*सांस्कृतिक कार्यक्रमाच्या बक्षीस रक्कम तुन तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्पेशल स्पोर्ट्स गणवेश वाटप*
*तिवटग्याळ - दिनांक 17/2/ 2025 रोजी सोमवारी सकाळी परीपाठानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे गावचे सरपंच प्रशांत पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. रमेश साळुंके, उपाध्यक्ष कैलास तवर, गावातील शिक्षण प्रेमी नागरिक छगनसिंग बिरादार, शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर, मुक्ता नंदगावे, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, मदतनीस भागाबाई बिरादार, वर्षा श्रीमंगले,गीताताई कच्छवे, राजकुमार व शाळेतील सर्व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सन 2024-25 या वर्षातील सांस्कृतिक कार्यक्रमाच्या बक्षीस रक्कमेतून तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्पेशल स्पोर्ट्स गणवेश वाटप* करण्यात आले. या वेळी शाळेचे गावचे सरपंच प्रशांत पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश साळुंके, उपाध्यक्ष कैलास तवर, शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार व मदतनीस श्रीमती भागाबाई बिरादार व शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले आदी जण उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर यांनी केले व आभार शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment