तिवटग्याळ -
तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे आज दिनांक 14/1/2025 रोजी शालेय परिपाठानंतर शाळचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना आज आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना, गावचे सरपंच प्रशांत, उपसरपंच कैलास तवर व शिक्षकांना तिळगूळ वाटप करुन मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या जाणार आहेत असे सांगितले व शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी 14 जानेवारी भूगोल दिन व 14 जानेवारी मंगळवार मकरसंक्रांत दिनानिमित्त सविस्तर माहिती दिली. मकर संक्रांती हा भारताचा मुख्य सण आहे. मकर संक्रांती संपूर्ण भारत आणि नेपाळमध्ये एका स्वरूपात साजरी केली जाते. हा सण पौष महिन्यात साजरा केला जातो, जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. सध्याच्या शतकात हा उत्सव जानेवारी महिन्याच्या चौदाव्या किंवा पंधराव्या दिवशीच येतो, या दिवशी सूर्य धनु राशि सोडून मकर राशीत प्रवेश करते.तामिळनाडूमध्ये तो पोंगल नावाचा सण म्हणून साजरा केला जातो, तर कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेशात त्याला संक्रांती म्हणतात. मकर संक्रांतीच्या उत्सवाला काही ठिकाणी उत्तरायण असेही म्हणतात, उत्तरायण देखील या दिवशी होतो हा एक गैरसमज आहे. पण मकरसंक्रांती ही उत्तरायणपेक्षा वेगळी आहे. एका राशीपासून दुसर्या राशीपर्यंत सूर्याचा संक्रमण संक्रांती असे म्हणतात. एका संक्रांतीपासून दुसर्या संक्रांतीच्या दरम्यानच्या काळाला सौर महिना म्हणतात. जरी एकूण 12 सूर्यसंक्रांती आहेत, परंतु त्यापैकी मेष, कर्क, तुला आणि मकर संक्रांती ही मुख्य आहेत. या उत्सवाची खास गोष्ट म्हणजे ती दरवर्षी 14 जानेवारी रोजी साजरी केली जाते. परंतु कधीकधी हा एक दिवस आधी किंवा नंतर म्हणजे 13 जानेवारी किंवा 15 जानेवारी रोजी साजरा केला जातो. परंतु हे फार क्वचितच घडते. या विषयावर सविस्तर माहिती दिली. तद्नंतर सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना तिळगूळ वाटप करून तिळगूळ घ्या गोड गोड बोला असे सांगितले. या वेळी गावचे सरपंच प्रशांत पाटील, उपसरपंच कैलास तवर, शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे,अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार व मदतनीस भागाबाई बिरादार व शाळेतील सर्व विद्यार्थी व अन्य जण उपस्थि होते
No comments:
Post a Comment