*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळेत वृक्ष लावून जागतिक पर्यावरण दिन उत्साहाने साजरा*
*तिवटग्याळ - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे आज दिनांक 5/6/2021 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शाळेत प्रति शिक्षक 5 झाडे या प्रमाणे आज शाळेत पर्यावरण दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला व शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रमेश साळुंके, श्री रमेश वाघमारे, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार, मदतनीस श्रीमती भागाबाई बिरादार व राजकुमार श्रीमंगले व अन्य जण यांच्या हस्ते शाळेत व शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले व तद्नंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे व श्रीमती अंजली लोहारकर यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सविस्तर माहिती दिली व पर्यावरणाचे महत्त्व सांगितले. आज या कोरोना महामारीच्या वातावरण आॅक्सीजन किती महत्वाचे आहे हे सर्वांना समजले आहे. कित्येक रुग्ण आॅक्सीजन अभावानेच मृत्यू पावले आहे. त्यामुळे प्रत्येकाने एक झाड लावून संवर्धन करणे आवश्यक आहे असे सांगितले व उपस्थित सर्वांनी वृक्ष लावून जगवण्याचे टिकवण्याचे हमी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर यांनी व आभार शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले.*
No comments:
Post a Comment