Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Monday, March 8, 2021

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ येथे जागतिक महिला दिन उत्साहाने साजरा*

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ येथे जागतिक महिला दिन उत्साहाने सा

   




 तिवटग्याळ - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता. उदगीर येथे आज दिनांक 8 मार्च 2021 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती जिल्हा शाखा लातूर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ च्या वतीने तिवटग्याळ गावातील शैक्षणिक सामाजिक व राष्ट्रीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महालांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. सर्व प्रथम क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला गावचे प्रथम नागरिक तथा महिला सरपंच सौ. उज्ज्वला ताई नरहरे व गजानन नरहरे व उपस्थित मान्यवरांच्या यांच्या हस्ते नारळ फोडून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जागतिक महिला दिनाच्या सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. तद्नंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी प्रास्ताविकातून शाळे विषयी सविस्तर माहिती दिली. शाळेची शैक्षणिक प्रगती व भौतिक सुविधा या विषयी माहिती दिली व सध्या शाळा पहिली ते चौथी पर्यंत अद्याप शाळा सुरु झाली नाही तरी विद्यार्थ्यांना कोविड कॅप्टन गटास भे ट व आनलाईन अभ्यास दिला जात आहे. तो पालकांनी पहावा व आपल्या विद्यार्थ्यांस मार्गदर्शन करावे काही अडचणी आल्या तर मला वैयक्तिक भेटावे असे सांगितले व आज जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या गावातील शैक्षणिक सामाजिक व राष्ट्रीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येत आहे असे सांगितले. व सत्कार सोहळ्यास सुरुवात केली. प्रथम गावातील महिला सरपंच- उज्ज्वला व्यंकटराव नरहरे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तद्नंतर - फुलाबाई काशीनाथ पाटील उपसरपंच तिवटग्याळ 
- अंजली रमेश लोहारकर
सहशिक्षीका तिवटग्याळ 
- पूजा अंबादास बिरादार
अंगणवाडी कार्यकर्ती तिवटग्याळ 
-भागाबाई बापूराव बिरादार
अंगणवाडी मदतनीस तिवटग्याळ 
- श्रीदेवी विरभद्र कोरे
आशा कार्यकर्ती तिवटग्याळ 
- वर्षा राजकुमार श्रीमंगले
शालेय पोषण आहार मदतनीस
तिवटग्याळ 
- रंजना पद्माकर पाटील
शाळा व्यवस्थापन समिती सदस्य
तिवटग्याळ
- गिताताई कच्छवे
बचत गट तिवटग्याळ
.शितलताई पाटील
बचत गट तिवटग्याळ आदी कर्तुत्ववान महिलांना गावातील महिला सरपंच सौ. उज्ज्वला ताईला नरहरे व प्रमुख पाहुणे हस्ते पुष्पहार व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या सोहळ्याचे सुत्र संचालन शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे व आभार शाळेतील शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.



















































No comments:

Post a Comment