Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, May 6, 2023

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सन 2022 - 2023 शैक्षणिक वर्षाचा निकाल जाहीर, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची पुण्यतिथी साजरी

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सन 2022 - 2023 शैक्षणिक वर्षाचा निकाल जाहीर, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची पुण्यतिथी साजरी*

  *तिवटग्याळ - आज दिनांक 6/5/2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर  येथे 6 मे  2023 रोजी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची पुण्यतिथी निमित्ताने शैक्षणिक वर्ष 2022-23 वर्षा चा निकाल जाहिर करून, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श व उपक्रमशील शिक्षक राजेंद्र बिरादार, रमेश वाघमारे, शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, पालक व इतर शिक्षकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तदनंतर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आदर्श व उपक्रमशील शिक्षक राजेंद्र बिरादार यांनी छत्रपत्री राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती सांगितली.  प्रास्ताविकात शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी शैक्षणिक वर्ष 2022-23 वर्षा चा निकाल जाहीर करुन विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले त्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन पुढील इयत्तेच्या संदर्भात मार्गदर्शन केले. उन्हाळी सुट्टी मध्ये आपल्या आई वडील व पालक यांच्या सोबत दैनंदिन अभ्यास करावा. होय मी जबाबदार पालक. एक तास माझ्या मुलासाठी एक तास खास या उपक्रमातून नियमित अभ्यास करावे या विषयावर सविस्तर माहिती दिली. तद्नंतर शाळेतील सर्व विद्यार्थाना शुभेच्छा दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षीका अंजली  लोहारकर व आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले. या वेळी शाळेतील सर्व विद्यार्थी, प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र बिरादार, रमेश वाघमारे, शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, शाळेचे पालक आदी जण उपस्थित होते*




































































No comments:

Post a Comment