Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Friday, April 22, 2022

गुरुजी साहित्य संमेलन म्हणजे काय हो.... उदगीर येथे होत आहे ते साहित्य संमेलनात काय काय असते.....



गुरुजी साहित्य संमेलन म्हणजे काय हो.... उदगीर येथे होत आहे ते साहित्य संमेलनात काय काय असते..... 

माझ्या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडला होता की उदगीर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे ते काय असते सर या विषयावर मला प्रश्न विचारले. तरी मी शाळेतील सर्व विद्यार्थाना उदगीर येथे 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय येथे तीन दिवस 22, 23 व 24 एप्रिल 2022 रोजी तीन दिवस चालणार आहे आणि या तीन दिवसांत काय काय विषय व कार्यकम होतात या विषयावर सविस्तर माहिती दिली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा मराठी साहित्यप्रेमी जनतेचा एक आनंदाचा उत्सव असतो.
साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठी, उर्दू कन्नड व तेलगु भाषिक साहित्याचा सन्मान देऊन या चार साहित्यावर मंथन होणार आहे.
साहित्यिक व प्रसिद्ध कथाकार भारत सासणे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडून झाली आहे. 22, 23 आणि 24 एप्रिल 2022 रोजी  उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय येथे होणार आहे.  या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या रशीकांना व या साहित्य संमेलनाची जनजागृती साठी दोन दिवस अगोदर दिनांक 20 एप्रिल 2022 रोजी प्रसिद्ध संगीतकार अजय अतुल यांचा संगीत रजनी कार्यक्रम आयोजित केला आहे. तसेच दिनांक 21 एप्रिल 2022 रोजी झी मराठी वाहिनीवर प्रसिद्ध असलेला कार्यक्रम चला हवा येउ द्या भाऊ कदम, श्रेया बुगडे, भारत गणेशपूरे, डॉ. निलेश साबळे यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी, दिवस पहिला - 22 एप्रिल 2022 रोजी घेण्यात येणारे कार्यक्रम सकाळी ग्रंथदिंडी, ध्वजारोहण, ग्रंथ प्रदर्शन, परीसंवाद 1-स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव काय कमावले काय गमावले, कवि कट्टा, गझल मंच, पुस्तक प्रकाशन, परिसंवाद 2-मराठी साहित्यातील शेतकर्‍यांचे चित्रण किती खरे किती खोटे, कविसंमेलन, परिसंवाद 3-मराठी लेखकाचे लेखन व्याज स्त्रीवादावर अडकले आहे, परिसंवाद 4-मराठी, कन्नड, तेलुगू आणि उर्दु यांचा भाषिक व सांस्कृतिक अनुबंध, लोक कला, लोक नृत्य सादरीकरण.
दिवस दुसरा-23 एप्रिल 2022 रोजी 
परिसंवाद 5-लेखक आणि लोकशाही मुल्ये, प्रकट मुलाखत, मी मराठी बोलतोय, संवाद आजच्या कादंबरीकारांशी, कथाकथन, सांस्कृतिक, उदयोत्सव, परिसंवाद 6-मराठी साहित्यात निसर्ग चित्रणच आहे पर्यावरण नाही, परिसंवाद 7-प्रसार माध्यमांची विश्वासार्हता आज शुन्यावर येऊन ठेपली आहे. सीमावर्ती निमंत्रिताचे कविसंमेलन, बाळ मेळावा, बालकाचे काव्य वाचन
दिवस तिसरा-24 एप्रिल 2022 रोजी 
परीचर्चा - आज्ञापत्र, सांस्कृतिक कार्यक्रम, परीसंवाद 8-वचन साहित्य आणि आधुनिकता, परीसंवाद 9-सीमा भागात अडकलेल्या मराठी समाजाला भारत सरकार अजून किती दिवस कुजवणार, परीसंवाद - बाल वाचन, बालकादंबरी वाचन, सूंदर माझी शाळा, कविकट्टा, गझल मंच, आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चा समारोप.
अशा पध्दतीने तिन दिवस अतिशय आनंददायी वातावरणात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर येथे महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय येथे होणार आहे. ही सर्व माहिती ऐकून विद्यार्थ्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे काय हे कळले.
➖➖➖➖➖➖➖➖➖
 *श्री ज्ञानेश्वर बडगे*
*मुख्याध्यापक*
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर*
➖➖➖➖➖➖➖➖➖





No comments:

Post a Comment