Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Sunday, November 5, 2023

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी 

तिवटग्याळ . - आज  दिनांक 31/10/2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली . प्रथम शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, गावचे सरपंच प्रशांत पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे चे उपाध्यक्ष कैलास तवर, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती  पूजा बिरादार व मदतनीस भागाबाई बिरादार, वर्षा श्रीमंगले व गावातील अन्य नागरिक यांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या  प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती तसेच पुण्यतिथी साजरी केली. उपस्थित सर्वांनी अभिवादन केले. तद्नंतर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती दिली व इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी दिली. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे, गावचे सरपंच प्रशांत पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष कैलास तवर, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार व मदतनीस, भागाबाई बिरादार, वर्षा श्रीमंगले व  शाळेतील  विद्यार्थी, नागरीक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर व आभारप्रदर्शन शाळेतील शिक्षिका अंजली यांनी मानले





























No comments:

Post a Comment