*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख यांची अचानक शाळा भेट*
*तिवटग्याळ - उदगीर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. शफी शेख व तोंडार केंद्राचे केंद्र प्रमुख मा.शेषराव राठोड यांची आज दिनांक 22 मार्च 2025 रोजी अचानक निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता दुसरी ते पाचवी विद्यार्थ्यांचे वाचन, लेखन, संख्याज्ञान व संख्यावरील क्रिया विद्यार्थांची अध्ययन स्तर तपासणी करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ येथे दिनांक 22/3/2025 रोजी अचानक शाळा भेट दिली. गटशिक्षणाधिकारी मा. शफी शेख, केंद्रप्रमुख शेषेराव राठोड, रमेश जाधव यांचा सर्व प्रथम शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर व शाळेतील विद्यार्थाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तद्नंतर शालेय परीपाठ विद्यार्थ्यांनी इंग्रजी मध्ये सादरीकरण केले. इंग्रजी मध्ये पाहुन गटशिक्षणाधिकारी मा. शफी शेख, केंद्र प्रमुख मा.शेषराव राठोड, रमेश जाधव यांनी विद्यार्थाचे कौतुक केले. परीपाठ इंग्रजी मध्ये सादर केला. परीपाठ सादर केलेल्या कु. रितीका पाटील, स्नेहा तोमर पाटील, गंगासागर बिरादार, प्रांजली कांबळे, मंदिरा साळुंके, गंगा बिरादार यांचे गटशिक्षणाधिकारी मा. शफी शेख व केंद्र प्रमुख मा. शेषराव राठोड व रमेश जाधव यांनी अभिनंदन केले. भेटीत इयत्ता दुसरी ते पाचवी पर्यंत च्या इयत्तेच्या विद्यार्थ्यांची निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणी वाचन, लेखन, संख्याज्ञान व संख्यावरील क्रिया विद्यार्थी अध्ययन स्तर शैक्षणिक तपासणी केली. तसेच इयत्ता दुसरी ते पाचवी विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर चाचणी घेऊन विद्यार्थ्यांची प्रगती पाहुन समाधान व्यक्त केले. इयत्ता पहिली च्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती विशेष इंग्रजी विषयाची तयारी पाहुन विद्यार्थ्यांचे कौतुक करुन हस्तांदोलन करून अभिनंदन केले. शाळा परीसर, शौचालय, किचन शेड या बाबतीत स्वच्छता पाहुन तसेच सर्व इयत्तेच्या विद्यार्थाची प्रगती पाहून समाधान व्यक्त केले. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. या वेळी गटशिक्षणाधिकारी मा शफी शेख, केंद्र प्रमुख मा. शेषराव राठोड, रमेश जाधव, शिक्षण प्रेमी नागरिक छगनसिंग बिरादार, शालेय पोषण आहार मदतनीस गीताताई कच्छवे आदी जण उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी मा शफी शेख यांनी मार्गदर्शक सुचना केल्या. एकंदरीत शाळेची प्रगती पाहून समाधान व्यक्त केले*
No comments:
Post a Comment