तिवटग्याळ - - - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे आज दिनांक 26/11/2021 रोजी संविधान दिनानिमित्त शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार, मदतनीस श्रीमती भागाबाई बिरादार, आशा कार्यकर्ती श्रीदेवी कोरे, वर्षा श्रीमंगले, श्रीमती तौर सिस्टर व श्री येलमटे मॅडम आरोग्य सहाय्यक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून व पुष्पहार अर्पण संविधान दिन साजरा करण्यात आला. व उपस्थित सर्व विद्यार्थी व शाळेतील शिक्षक यांच्या उपस्थितीत सामुहिक संविधान प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले. तद्नंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित व संविधान निर्मिती या विषयावर सविस्तर माहिती मसुदा समितीची स्थापना संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते, घटना समितीची पहिली बैठक, 11 डिसेंबर 1946 च्या संविधान सभेचे अध्यक्ष,
संविधान सभेने घटनात्मक कायदेशीर सल्लागार म्हणून कोणाला नियुक्त केले, मूळ संविधानात एकूण परिशिष्टे समाविष्ट, मूळ संविधानात एकूण किती कलमांचा समावेश, भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेले अधिकार या विषयावर सविस्तर माहिती दिली. या संविधान प्रास्ताविकाचे वाचन कार्यकमाचे सुत्र संचालन शाळेतील शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर व उपस्थित सर्वांचेच आभार शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले.
No comments:
Post a Comment