*तिवटग्याळ जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी केला गुरू चा सन्मान*
तिवटग्याळ - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे दिनांक 13/7/2022 रोजी गुरू पौर्णिमा निमित्त शाळेत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. इयत्ता चौथी च्या विद्यार्थ्यांनी गुरू पौर्णिमा निमित्त गुरूंचा सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार, मदतनीस श्रीमती भामाबाई बिरादार यांना मंचावर आमंत्रित करण्यात आले. महर्षी व्यास मुनी यांच्या विषयी सविस्तर माहिती दिली. मोठ्या उत्साहाने गुरू पौर्णिमा साजरी करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार, मदतनीस श्रीमती भामाबाई बिरादार यांचा विद्यार्थ्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारा नंतर शाळेतील विद्यार्थी कु. प्राची पाटील, लक्ष्मी कच्छवे यांनी गुरु शिष्य विषयावर कविता गायन केले . गुरू शिष्य आधारित कविता कु. प्राची पाटील, लक्ष्मी कच्छवे यांनी . सादर केली.तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन गुरू पौर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार, मदतनीस श्रीमती भामाबाई बिरादार उपस्थितीत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थी कु. प्राची पाटील व लक्ष्मी कच्छवे यांनी केले. उपस्थित सर्वांचे आभार शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी शाळेतील विद्यार्थी. शिक्षक व पालक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment