Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Wednesday, June 21, 2023

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहाने साजरा

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहाने साजरा*

*तिवटग्याळ - जिल्हा परिषद  प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे दिनांक 21/6/2023 रोजी आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम शाळेतील विद्यार्थी, शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती  पूजा बिरादार व मदतनीस श्रीमती भागाबाई बिरादार व अन्य जणांच्या उपस्थितीत शाळेत  शाळेतील योग शिक्षक शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी  उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना योगाचे प्रात्यक्षिक व महत्त्व समजावून सांगितले. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आयुष मंत्रालय नवि दिल्ली यांनी ठरवून दिलेल्या योगासने व प्राणायाम यांची सर्व माहिती उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना  सकाळी ठीक सात वाजता योगासने व प्राणायाम घेऊन आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. योगाचे प्रात्यक्षिक उपस्थित विद्यार्थी व पालकांना शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी करुन दाखवले  यावेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती  पूजा बिरादार व मदतनीस भागाबाई बिरादार व  गावातील नागरिक उपस्थित होते. या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले*














































No comments:

Post a Comment