Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, July 1, 2023

आषाढी एकादशी निमित्ताने तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालचमूची दिंडी

*आषाढी एकादशी निमित्ताने तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालचमूची दिंडी* 

तिवटग्याळ - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे आज दिनांक 29/6/2023 रोजी आषाढी एकादशी निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले, पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर', अशा विठ्ठलमय वातावरणात तिवटग्याळ गावातील शाळेत विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा रंगला. विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम,नामदेव, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताताई व अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी रिंगण सोहळयात आकर्षण ठरले. 
तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत  आषाढी एकादशी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेतील सर्व मुला-मुलींनी यावेळी वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते. कोणी विठोबा तर कोणी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मूक्ताबाई बनले होते. सकाळी शाळेच्या मैदानावर पालखी सोहळा पार पड़ताच पंढरपुरच्या वारीप्रमाणेच रिंगणच देखिल ईथे आयोजन करण्यात आले होते, मुलांच्या हातात भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तूळशी वृंदावन हे बघून हे जणू खरच पंढरपुरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता. तद्नंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना घेऊन वाजत गाजत भजन, भावगीते, गवळण म्हणत प्रथम मारोती मंदिर परिसरात रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला. उपस्थित तिवटग्याळ गावातील विठ्ठल भक्तांनी भजन, भावगीते, गवळण सादर केली.  गावातील वारकरी जेष्ठ नागरिक  रामचंद्र पाटील, बापूराव येणगे, रावसाहेब पाटील, नरहरे मामा, रावसाहेब पाटील, शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर, गावातील माजी सरपंच उज्ज्वला ताई नरहरे, अंगणवाडी कार्यकर्ती  पूजा बिरादार, मदतनीस  भामाबाई बिरादार, शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले, गीता कच्छवे, नवनाथ कच्छवे, आशा कार्यकर्ती श्रीदेवी कोरे तसेच जेष्ठ महिला व पुरुष मंडळीनी उत्स्फूर्तपणे साद दिली. रिंगण सोहळयात विविध संत विठोबा, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम अशा विविध वारकरी पोशाखात विद्यार्थ्यांनी भजन, भावगीते, गवळण म्हणून अतिशय सुंदर सादरीकरण केले. या दिंडी सोहळा ला शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर, गावातील प्रतिष्ठित जेष्ठ नागरिक रामचंद्र पाटील, बापूराव येणगे, नरहरे मामा, माजी सरपंच उज्ज्वला ताई नरहरे, अंगणवाडी कार्यकर्ती  पूजा बिरादार, मदतनीस  भामाबाई बिरादार, शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले, गीता कच्छवे, नवनाथ कच्छवे, आशा कार्यकर्ती श्रीदेवी कोरे आदी जणांनी विद्यार्थ्यांना दिंडी सोहळास मार्गदर्शन केले. तद्नंतर गावातील  नागरिक नवनाथ कच्छवे व गीता कच्छवे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना अन्न छत्र सुशीला व शाबुदाणा खिचडी व चहा दिले. तसेच या वर्षी चा महाआरती चा मान कच्छवे दाम्पत्यास नवनाथ कच्छवे व गीता कच्छवे यांना मिळाला. महा आरती नंतर या दिमाखदार आषाढी एकादशी निमित्ताने बालचमूची दिंडी सोहळा संपन्न झाला. अतिशय सुंदर व देखणा दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला बद्दल उपस्थित सर्वांचेच आभार शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले.

















































No comments:

Post a Comment