Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, March 4, 2023

सरकारी नोकरीसाठी कमाल वयोमर्यादेत वाढ, राज्य सरकारचा मोठा निर्णय..! Govt Job Age Limit

खुशखबर.. सरकारी नोकरीसाठी कमाल वयोमर्यादेत वाढ, राज्य सरकारचा मोठा निर्णय..! Govt Job Age Limit




मुंबई | सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कोरोनाकाळात सरकारी नोकरभरती ठप्प होती. त्यामुळे नोकरीसाठी कमाल वयोमर्यादा (Govt Job Age Limit) ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीसाठी अर्ज करता येत नव्हता. अशा विद्यार्थ्यांना राज्य सरकारने दिलासा देत सरकारी नोकरीसाठी वयोमर्यादा वाढवली आहे.

राज्य सरकारने कमाल वयाची मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने याचं परिपत्रक जारी केले आहे. यामुळे सरकारी नोकरीसाठीची वयोमर्यादा दोन वर्षांनी (Govt Job Age Limit) वाढली आहे. कोरोना काळात दोन वर्षे वाया गेल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील हजारो बेरोजगारांना दिलासा मिळाला आहे.

सामान्य प्रशासन विभागामार्फत शुक्रवारी याबाबत परिपत्रक प्रसिद्ध करून सरळ सेवेमार्फत भरल्या जाणाऱ्या पदांमध्ये भरतीसाठी वयोमर्यादेत दोन वर्ष वाढवून देण्यात आल्याचे म्हटलं आहे.

No comments:

Post a Comment