*Covid-19 लसीकरणसाठी नागरीकांनी ऑनलाईन रेजिस्ट्रेशन करण्याची पध्दत.*
➖➖➖➖➖➖➖➖
https://m.facebook.com/story.php?story_fbid=110970550853890&id=106479051303040
➖➖➖➖➖➖➖➖
*रजिस्ट्रेशन करण्याची लिंक* http://selfregistration.cowin.gov.in
*रजिस्ट्रेशन कसे करावे*
1) वरील लिंकवर क्लिक करणे.
2) त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकणे.
3) नंतर तुमच्या मोबाईलवर आलेला OTP टाकणे.
4) नंतर फोटो आयडी प्रूफ मध्ये आधारकार्ड हा पर्याय निवडणे.
5) त्यानंतर 12 अंकी आधार नंबर टाकणे.
6) त्यानंतर आधार कार्डवरील नाव जस आहे तसेच टाकणे.
7) त्यानंतर स्त्री / पुरुष हा पर्याय निवडणे.
8) त्यानंतर आधार कार्डवरील फक्त जन्म तारेखच वर्ष टाकणे.
9) त्यानंतर राजिस्टरवर क्लिक करणे.
या प्रमाणे एका मोबाईल नंबरवर आपण त्याच कुटूंबातील 4 व्यक्तींचे रजिस्ट्रेशन करू शकतो.
10) रजिस्ट्रेशन झाल्यावर शेड्युल बुक करण्यासाठी शेडूल वर क्लिक करावे त्यानंतर schedule now म्हणून येतो, त्यावर क्लिक करा
11) त्यानंतर search pin येते त्याखाली pin code टाका त्यानंतर सर्च करा. किंव्हा दुसऱ्या पर्याय वर क्लिक करून जिथे राज्य (state) निवडून त्यात नंतर आपला जिल्हा (district) निवडुनही केंद्र निवडता येते
(लातूर जिल्ह्यातील पिन कोड मार्फत लसीकरण केंद्र निवडण्याकरिता जिल्ह्यातील तालुका निहाय पिन कोड खालील प्रमाणे असून आपणाला ज्या ठिकाणी लसीकरण करायचे आहे त्या ठिकाणच्या पिन कोडचा वापर करावा)
* लातूर 413512, 413531
* रेणापूर 413527
* अहमदपयर 413515
* चाकूर 413513
* औसा 413520
* निलंगा 413521
* शिरूर अनंतपाळ 413544
* देवणी 413519
* जळकोट 413532
* उदगीर 413517
12) त्यानंतर खाली तारखा व केंद्र दिसतील प्रत्येक केंद्रासमोर कोणती वेक्सिं उपलब्ध आहे व कोणत्या वयोगटासाठी आहे हे दर्शविले आहे 13) जे केंद्र आपल्याला निवडायचे आहे त्या केंद्रावर क्लिक करा व वेळ निवडून शेड्युल बुक करा.
14)त्यानंतर तुम्हाला शेड्युल बुक केल्याचा मेसेज येईल तर रजिस्ट्रेशन पूर्ण झाला असे समजावे.
जिल्ह्याबाहेर राहणाऱ्या व्यक्तीने जिथे राहता किंव्हा जिथे लसीकरण करून घ्यायचे आहे त्या ठिकाणना पिन कोड वापरून शेड्युल बुक करून घ्यावा.
धन्यवाद
एम. एस. पटेल
जिल्हा समन्वय अधिकारी,
माविम लातूर.
➖➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment