"होय मी एक जबाबदार पालक, माझ्या मुलासाठी एक तास खास" या उपक्रमा अंतर्गत पालकांनी संस्कारक्षम पिढी घडवण्यास उपयुक्त उपक्रम - मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे*
तिवटग्याळ - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे दिनांक 6 मे 2023 रोजी सन 2022 - 2023 या शैक्षणिक वर्षांचा निकाल जाहीर झाल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना व पालकांना होय मी एक जबाबदार पालक, माझ्या मुलासाठी एक तास खास या उपक्रमा अंतर्गत सविस्तर माहिती दिली. आजच्या धावपळीच्या युगात आई वडिलांना मुलाकडे लक्ष देण्याची नित्यांत गरज आहे. नव्या पिढीला संस्कारक्षम घडविणे काळाची गरज आहे असे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी पालक मेळाव्यात मनोगत व्यक्त केले. दिनांक 2 मे 2023 पासून उन्हाळी सुट्टी जाहीर केली आहे. उन्हाळी सुट्टी मध्ये विद्यार्थ्यांना चांगले सवयी लागावे म्हणून या करीता प्रशासनाने पालकांना एक खास उपक्रम राबविण्यात येत आहे. होय मी जबाबदार पालक, माझ्या मुलासाठी एक तास खास. हि अभिनय उपक्रम राबविण्यात येत आहे. मुलासाठी पालकांनी सुट्टीच्या दिवसात विद्यार्थ्यांकडून ग्रहपाठ रोज एक दिवसभरातील केव्हा ही मुलासोबत बसून अभ्यास करून घ्यावा, आपला अनमोल वेळ आपल्या मुलासाठी खास काढावा, रोज सकाळ संध्याकाळ चे जेवण आपल्या मुलांसोबत करावे. अन्न वाया जावू देवू नका, त्यांचे ताट त्यांना धुवू द्या,भाजी निवडणे, झाडणे, लोटणे, कपडे धुणे अशी कामे त्यांना करू द्या, त्यांना प्रोत्साहन द्या, शेजारी राहणाऱ्या कुटुंबाकडे जावून त्यांच्याशी जवळीक वाढवण्यासाठी संधी द्या. दुसर्या च्या मुलांना आपल्या घरी बोलवा,आजी आजोबा सोबत गप्पा मारायला संधी द्या,आजी आजोबा सोबत फोटो काढा,आपल्या कामाच्या ठिकाणी घेऊन जा,आपण किती मेहनत करतो. कष्ट करतो त्यांना कळू द्या, स्थानिक यात्रा बाजारात घेऊन जा, आपल्या लहानपणी च्या आठवणी, पुर्वजांच्या आठवणी, माहिती सांगा, मुलांच्या प्रश्नांची उत्तरे द्या, त्यांना बोलते करा, मुलांना खेळू द्या, पडू द्या, कपडे खराब होऊ द्या, या उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना किमान एक तरी आवडीचे पुस्तक विकत घेऊन द्या, स्वतः मोबाईल मुलासमोर मर्यादित वापर करा,मुलांचा चेहरा दोन्ही हातात धरुन त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघा, ईश्वराने आपणास मुलाच्या रुपात किती अनमोल भेट दिली आहे त्याचा आनंद घ्या, मुलांचे सर्व हट्ट पुरवणे म्हणजे चांगले पालकत्व. ही खुळचट कल्पना डोळ्यातून काढून टाका, आम्ही शिक्षक आणि तुम्ही पालक मिळून उद्याचे सुजाण नागरीक घडवूया. अशी सविस्तर माहिती सांगून पालकांना विनंती पुर्वक सुचना केली. या वेळी गावचे सरपंच प्रशांत पाटील, माजी सरपंच उज्ज्वला ताई नरहरे, शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश साळुंके, उपाध्यक्ष कैलास तवर , ग्राम पंचायत सदस्य जनार्दन पाटील, जयशिंग पाटील, आकाश पाटील विजयकुमार पाटील,शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, ग्राम सेवक प्रशांत ढगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, मदतनीस भागाबाई बिरादार, शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले, प्रवीण कांबळे, अंजली श्रीमंगले, शाळेतील शिक्षक व विद्यार्थी, गावातील प्रतिष्ठित नागरिक व पालक उपस्थित होते. या पालक मेळाव्याचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व आभार शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी मानले.
No comments:
Post a Comment