मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित
*लातूर - राष्ट्रीय गोंधळी समाज सेवा संघ महाराष्ट्र जिल्हा शाखा लातूर च्या वतीने आज दिनांक 28/8/2022 रोजी गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार सोहळा कल्पतरू मंगल कार्यालय लातूर येथे आयोजित करण्यात आला. या वेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथील मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर भाऊराव बडगे यांना शैक्षणिक सामाजिक व राष्ट्रीय कार्य उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मा. शिवाजीराव पाटील कव्हेकर माजी आमदार तथा भाजप नेते राष्ट्रीय गोंधळी समाज सेवा संघ महाराष्ट्र चे प्रदेश अध्यक्ष मा शिवाजीराव नवरखेले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे उदघाटक मा. श्री शिवाजीराव पाटील कव्हेकर माजी आमदार तथा भाजप नेते, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री शिवाजीराव नवरखेले प्राचार्य तथा प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय गोंधळी समाज सेवा संघ महाराष्ट्र, प्रमुख मार्गदर्शक मा. श्री प्रभाकर इगवे माजी उपप्राचार्य दयानंद महाविद्यालय लातूर प्रमुख अतिथी मा. श्री डॉ रमेश वेले प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रीय गोंधळी समाज सेवा संघ महाराष्ट्र, राजेश जाधव नायब तहसीलदार लातूर, प्रकाश धुमाळ नायब तहसीलदार उदगीर, अशोक शिंदे सब रजिस्ट्रार निलंगा, मुख्य संयोजक तथा संस्थापक अध्यक्ष श्री राजेश भांडे, संपर्क प्रमुख बबनराव काळे, कोषाध्यक्ष विलासराव बडगे, पदाधिकारी श्रीनिवास काळे, भास्कर जगताप, संजय नवरखेले, रविशंकर इगवे, काशिनाथ इगवे, बालाजी भिसे, मधुकर घोडके, बाळासाहेब सुर्यवंशी, मुकेश वाडेकर, समीर नवरखेले, प्रकाश भोरे, प्रभाकर घोडके, माणिक इगवे, नागनाथ साळुंके, गणेश काळे, प्रशांत काटे, सुशांत बडगे, विक्रम पाचंगे व संतोष घोगरे आदी पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राजेश भांडे व आभारप्रदर्शन प्रभाकर घोडके यांनी मानले*.
No comments:
Post a Comment