Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Tuesday, August 1, 2023

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी*

*तिवटग्याळ . - आज  दिनांक 1/8/2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता. उदगीर जिल्हा लातूर येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी  तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली . प्रथम शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षीका  अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती  पूजा बिरादार व मदतनीस भागाबाई, मनिषा श्रीमंगले  यांनी लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे च्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुण्यतिथी व जयंती साजरी केली उपस्थित सर्वांनी अभिवादन केले. तद्नंतर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे  यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती  दिली. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे ,शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार व मदतनीस भागाबाई बिरादार, मनिषा श्रीमंगले  व शाळेतील  विद्यार्थी, नागरीक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर व आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले*































No comments:

Post a Comment