Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Thursday, July 27, 2023

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम आझाद यांचा स्मृतिदिन साजरा

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम आझाद यांचा स्मृतिदिन साजरा*

 *तिवटग्याळ - आज दिनांक 27/7/2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर  येथे 27 जूलै हा दिवस डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम आझाद यांचा स्मृतिदिनानिमित्त आज दिनांक 27/7/2023 रोजी डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम आझाद यांच्या  प्रतिमेला शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तदनंतर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षीका  अंजली लोहारकर यांनी डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित बालपण, शिक्षण, शास्त्रज्ञ व राष्ट्रपती या विविध पैलूंवर सविस्तर माहिती सांगितली.   या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षीका अंजली  लोहारकर व आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले. या वेळी शाळेतील  विद्यार्थी, शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर,  शाळेचे पालक आदी जण उपस्थित होते*








No comments:

Post a Comment