आर्य वैश्य ऑफिशियल प्रोफेशनल असोसिएशन (AVOPA)या सामाजिक चळवळ अंतर्गत कुमारी नारायणी महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप
*तिवटग्याळ - 16 जून 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता.उदगीर जि लातूर येथे शाळेमध्ये आर्य वैश्य ऑफिशियल प्रोफेशनल असोसिएशन (AVOPA) यांच्यावतीने कुमारी नारायणी महाजन यांच्या सौजन्याने शैक्षणिक साहित्य वाटप म्हणून रजिस्टर वही मा. मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शिक्षिका अंजली लोहारकर वर्षा श्रीमंगले, गीताताई कच्छवे, भागाबाई बिरादार यांच्या शुभ हस्ते वाटप करण्यात आल्या. गेल्या वीस वर्षापासून (AVOPA) च्या माध्यमातून सर्व सदस्य समाजातील गोरगरीब गरजूंना दरमहा धान्य व राशन किट वाटप करतात. गरजवंत विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक बाबीसाठी मदत करतात. (AVOPA) त्यांच्या जीवनास उभारी देण्यासाठी मदत करते.







No comments:
Post a Comment