Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, December 4, 2021

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहाने स्वागत.*

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहाने स्वागत.*













उदगीर ...... तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक  शाळा ता. उदगीर जि लातूर येथे आज 1 डिसेंबर 2021 रोजी शाळा शुभारंभ निमित्ताने प्रवेशोत्सव उपक्रमा अंतर्गत इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या 100 % विद्यार्थ्यांना आज शाळेत भेट देण्यासाठी आलेल्या केंद्र प्रमुख श्रीमती प्रतिभा मुळे मॅडम यांच्या हस्ते सन्मान पुर्वक  हार, फुगे घालून शाळेत सर्व विद्यार्थ्यांना घेऊन या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला .तद्नंतर केंद्र प्रमुख श्रीमती प्रतिभा मुळे मॅडम यांच्या उपस्थितीत शाळेचा इंग्रजी भाषेत परीपाठ घेण्यात आला. नवागत विद्यार्थ्यांचे स्वागता नंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या हस्ते केंद्र प्रमुख श्रीमती प्रतिभा मुळे मॅडम यांचा सत्कार करण्यात आला. तद्नंतर केंद्र प्रमुख श्रीमती प्रतिभा मुळे मॅडम यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सन 2021 - 2022 या शैक्षणिक वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. शाळेत नियमित यावे, दैनंदिन अभ्यास करावा, कोविड - 19 नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. नियमित स्वच्छता व मास्क, सानिटायझर चा वापर करावा. असे सविस्तर मार्गदर्शन केले. तद्नंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधला, विद्यार्थी बोलके व अभ्यासू असलेल्या चे आवर्जून सर्वांना सांगितले. इंग्रजी परिपाठ सादरीकरण पाहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थी आनंदी व उत्साही दिसत आहे हे पाहून तसेच शाळेतील शैक्षणिक वातावरण व गुणवत्ता पाहुन समाधान व्यक्त केले. तसेच नवागत विद्यार्थ्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी म्हणून मराठी,गणित विषयासातील गमती जमती, गोष्ट, गाणी, बडबड गीते घेतली हे पाहून सर्व विद्यार्थी आनंदी,खुश दिसून आले. विद्यार्थी रममान झाल्याचे दिसून आले हे पाहून  केंद्र प्रमुख श्रीमती प्रतिभा मुळे मॅडम यांनी समाधान व्यक्त केले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी केंद्र प्रमुख श्रीमती प्रतिभा मुळे मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रमेश साळुंके, श्री अरूण पाटील, निवृत्ती पाटील, श्रीमती भागाबाई बिरादार व अन्य जण उपस्थित होते.तसेच नवागत विद्यार्थ्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी म्हणून मराठी,गणित विषयासातील गमती जमती, गोष्ट, गाणी, बडबड गीते. सर्व विद्यार्थी आनंदी,खुश दिसून आले, विद्यार्थी रममान झालेले पाहून केंद्र प्रमुख श्रीमती प्रतिभा मुळे मॅडम यांनी समाधान व्यक्त केले. उपस्थित सर्वांना केंद्र प्रमुख श्रीमती प्रतिभा मुळे मॅडम यांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केल्याबद्दल  शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे विशेष आभार मानले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रमेश साळुंके, गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री अरुण पाटील, निवृत्ती पाटील, श्रीमती भागाबाई बिरादार व अन्य जण उपस्थित होते. उपस्थित सर्वांचेच आभार शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले.

No comments:

Post a Comment