एखाद्याच्या कर्जाला जामीनदार होत असाल तर 'ही' खबरदारी घ्या; अन्यथा मोठ्या आर्थिक संकटात सापडाल
मुंबई, 26 ऑगस्ट : बँक मोठं कर्ज देताना अनेकदा जामीनदाराची मागणी करते. नावाप्रमाणेच, कर्जाचा जामीनदार बँकेला हमी देतो की कर्जदार कर्जाची परतफेड करेल. कर्जदार असे करण्यात अयशस्वी झाल्यास, हमीदार म्हणून मी कर्जाची परतफेड करेल.
त्यामुळे त्यातील प्रत्येक बारीक गोष्टी नीट समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. बँका 2 प्रकारचे जामीनदार मागतात. एक म्हणजे गैर-आर्थिक हमीदार आणि दुसरा आर्थिक हमीदार. पहिल्यामध्ये तुमचा वापर फक्त संवादासाठी केला जाईल.
तर दुसऱ्या प्रकरणात कर्जदाराने पैसे न भरल्यास तुमच्याकडून वसुली केली जाईल. ज्या व्यक्तीसाठी तुम्ही गॅरेंटर बनत आहात त्या व्यक्तीला तुम्ही चांगलं ओळखता का, हे पाहा. तसेच त्याच्या कर्ज परतफेडीच्या हिस्ट्रीवर एक नजर टाका. त्यापूर्वी कर्जाची माहितीही घ्या.
No comments:
Post a Comment