Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, December 3, 2022

वय १७ असेल तरीही मतदार यादीत नावनोंदणी करण्याची संधी


*वय १७ असेल तरीही मतदार यादीत नावनोंदणी करण्याची संधी*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*सध्या महाराष्ट्रात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरु आहे. त्यामध्ये ज्यांची जन्मतारीख 1 ऑक्टोबर 2005 पूर्वीची आहे असे व्यक्ती मतदार यादीत नावनोंदणी करु शकतात.*
*📌 मतदार यादीत नावनोंदणी मोबाईलद्वारे Voter Helpline अ‍ॅप च्या मदतीने करावी?*

मोबाईलवर मतदार यादीत नावनोंदणी अशा प्रकारे करा.

नाव नोंदवताना वयाच्या पुराव्यासाठी खालीलपैकी कोणताही एक दस्तावेज हवा :


·         जन्म दाखला,
·         शाळा सोडल्याचा दाखला
·  जन्मतारखेची नोंद असलेली पाचवी/आठवी/दहावी/बारावी यांपैकी एका इयत्तेची गुणपत्रिका
·         पॅन कार्ड
·         वाहन चालक परवाना
·         भारतीय पासपोर्ट
·         आधार कार्ड
नाव नोंदवताना निवासाच्या पुराव्यासाठी खालीलपैकी कोणताही एक दस्तावेज हवा :
·     बँक/किसान/ टपाल यांचे चालू खातेपुस्तक म्हणजे पासबुक शिधावाटप पत्रिका म्हणजेच रेशनकार्ड
.    आधार कार्ड
·         भारतीय पासपोर्ट
·         वाहन चालक परवाना
·         अलीकडील भाडेकरार
·        पाणी/टेलिफोन/वीज/गॅस यांचे अलीकडचे देयक म्हणजेच बिल (हे देयक तुमच्या स्वतःच्या नावे नसेल, तर तुमच्या जवळच्या नात्यातल्या व्यक्ती आई/वडील/पती/पत्नी - यांच्या नावे असले तरी चालू शकते. तृतीय पंथीयांच्या बाबतीत ही बिले गुरूच्या नावे असतील तरी चालू शकते.)
·         प्राप्तीकर निर्देश पत्रिका म्हणजेच इन्कम टॅक्स असेसमेंट ऑर्डर
·        भारतीय टपाल विभागाद्वारे तुमच्या सध्याच्या निवासस्थानाच्या पत्त्यावर तुम्हांला प्राप्त झालेले कोणतेही टपालपत्र
➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment