Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Thursday, November 7, 2019

श्री ज्ञानेश्वर बडगे यांचा सत्कार रावणगाव-- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नविन वसाहत रावणगाव येथे मोठ्या उत्साहात शाळेतील माजी मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर यांची बदली झाल्यामुळे आज दिनांक 5/7/2019 रोजी शाळेच्या वतीने निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री अरविंद मोहारे , प्रमुख पाहुणे निरोप मुर्ती श्री ज्ञानेश्वर बडगे, श्रीमती सुनीता पोलावार, सौ. कलावती मेहत्रे आदी जण उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत माजी मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांचा श्री अरविंद मोहारे व मान्यवरांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. निरोप प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापकश्री अरविंद मोहारे यांनी श्री ज्ञानेश्वर बडगे यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले.व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या तदनंतर निरोप मुर्ती श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी निरोप प्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या. या शाळेत गेल्या 6 वर्षात केलेल्या कामाची माहिती दिली. विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचे मोलाचे सहकार्य, शाळेची शैक्षणिक प्रगती , राबविण्यात आलेले विविध उपक्रम, शाळेला व वैयक्तिक मिळालेल्या सन्मान, पुरस्कार या विषयी मनोगत व्यक्त केले. माझ्या स्वपनातील अतिशय सुंदर शाळा मी बनवली. ही शाळा बनविण्यासाठी शिक्षक, पालक व अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले. हि शाळा माझ्या आठवणीत आयुष्यभर राहील. असे मनोमन व्यक्त केले. या निरोप समारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक श्री अरविंद मोहारे व आभार शाळेतील शिक्षीका सुनिता पोलावार यांनी मानले. या कार्यक्रमासाठी शाळेतील विद्यार्थी.शिक्षक व पालक उपस्थित होते.


श्री ज्ञानेश्वर बडगे यांचा सत्कार 

रावणगाव-- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नविन वसाहत रावणगाव येथे मोठ्या उत्साहात शाळेतील माजी मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर यांची  बदली झाल्यामुळे आज दिनांक 5/7/2019 रोजी शाळेच्या वतीने निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री अरविंद मोहारे , प्रमुख पाहुणे  निरोप मुर्ती श्री ज्ञानेश्वर बडगे, श्रीमती सुनीता पोलावार, सौ. कलावती मेहत्रे आदी जण   उपस्थित होते.  मान्यवरांच्या उपस्थितीत माजी मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांचा श्री अरविंद मोहारे व मान्यवरांच्या उपस्थितीत  शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
 निरोप प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक
श्री अरविंद मोहारे  यांनी श्री ज्ञानेश्वर बडगे यांच्या विषयी  मनोगत व्यक्त केले.व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या तदनंतर निरोप मुर्ती श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी निरोप प्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या. या शाळेत गेल्या 6 वर्षात केलेल्या कामाची माहिती दिली. विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचे मोलाचे सहकार्य, शाळेची शैक्षणिक प्रगती , राबविण्यात आलेले विविध उपक्रम, शाळेला व वैयक्तिक मिळालेल्या सन्मान, पुरस्कार या विषयी मनोगत व्यक्त केले. माझ्या स्वपनातील अतिशय सुंदर शाळा मी बनवली. ही शाळा बनविण्यासाठी शिक्षक, पालक व अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले. हि शाळा माझ्या आठवणीत आयुष्यभर राहील. असे मनोमन व्यक्त केले.


 या निरोप समारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक श्री अरविंद मोहारे व आभार शाळेतील शिक्षीका सुनिता पोलावार यांनी मानले. या कार्यक्रमासाठी शाळेतील विद्यार्थी.शिक्षक व पालक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment