*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी*
-------------------------------------
*तिवटग्याळ - आज दिनांक 26/6/2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे 26 जून 2025 रोजी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रथम छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, मदतनीस भागाबाई बिरादार आदींनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तदनंतर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी छत्रपत्री राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर व आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे , शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, मदतनीस भागाबाई बिरादार व शाळेचे पालक आदी जण उपस्थित होते*
No comments:
Post a Comment