" शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रम . १)आदर्श परीपाठ २)मराठी भाषेत परीपाठ 3)इंग्रजी भाषेत परीपाठ ४)दिनांकानुसार पाढा ५)बोधकथा ६)चित्रकला स्पर्धा ७)वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ८)सांस्कृतिक कार्यक्रम ९)गीतगायन स्पर्धा १०)भाषण स्पर्धा ११)क्रीडा स्पर्धा १२)वाढदिवस साजरे करणे। १३)भित्तिपत्रक तयार करणे १४)निसर्गसहल १२)स्वच्छता सप्ताह साजरा करणे १३)विद्यार्थी दत्तक घेणे १४)विविध जयंत्या व पुण्यतिथी १५)बचत बँक १६)हस्ताक्षर सुधार १७)हजेरी घेताना इंग्रजी शब्द १८)वाचन कट्टा १९)बाजार २०)परसबाग २१)उपस्थिती ध्वज २२)इंग्रजी संभाषण २३)शब्द बँक २४)स्वच्छ मुलगा-मुलगी २५)दत्तक कुंडी प्रकल्प २६)तंबाखू मुक्त शाळा २७)दत्तक मित्र २८)वर्तमानपत्र वाचन २९)विविध क्रीडा स्पर्धा ३०)चित्रकला स्पर्धा, ३१)निबंध लेखन ३२)वक्तृत्व स्पर्धा आयोजन ३३)हस्ताक्षर स्पर्धा ३४)दप्तराविना शाळा ३५)शब्द बाग Garden of words ३६)हस्ताक्षर सुधार प्रकल्प ३७)राजा काय म्हणतात ३८)प्रश्न आमचे ,उत्तर आमचे ३९)वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ४०)शिक्षकाचे व विद्यार्थ्यांचे सत्कार ४१)कला, कार्यानुभव कोपरे ४२)बाल आनंद मेळावे ४३)विविध विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन ४४)प्रवेशोत्सव ४५)100% पटनोंदणी ४६)लघु उद्योगाला भेटी ४७)हरित शाळा ४८)पक्ष्यांना खाऊ ४९)ज्ञानरचनावादी साहित्य ५०)डिजीटल शाळा ५१)आनंदायी शाळा, Happy school स्कूल"

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा पूर्व तयारी मेळावा चे आयोजन



*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ येथे शाळा पूर्व तयारी मेळावा चे आयोजन*

तिवटग्याळ - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे आज दिनांक 20/4/2022रोजी शाळा पूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला. प्रथम गावात सकाळी शाळा पूर्व तयारी मेळावा निमित्ताने गावात सकाळी विविध घोषणा देत प्रभातफेरी काढण्यात आली. ऐका हो ऐका. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ येथे प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करा अशा विविध घोषणा देण्यात देत प्रभातफेरी काढण्यात आली. तद्नंतर शाळेत  क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते पुष्पहाराने पुजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे व उपस्थित सर्व प्रवेशपात्र मुलांचे पूष्पहार घालून स्वागत करण्यात आले. तद्नंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी प्रास्ताविकात शाळा पूर्व तयारी अभियान या विषयावर सविस्तर माहिती दिली. मुलांचे नाव नोंदणी केली. शारीरिक विकास बौध्दिक विकास सामाजिक आणि भावनिक विकास भाषा विकास गणनपूर्व तयारी समुपदेशन मार्गदर्शन वरील टेबल क्रमांक नुसार मुलांचा अभ्यास घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रमेश साळुंके, गावातील सरपंच सौ उज्ज्वला ताई नरहरे, रामचंद्र पाटील, अरुण पाटील, प्रभाकर पाटील, मधूकर पाटील, नवनाथ कच्छवे, राजकुमार श्रीमंगले, भागवत कांबळे, शिवराज पाटील, सिमिंताबाई कांबळे, संगीता बिरादार, वर्षा श्रीमंगले, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार, शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर आदी जण उपस्थित होते. अशा प्रकारे कार्यक्रम समारोप करण्यात आला. या शाळा पूर्व तयारी मेळावा चे अतिशय सुंदर नियोजन अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार, शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली व शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी केले. या मेळाव्याचे सुत्रसंचलन अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार व आभारप्रदर्शन शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर यांनी मानले.












































































No comments:

Post a Comment

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व ग्रामपंचायत येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत 14 आॅगस्ट 2025 दुसरा ध्वजारोहन संपन्न

*तिवटग्याळ  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व ग्रामपंचायत येथे  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत 14 आॅगस्ट 2025 दुसरा ध्वजारोहन संपन्न* ---...