PM SHRI School | PM SHRI School form kasa bharava? पी एमश्री शाळा माहिती कशी भरावी ?
PM SHRI School योजने अंर्तगत निवड झालेल्या यादीतील शाळांनी पोर्टलवर नोंदणी करणे बाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय, दि. २७.०९.२०२२.मान. पंतप्रधान महोदयांनी दि.०५/०९/२०२२ रोजी PM SHRI योजनेचा शुभारंभ केला आहे. PM SHRI School ही केंद्र पुरस्कृत योजना भारत सरकारने सन २०२२-२३ पासून सुरू केलेली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० मधील विविध तरतुदींची अंमलबजावणी करावयाची असून त्या माध्यमातून उत्कृष्ट पायाभूत भौतिक सुविधा, योग्य संसाधने, आनंददायी व उत्साहवर्धक शैक्षणिकदृष्ट्या अनुकुल वातावरण, उच्च दर्जाचे गुणात्मक शिक्षण देणाऱ्या सर्वसमावेशक, विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण देणाऱ्या आदर्श शाळा या माध्यमातून विकसित करण्यात येणार आहेत. या अंर्तगत निवड झालेल्या शाळा शाळांच्या मुख्याध्यापक यांनी दि .३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत आपल्या शाळेची नोंदणी तातडीने करून घ्यावी .
No comments:
Post a Comment