" शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रम . १)आदर्श परीपाठ २)मराठी भाषेत परीपाठ 3)इंग्रजी भाषेत परीपाठ ४)दिनांकानुसार पाढा ५)बोधकथा ६)चित्रकला स्पर्धा ७)वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ८)सांस्कृतिक कार्यक्रम ९)गीतगायन स्पर्धा १०)भाषण स्पर्धा ११)क्रीडा स्पर्धा १२)वाढदिवस साजरे करणे। १३)भित्तिपत्रक तयार करणे १४)निसर्गसहल १२)स्वच्छता सप्ताह साजरा करणे १३)विद्यार्थी दत्तक घेणे १४)विविध जयंत्या व पुण्यतिथी १५)बचत बँक १६)हस्ताक्षर सुधार १७)हजेरी घेताना इंग्रजी शब्द १८)वाचन कट्टा १९)बाजार २०)परसबाग २१)उपस्थिती ध्वज २२)इंग्रजी संभाषण २३)शब्द बँक २४)स्वच्छ मुलगा-मुलगी २५)दत्तक कुंडी प्रकल्प २६)तंबाखू मुक्त शाळा २७)दत्तक मित्र २८)वर्तमानपत्र वाचन २९)विविध क्रीडा स्पर्धा ३०)चित्रकला स्पर्धा, ३१)निबंध लेखन ३२)वक्तृत्व स्पर्धा आयोजन ३३)हस्ताक्षर स्पर्धा ३४)दप्तराविना शाळा ३५)शब्द बाग Garden of words ३६)हस्ताक्षर सुधार प्रकल्प ३७)राजा काय म्हणतात ३८)प्रश्न आमचे ,उत्तर आमचे ३९)वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ४०)शिक्षकाचे व विद्यार्थ्यांचे सत्कार ४१)कला, कार्यानुभव कोपरे ४२)बाल आनंद मेळावे ४३)विविध विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन ४४)प्रवेशोत्सव ४५)100% पटनोंदणी ४६)लघु उद्योगाला भेटी ४७)हरित शाळा ४८)पक्ष्यांना खाऊ ४९)ज्ञानरचनावादी साहित्य ५०)डिजीटल शाळा ५१)आनंदायी शाळा, Happy school स्कूल"

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

आषाढी एकादशी निमित्ताने तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालचमूची दिंडी*

*आषाढी एकादशी निमित्ताने तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालचमूची दिंडी* 


  


















































तिवटग्याळ - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे आज दिनांक 10/7/2022 रोजी आषाढी एकादशी निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले, पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर', अशा विठ्ठलमय वातावरणात तिवटग्याळ गावातील शाळेत विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा रंगला. विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, वासुदेव व अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी रिंगण सोहळयात आकर्षण ठरले. 
तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत  आषाढी एकादशी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेतील सर्व मुला-मुलींनी यावेळी वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते. कोणी विठोबा तर कोणी वासुदेव बनले होते. सकाळी शाळेच्या मैदानावर पालखी सोहळा पार पड़ताच पंढरपुरच्या वारीप्रमाणेच रिंगणच देखिल ईथे आयोजन करण्यात आले होते, मुलांच्या हातात भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तूळशी वृंदावन हे बघून हे जणू खरच पंढरपुरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता. तद्नंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना घेऊन वाजत गाजत भजन, भावगीते, गवळण म्हणत प्रथम मारोती मंदिर परिसरात रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला. उपस्थित तिवटग्याळ गावातील विठ्ठल भक्तांनी भजन, भावगीते, गवळण सादर केली. शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, गावातील वारकरी जेष्ठ नागरिक श्री रामचंद्र पाटील, नरहरे मामा, गावातील सरपंच सौ उज्ज्वला ताई नरहरे, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार, मदतनीस श्रीमती भामाबाई बिरादार, शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले, आशा कार्यकर्ती श्रीदेवी कोरे तसेच जेष्ठ महिला व पुरुष मंडळीनी उत्स्फूर्तपणे साद दिली. रिंगण सोहळयात विविध संत विठोबा, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम अशा विविध वारकरी पोशाखात विद्यार्थ्यांनी भजन, भावगीते, गवळण म्हणून अतिशय सुंदर सादरीकरण केले. या दिंडी सोहळा ला शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, गावातील प्रतिष्ठित नागरिक रामचंद्र पाटील, नरहरे मामा, सरपंच सौ उज्ज्वला ताई नरहरे, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार, मदतनीस श्रीमती भामाबाई बिरादार, शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले, आशा कार्यकर्ती श्रीदेवी कोरे आदी जणांनी विद्यार्थ्यांना दिंडी सोहळास मार्गदर्शन केले. तद्नंतर गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री दिनेश पाटील यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ केळी व बिस्कीट पुडे वाटप केले. अतिशय सुंदर व देखणा दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला बद्दल उपस्थित सर्वांचेच आभार शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले.

No comments:

Post a Comment