" शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रम . १)आदर्श परीपाठ २)मराठी भाषेत परीपाठ 3)इंग्रजी भाषेत परीपाठ ४)दिनांकानुसार पाढा ५)बोधकथा ६)चित्रकला स्पर्धा ७)वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ८)सांस्कृतिक कार्यक्रम ९)गीतगायन स्पर्धा १०)भाषण स्पर्धा ११)क्रीडा स्पर्धा १२)वाढदिवस साजरे करणे। १३)भित्तिपत्रक तयार करणे १४)निसर्गसहल १२)स्वच्छता सप्ताह साजरा करणे १३)विद्यार्थी दत्तक घेणे १४)विविध जयंत्या व पुण्यतिथी १५)बचत बँक १६)हस्ताक्षर सुधार १७)हजेरी घेताना इंग्रजी शब्द १८)वाचन कट्टा १९)बाजार २०)परसबाग २१)उपस्थिती ध्वज २२)इंग्रजी संभाषण २३)शब्द बँक २४)स्वच्छ मुलगा-मुलगी २५)दत्तक कुंडी प्रकल्प २६)तंबाखू मुक्त शाळा २७)दत्तक मित्र २८)वर्तमानपत्र वाचन २९)विविध क्रीडा स्पर्धा ३०)चित्रकला स्पर्धा, ३१)निबंध लेखन ३२)वक्तृत्व स्पर्धा आयोजन ३३)हस्ताक्षर स्पर्धा ३४)दप्तराविना शाळा ३५)शब्द बाग Garden of words ३६)हस्ताक्षर सुधार प्रकल्प ३७)राजा काय म्हणतात ३८)प्रश्न आमचे ,उत्तर आमचे ३९)वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ४०)शिक्षकाचे व विद्यार्थ्यांचे सत्कार ४१)कला, कार्यानुभव कोपरे ४२)बाल आनंद मेळावे ४३)विविध विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन ४४)प्रवेशोत्सव ४५)100% पटनोंदणी ४६)लघु उद्योगाला भेटी ४७)हरित शाळा ४८)पक्ष्यांना खाऊ ४९)ज्ञानरचनावादी साहित्य ५०)डिजीटल शाळा ५१)आनंदायी शाळा, Happy school स्कूल"

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

आज 5 मे 2023 बुध्द पौर्णिमा, बुध्द पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा


*आज 5 मे 2023 बुध्द पौर्णिमा, बुध्द पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा*
-----------------------------
बुद्ध पौर्णिमा तीन कारणांसाठी विशेष आहे. बुद्ध पौर्णिमा केवळ भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशांत साजरी केली जाते. जाणून घेऊया बुद्ध पौर्णिमा तिथी, मुहूर्त आणि महत्व आणि बुद्ध पौर्णिमा विशेष असण्याचे तीन कारणं.
यंदाच्या वर्षी ५ मे रोजी बुद्ध पौर्णिमा  आहे. ही तिथी वर्षातील सगळ्यात पवित्र आणि महत्त्वाची मानली जाते. बुद्ध पौर्णिमा तीन कारणांसाठी विशेष आहे. हा विशेष योगायोग म्हणजे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. याच दिवशी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती आणि याच दिवशी बुद्धांचे महानिर्वाण झाले होते, असे सांगितले जाते. बुद्ध पौर्णिमा केवळ भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशांत साजरी केली जाते. गौतम बुद्धांविषयीच्या अनेक कथा आपल्याला परिचित आहेत. त्यामुळे बौद्ध धर्मियांमध्ये बुद्ध पौर्णिमेला अनन्य साधारण महत्त्व आहे. वैशाख पौर्णिमा किंवा बुद्ध पौर्णिमा ५ मे रोजी आहे. तिथी प्रारंभ ४ मे गुरुवारी रात्री ११.४५ वाजता होईल आणि शुक्रवार, ५ मे रोजी रात्री ११ वाजून २९ मिनिटांनी पौर्णिमा तिथी समाप्त होईल. त्यामुळे ५ मे रोजी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. या दिवशी व्रत पाळण्यात येणार असून, विधिवत पूजा करण्यात येते. भगवान विष्णू आणि बुद्ध पौर्णिमा
बौद्ध धर्मीयांबरोबच हिंदू धर्मातही ही तिथी तितकीच महत्त्वाची आहे. पौराणिक कथेनुसार, वैशाख पौर्णिमा भगवान विष्णूशी जोडली गेलेली आहे. तसेच भागवत पुराणानुसार, बुद्ध हे विष्णूचे नववे अवतार मानले गेले आहेत. वैशाख पौर्णिमा 'सत्यविनायक पौर्णिमा' म्हणूनही ओळखले जाते. पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्णांनी त्यांचा मित्र सुदामा याला गरिबी आणि दु:खातून मुक्ती मिळवण्यासाठी सत्यविनायकाचा उपवास करण्यास सांगितले होते, अशी मान्यता आहे. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी धर्मराजाचीही पूजा केली जाते. धर्मराजाची पूजा केल्याने अकाली मृत्यूची चिंता राहत नाही, असे सांगितले जाते. दु:ख निवारण्यासाठी बुद्धांनी सांगितलेले आठ मार्ग मानवी जीवनातील दु:खे निवारण्यासाठी बुद्धांनी आठ मार्ग सांगितले होते. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी. बुद्ध पौर्णिमेला बोधगया येथे जगभरातून बौद्ध अनुयायी येतात आणि प्रार्थना करतात. बौद्ध धर्माच्या धर्मग्रंथांचे अखंड वाचन, पठण केले जाते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली २ मे १९५० रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी झाली. १९५१ मध्ये तीन दिवसीय बुद्ध जयंती महोत्सव साजरा करण्यात आला होता. २७ मे १९५३ रोजी भारत सरकारने बुद्ध जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली.
समस्त बंधू भगिनी ना बूध्द पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 
➖➖➖➖➖➖➖➖➖
*शुभेच्छुक*
*श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर तथा जिल्हा उपाध्यक्ष आदर्श शिक्षक समिती लातूर* 
➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment