*तोंडार /शंभूउमरगा केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षकांची आॅनलाईन बदली सन 2024-25 अंतर्गत कार्यशाळा संपन्न*
*तिवटग्याळ - शिक्षण विभाग प. स.उदगीर अंतर्गत तोंडार व शंभूउमरगा केंद्राची केंद्रस्तरीय कार्यशाळा तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घेण्यात आली. या कार्यशाळेला केंद्रप्रमुख मा. शेषराव राठोड, मुख्याध्यापक संजय बिरादार तोंडार, मुख्याध्यापक शेगसारे शंभूउमरगा, मुख्याध्यापक संजय मळभागे, मुख्याध्यापक अनिल जळकोटे, अशोक बरुरे यांच्या उपस्थितीत बदली संदर्भात कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय मळभागे यांनी केले. प्रास्ताविकात सुधारीत gr विषयावर माहिती दिली तद्नंतर तंत्रस्नेही शिक्षक तथा मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे बडगे यांनी बदली संदर्भात दिनांक 18 जून 2024 विषयावर सविस्तर माहिती दिली. या gr मधील शासन निर्णय, बदली व्याख्या, संवर्ग 1,संवर्ग 2,संवर्ग 3,संवर्ग 4 या संदर्भात सविस्तर माहिती दिली. केंद्र प्रमुख तोंडार व शंभूउमरगा मा. शेषराव राठोड यांनी बदली संदर्भात शंका समाधान व चर्चा घडवून आणली. या बदली कार्यशाळेसाठी तोंडार व शंभूउमरगा केंद्रातील 50 टक्के शिक्षक उपस्थित राहून बदली संदर्भात सर्व माहिती घेतली. तसेच उर्वरित 50 टक्के शिक्षक दिनांक 21 मार्च 2025 रोजी उपस्थित राहून बदली संदर्भात कार्यशाळेत सहभागी होऊन माहिती घेणार आहेत असे केंद्रप्रमुख मा. शेषराव राठोड यांनी सांगितले*
No comments:
Post a Comment