Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Tuesday, April 19, 2022

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी



*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी*


        *तिवटग्याळ - आज दिनांक 14/4/2022 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर  येथे 14 एप्रिल 2022 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त  त्यांच्या प्रतिमेला शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे , गावातील सरपंच सौ उज्ज्वला ताई नरहरे, राम लोहारकर, अंजली लोहारकर, पूजा बिरादार व मदतनीस श्रीमती भागाबाई बिरादार, पालक व इतर शिक्षकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तदनंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, राम लोहारकर व शाळेतील शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती सांगितली.   या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर व आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले. या वेळी गावचे महिला सरपंच सौ उज्ज्वला ताई नरहरे, राम लोहारकर, शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार व मदतनीस श्रीमती भागाबाई बिरादार, शाळेतील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते*




























No comments:

Post a Comment