*मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांची नोकरीच्या सेवेतील 25 वर्षे पूर्ण (रौप्य वर्षे) निमित्ताने विद्यार्थ्यांना वह्या, पेन व केळी वाटप*
*उदगीर - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथील मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांची नौकरी सेवीतील आज दिनांक 1/8/2023 रोजी 25 वर्षे पूर्ण (रौप्य) वर्षा निमित्ताने आज शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व अभिनंदन करुन करुन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. तद्नंतर शाळेतील सर्व विद्यार्थाना 25 वर्षे पूर्ण (रौप्य) वर्षा निमित्ताने शैक्षणिक साहित्य वह्या, पेन व केळी देऊन वाटप करण्यात आले. शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. मनोगतातून मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी नोकरीच्या पहिल्या दिवसापासून आज पर्यंत मिळालेल्या शैक्षणिक वाटचालीतील शालेय प्रगती, विद्यार्थाची प्रगती, विविध स्तरांवर उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल शाळेला, विद्यार्थीना तसेच वैयक्तिक मिळालेल्या मान, सन्मान, पुरस्कार गाव स्तर, तालुका, जिल्हा तसेच राष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या सन्मानित करण्यात आले आहे या विषयी सविस्तर माहिती मनोगतातून व्यक्त केली. मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो की मला या पुढे ही असेच कार्य करण्याची ईच्छा शक्ती, बळ मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना असे बोलून दाखविले. या वेळी शाळेतील सर्व विद्यार्थी, शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, मदतनीस भागाबाई बिरादार, मनिषा श्रीमंगले व शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर व आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले*
No comments:
Post a Comment