ऑगस्ट २०१४ ठाणे मधून

*☮महाराष्ट्रातील एकूण ३६ जिल्हे*☮

*कोकण विभाग (७ जिल्हे)* 

👉मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

*पुणे विभाग (५ जिल्हे)*

👉पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर.

*नाशिक विभाग (५ जिल्हे)* 

👉नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव.

*औरंगाबाद विभाग (८ जिल्हे*) 

👉औरंगाबाद, नांदेड, परभणी, लातूर, उस्मानाबाद, जालना, हिंगोली, बीड.

*नागपूर विभाग (६ जिल्हे)* 

👉नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

*अमरावती विभाग (५ जिल्हे*) 

अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा.


No comments:

Post a Comment