Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, July 16, 2022

तिवटग्याळ येथे मिशन झिरो ड्राॅप आऊट सर्व्हेक्षण सुरुवात*

*तिवटग्याळ येथे मिशन झिरो ड्राॅप आऊट सर्व्हेक्षण सुरुवात* 


















  



 *तिवटग्याळ - तिवटग्याळ गावात समग्र शिक्षा अभियान जिल्हा परिषद लातूर अंतर्गत शाळा बाह्य विद्यार्थी शोध मोहीम (mission zero drop out) समिती गठीत करुन  सर्व्हेक्षण प्रमुख तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, गावातील सरपंच सौ उज्ज्वला ताई नरहरे, उपसरपंच प्रशांत पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रमेश साळुंके, पोलीस पाटील श्री धनराज पाटील, आरोग्य कर्मचारी परमेश्वर खटके, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार, आशा कार्यकर्ती श्रीदेवी कोरे  आदी सदस्यांच्या सहकार्याने तसेच शाळा बाह्य विद्यार्थी शोध मोहीम Mission zero drop out मोहीम राबविण्यात येत आहे. Dor to Dor घरी जाऊन सर्व्हेक्षण प्रपत्र भरून घेण्यात येत आहे. या मोहिमेत शाळा बाह् विद्यार्थी शोधून त्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे असे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी सांगितले. या प्रपत्रातून कुंटूब प्रमुखाचे नाव, जात संवर्ग, व्यवसाय, 3 ते 18 वयोगटातील मुले व मुली सदस्य संख्या, 3 ते 18 वयोगटातील शाळेत दाखल, 3 ते 18 वयोगटातील विशेष गरजा असलेले मुले, 3 ते 18 वयोगटातील अजीबात शाळेत दाखल न झालेली मुले आदी मुद्द्यांचा आधारे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणासाठी गावातील सरपंच सौ उज्ज्वला ताई नरहरे, उपसरपंच प्रशांत पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रमेश साळुंके, पोलीस पाटील श्री धनराज पाटील, आरोग्य कर्मचारी परमेश्वर खटके, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार, आशा कार्यकर्ती श्रीदेवी कोरे आदी जणांनी सहकार्य करत आहे असे शाळेतील मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी सांगितले*

No comments:

Post a Comment