Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Tuesday, November 26, 2019

बोळेगाव बु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहाने संविधान दिन विविध उपक्रम राबवून साजरा. प्रतिनिधी......... दिनांक 26/11/2019 रोजी बोळेगाव बु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ता‌.शि.अनंतपाळ येथे मोठ्या उत्साहाने 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आला. प्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री इस्माईल मुजेवार यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संविधान दिन साजरा केला.तसेच शाळेतील शिक्षक चंद्रकांत कोरे,ज्ञानोबा कंंजे, सुदर्शन पाटील, सुभाष नरवाडे, ज्ञानेश्वर बडगे, श्रीमती मजलसा पुठ्ठेवाड यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तद्नंतर शाळेतील शिक्षक श्री ज्ञानेश्वर बडगे , सुदर्शन पाटील, चंद्रकांत कोरे, सुभाष नरवडे यांनी संविधान तयार करण्यासाठी महत्त्वाचे योगदान देणाऱ्या नेत्या विषयी व घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर, डॉ राजेंद्र प्रसाद यांच्या संविधानाच्या कार्या विषयावर सविस्तर माहिती दिली. तसेच आज 26/11 /2008 रोजी शहिद झालेल्या पोलिस अधिकारी हेमंत करकरे,विजय साळसकर, प्रकाश कामठे, तुकाराम ओंबळे, इतर अधिकारी यांच्या विषयी शाळेतील शिक्षक श्री सुभाष नरवडे यांनी माहिती दिली सांगुन दोन मिनिटे मौन धारण करून आदरांजली वाहिली. तसेच आज संविधान दिनाच्या निमित्ताने शाळेत विविध उपक्रमांचे निबंध स्पर्धा, प्रश्र्नमंजषा, चित्रकला स्पर्धा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.व या स्पर्धेत प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिस दिले जाणार आहे असे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक श्री सुभाष नरवाडे व आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री ईस्माईल मुजेवार यांनी मानले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ईस्माईल मुजेवार व शाळेतील शिक्षक श्री चंद्रकांत कोरे, सुदर्शन पाटील, ज्ञानोबा कंजे, सुभाष नरवडे,ज्ञानेश्वर बडगे, व शिक्षिका मजलसा पुठ्ठेवाड व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते












बोळेगाव बु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहाने संविधान दिन विविध उपक्रम राबवून साजरा.


  प्रतिनिधी......... दिनांक 26/11/2019 रोजी बोळेगाव बु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ता‌.शि.अनंतपाळ येथे मोठ्या उत्साहाने      26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आला. प्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री इस्माईल  मुजेवार यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संविधान दिन साजरा केला.तसेच शाळेतील शिक्षक चंद्रकांत कोरे,ज्ञानोबा कंंजे,  सुदर्शन पाटील, सुभाष नरवाडे, ज्ञानेश्वर बडगे, श्रीमती मजलसा पुठ्ठेवाड  यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  तद्नंतर शाळेतील शिक्षक श्री ज्ञानेश्वर बडगे , सुदर्शन पाटील, चंद्रकांत कोरे, सुभाष नरवडे यांनी संविधान तयार करण्यासाठी महत्त्वाचे योगदान देणाऱ्या नेत्या विषयी व घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर, डॉ राजेंद्र प्रसाद यांच्या संविधानाच्या कार्या विषयावर सविस्तर माहिती दिली. तसेच आज 26/11 /2008 रोजी शहिद झालेल्या पोलिस अधिकारी हेमंत करकरे,विजय साळसकर, प्रकाश कामठे, तुकाराम ओंबळे, इतर अधिकारी यांच्या विषयी शाळेतील शिक्षक श्री सुभाष नरवडे यांनी माहिती दिली सांगुन दोन मिनिटे मौन धारण करून आदरांजली वाहिली.  तसेच आज संविधान दिनाच्या निमित्ताने शाळेत विविध उपक्रमांचे निबंध स्पर्धा, प्रश्र्नमंजषा, चित्रकला स्पर्धा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.व या स्पर्धेत प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिस दिले जाणार आहे असे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक श्री सुभाष नरवाडे व  आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री ईस्माईल मुजेवार  यांनी मानले.
या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ईस्माईल मुजेवार व शाळेतील शिक्षक श्री चंद्रकांत कोरे, सुदर्शन पाटील, ज्ञानोबा कंजे, सुभाष नरवडे,ज्ञानेश्वर बडगे, व शिक्षिका मजलसा पुठ्ठेवाड व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते

No comments:

Post a Comment