तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आनंदायी शनिवार या उपक्रमातून "हत्ती ला शेपूट लावणे उपक्रमांतून शिक्षण"*
-------------------------------------
*तिवटग्याळ - आज दिनांक 13/9/2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे आज शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी आज शनिवार निमित्ताने" शनिवार माझा आवडीचा, अभ्यासक्रमातून खेळू करु शिकू विषयातील पान नंबर 15 वरील" हत्ती ला शेपुट लावणे "हा शैक्षणिक मनोरंजक खेळ" हत्ती ला शेपूट लावणे " या उपक्रमांविषयी सविस्तर माहिती दिली. बोर्डावर हत्ती चे चित्र काढले आहे, या बोर्डावरील हत्ती च्या चित्राला डोळ्याला हातरूमाल बांधून शेपुट लावणे. जो बरोबर हत्ती ला शेपुट लावेल तो विजेता होईल असे सांगितले. विद्यार्थांना गोल वर्तुळाकार बसून क्रमाने बसवून आनंदायी शनिवार उपक्रमांतून इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत च्या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी हा उपक्रम समजावून सांगितले व प्रात्यक्षिक करुन दाखवले . प्रथम शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी विद्यार्थ्यांना या उपक्रमांची सविस्तर माहिती समजावून सांगितली. रीतीने सर्व विद्यार्थ्यांचा सहभागी घेऊन. "हत्ती ला शेपुट लावणे " शैक्षणिक खेळ घेतला. अशा पध्दतीने शैक्षणिक खेळाच्या माध्यामतून मनोरंजनातून विद्यार्थांचा अभ्यासक्रमातील सर्व विद्यार्थ्यांना सराव करुन घेतला. या उपक्रमांत शाळेतील सर्व विद्यार्थांना सहभागी करुन घेतले. शाळेतील सर्व विद्यार्थी आनंदी व खूप सक्रिय सहभागी झाले.या शैक्षणिक खेळात पहिल्या फेरीत विजेते झालेल्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व सर्व विद्यार्थी सहभागी झाले*



























No comments:
Post a Comment