Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Thursday, February 18, 2021

बोळेगाव बु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहाने शिवजयंती साजरी.

बोळेगाव बु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहाने शिवजयंती साजरी.


   




  प्रतिनिधी......... दिनांक 19/2/2021 रोजी बोळेगाव बु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ता‌.शि.अनंतपाळ येथे मोठ्या उत्साहाने  छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. प्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री माधवराव पारशेटटे यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी केली. तसेच शाळेतील शिक्षक श्री चंद्रकांत कोरे यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी केली. शाळेचे मुख्याध्यापक श्री माधवराव पारशेटटे यांनी शिवाजी महाराजांच्या  जीवनावर आधारित सविस्तर माहिती दिली. तसेच  उपस्थितांचे आभारप्रदर्शन शाळेतील शिक्षक श्री चंद्रकांत कोरे यांनी मानले.
या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री माधवराव पारशेटटे व शाळेतील शिक्षक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment